एक वादग्रस्त कार्टून आणि त्यानंतर सुरु झाला जगातला सर्वात मोठा रक्तपाताचा खेळ….

२०१५ साल, पॅरिसमध्ये  फ्रांस आणि जर्मनी यांच्यात एक फुटबॉल मॅच खेळवली जात होती, ८० हजाराहून जास्त लोकं स्टेडियममध्ये आलेले होते. स्टेडियमच्या आतबाहेर कडक सुरक्षा होती. मॅच सुरु असतानाच स्टेडियमबाहेर एक मोठा आवाज झाला. सुरवातीला त्याला कोणी सिरीयस घेतलं नाही पण नंतर बातमी कळली कि पॅरिसवर आतंकवादी हल्ला झाला आहे.

मॅच संपल्यावर ऍम्ब्युलन्स आणि पोलिसांच्या गाड्यांचे सायरन निनादू लागले. स्टेडियमच्या बाहेर एक आणि स्टेडियमच्या बाहेर असे दोन भाग झाले होते. मॅच संपली तरी लोकं मैदानाबाहेर जाण्यास तयार नव्हते. जीव मुठीत घेऊन लोकं ग्राऊंडमध्ये उतरली होती. स्टेडियमच्या बाहेर जो पहिला ब्लास्ट झाला होता त्याची एक वेगळी गोष्ट होती.

स्टेडियममध्ये एंट्री करण्याआधी एका व्यक्तीला सुरक्षारक्षकांनी आत जाऊ दिलं नाही कारण त्याच्याकडे संशयास्पद गोष्ट होती. मग त्या अज्ञात व्यक्तीने आपला सुसाईड बेल्ट डिटोनेट केला आणि नंतर त्या व्यक्तिसमवेतच अजून दोन व्यक्तींना  मरणाला सामोरं जावं लागलं. सुसाईड बॉम्बरने स्वतः तर जीव दिलाच शिवाय पुढच्या रक्तपाताची खूण दर्शवून तो गेला. हि तर सुरवात झाली होती. यानंतर या बॉम्ब अटॅकला एकदम विकृत स्वरूप आलं.

या स्टेडियमच्या काही अंतरावर एक बॅटाक्ला थेटर होतं. या थेटरात जवळपास दीड हजार लोकं होती. ईगल ऑफ द मॅटचा कॉन्सर्ट सुरु होता. भरपूर गर्दी झालेली होती. अशा परिस्थितीत आतंकवाद्यांनी आपली पोलो कार आत घुसवली आणि अल्ला हू अकबर म्हणत त्या गर्दीत गोळीबार सुरु केला. रात्री साडे बारा वाजता पोलिसांनी थेटरात प्रवेश केला तब्बल ३ तास गोळीबार आणि चकमक सुरु होती. आतंकवाद्यांपैकी ३ जणांनी सुसायडर बॉम्बने आत्महत्या केली तर एकजण पोलिसांची गोळी लागल्याने मरण पावला. यात थेटरमधले ९० लोकं मारले गेले. 

इस्लामिक स्टेटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. ७ जानेवारी २०१५ रोजी चार्ली हेब्दो या मासिकात मोहम्मद पैगंबरांचा अपमान करणारे कार्टून प्रकाशित झाले. मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या. भडकलेल्या कट्टरपंथीय तरुणांकडून मग  हा हल्ला करण्यात आला होता. या केसबद्दल उलगडा व्हायला सुरवात झाली तेव्हा ९-१० आतंकवादी यात सामील असल्याचं स्पष्ट झालं होतं. पण यातले बहुतांशी आतंकवादी मारले गेले होते आणि फक्त एकच होता तो सलाह अब्देसलाम जो फ्रांस सोडून बेल्जीयमला पळून गेला होता.

सलाह अब्देसलामचा जन्म ब्रसेल्समध्ये झाला होता पण त्याने फ्रान्सचं नागरिकत्व स्वीकारलेलं होतं. अगोदर तो छोट्यामोठ्या गुन्ह्यांमध्ये जेलवारी करून आला होता. पण पुढे चुकीच्या संगतीला लागला आणि आतंकवादी बनला. पण तो वाचला कसा याची पण एक थरारक स्टोरी आहे.

खरंतर सलाह अब्देसलाम हा पॅरिसमधेच मेला असता. पॅरिसमध्ये ज्या ज्या आतंकवाद्यांनी हल्ला केला त्यांच्या वाहतुकीची जबाबदारी हि सलाह अब्देसलामवर होती. सगळ्यात शेवटी तो स्वतःचा सुसाईड बेल्ट डिटोनेट करणार होता. पण ऐन वेळी त्याचा तो सुसाईड बेल्ट खराब झाला. त्यामुळे त्याने तो बेल्ट भर रस्त्यात टाकून दिला. 

ज्यावेळी तो पकडला गेला तेव्हा त्याने याबद्दल सांगितलं कि,

मी पूर्णपणे लोकांना मारायच्या मनस्थितीत होतो पण ऐन वेळी माझं हृदयपरिवर्तन झालं पण त्याच्या फ्लॅटमध्ये सापडलेल्या कॉम्युटर डायरीत त्याने लिहून ठेवलं होतं कि, मैं भी बाकियों की तरह शहीद होना चाहता था लेकिन अल्लाह की मर्ज़ी कुछ और ही थी. मेरे बेल्ट में खराबी थी. और, मुझे उसे फेंकना पड़ा.

सलाह अब्देसलाम कसा पकडला गेला तर ब्रसेल्समधल्या एका अपार्टमेन्टमध्ये पोलीस आपली रेग्युलर झडती घेत होते. पण अचानक पोलिसांवर हल्ला झाला आणि तेही तीन जणांनी. या हल्ल्यात पोलिसांनी एकाला गारद केलं तर दोन जण पळून गेले. अपार्टमेन्टमध्ये फॉरेन्सिक टीम जेव्हा पोहचली तेव्हा सलाह अब्देसलामचा डीएनए मिळाला. याआधारावर पोलिसांनी तीन दिवसांच्या आत सलाह अब्देसलामला बेड्या ठोकल्या.

ब्रसेल्समध्ये झालेल्या अजून एका आतंकी हल्ल्याबद्दल सलाह अब्देसलामला माहिती होती पण पोलिसांना ती मिळवता आली नाही. पुढे फ्रांसमध्ये कोर्ट ट्रायल सुरू राहिली आणि २० वर्षांची शिक्षा झाली. १३० लोकांची हत्या केल्याचा आरोप सलाह अब्देसलामवर होता पण त्याची ठोस शिक्षा अजूनही मिळालेली नाही. 

त्याला अटक झाल्यानंतर पोलिसांना दिलेल्या उत्तरात त्याने आपल्या आईला एक चिठ्ठी लिहिली होती आणि त्यात मजकूर होता

अल्लाह ने मुझे रास्ता दिखाया और मेरी राह खोलने के लिये उसने मुझे भी अपने मुलाजिमों में शामिल किया. यही वजह है कि मैं अल्लाह के दुश्मनों से अपनी पूरी ताकत से लड़ा…

अजूनही फ्रांस कोर्ट ट्रायल ऐतिहासिक वाटत असला तरी त्यामागची ही हल्ल्याची गोष्ट विकृतच आहे.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.