बिहारमध्ये अफवा पसरलीय, “घरातल्या सगळ्या पोरांना पार्ले जी खायला घाला, नाहीतर…”

प्रत्येकाच्या लहानपणीची कॉमन आठवण म्हणजे पार्ले जी बिस्कीट. चहात बुडवून खाल्लेलं नाहीतर पाण्यात बुडवून,  वाढदिवसाच्या दिवशी भेट म्हणून मिळालेलं किंवा दिलेलं हमखास बिस्कीट म्हणजे पार्ले जी बिस्कीट. त्यामुळंच प्रत्येकाच्या लहानपणीच्या आठवणीत पार्ले बिस्किटाचा एक तरी किस्सा असतोच. याचा संबंध ९० च्या पिढीशी जरा जास्त जवळचा आहे.

आता  सध्याच्या बिस्किटात वेगवेगळ्या व्हरायटी आल्यात, पण पार्ले जीला कोणाची तोडचं नाही. अनेक कंपन्या बाजारात उरल्यात, वेगवेगळे फ्लेवर्सना लोकं देखील पसंती दाखवायला लागलीत. त्यामुळे पार्ले जीचं डिमांड जरा कमी झालाय. पण अजूनही कंपनीला टॉपला आहे. त्यात आता बिहारमध्ये या पार्ले जी’साठी मोठं मोठ्या रांगा लागल्यात.

यामागचं कारण म्हणजे  अफवा

आता भारतात अफवांची कमी नाही, इथली भोळी- भाबडी जनता सुद्धा कोणत्याही अफवेवर लवकर विश्वास ठेवते. पण बिहारच्या सीतामढी भागात पार्ले जी बिस्किटाची एक अफवा इतक्या वेगाने पसरली की, तिथल्या सगळ्या किराणा दुकानात, टपऱ्यांवर पार्ले जी बिस्किट घेण्यासाठी एकचं गर्दी उडालीये.

आता ही अफवा काय होती तर, सीतामढीमध्ये पार्ले जी बिस्किटला जितिया उत्सवाशी जोडून ही अफवा पसरवली गेली. ज्यात म्हणतात गेलं की,  घरातील सगळ्या पोरांना- सोरांना पार्ले जी बिस्किट खायला घाला, नाहीतर त्यांच्यासोबत काहीतरी वाईट घटना घडू शकते.

आता जितिया उत्सवाबद्दल सांगायचं झालं तर आपल्या मुलांच्या दीर्घ, निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी महिला मंडळ या दिवशी उपवास ठेवतात.

मग काय होणार होत, आपल्या पोराच्या जीवाचा प्रश्न आहे म्हंटल्यावर पार्ले जी बिस्किटे खरेदी करण्यासाठी दुकानांवर मोक्कार गर्दी  जमली. इथल्या कुठल्याही दुकानावर जा, पार छोट्या टपऱ्यांपासून ते मोठं मोठ्या किराणा दुकानांपर्यंत, जो कोणता ग्राहक यायचा जो पार्ले जी बिस्कीट हमखास मागायचा. कोणी कोणी तर ५ रुपयांचा हा पार्ले जी बिस्कीट घ्यायलाचं खास गर्दीत उभा राहिला. 

अफवेची भीती इतकी भीषण होती की, तिथल्या दुकानांमधून पार्ले जी बिस्किटचा साठाचं संपला. एवढंच नाही, लोक अजूनही या अफवेवर विश्वास ठेवत आहेत. ही अफवा सीतामढी जिल्ह्यातील बैरगनिया, ढेंग, नानपूर, डुमरा, बाजपट्टी, मेजरगंजसोबत बऱ्याच भागात हीअफवा पसरली आहे.

या भागातली सगळी मंडळी गुरुवारी पार उशिरापर्यंत पार्ले जी बिस्किट खरेदी करताना दिसली. आता जिथं साठा संपलाय, त्या दुकानदारांनी आपल्याला पण फायदा होतोय म्ह्णून अर्जंट पार्लेचा मोठ्या संख्येने माल  मागवला आणि त्यासाठी लोक थांबली सुद्धा. 

आता ही अफवा कधी पसरली, कुठून पसरली आणि महत्वाचं म्हणजे कोणी पसरवली, हे अजूनतरी कळलं नाही. पण या अफवेमुळे पार्ले कंपनीला आणि तिथल्या दुकानदारांना फायदा झाला हे मात्र नक्की..

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.