म्हणून आदिलशाहच्या बेगमने परशुरामाचं मंदिर उभारलं

खोटं कशाला सांगा. इथं प्रत्येक धर्म आणि जातीसाठी विशेष असा देव आहे. ह्यो आमचा आणि तो आमचा म्हणून जशा धर्मात देवांच्या वाटण्या झाल्या तशाच वाटण्या जातीजातीत झाल्या.

प्रत्येकाने आपआपला देव कसा चांगला आहे हे सांगण्यासाठी दंतकथा रचल्या. तस म्हणलं तर परशुराम देखील ३३ कोटी देवांमधला एक देव. पण ब्राह्मण समाजाचा देव म्हणून हे दैवत्व जास्त प्रसिद्ध आहे.

परशुरामाच्या अवतीभवती देखील अनेक कथा रचल्या गेल्या काही नंतर आल्या तर काही परशुरामाच्या सुरवातीपासूनच प्रसिद्ध होत्या.

या कथा किती खऱ्या किती खोट्या हे विचारू नये. प्रश्न विचारायचे नसतात. आपण फक्त या दंतकथा वाचू. विश्वास ठेवायचा असेल ते ठेवतील. नाही ठेवायचा ते नाही ठेवणार.

परशुरामाने स्वत:च्या आईची रेणुका मातेची हत्या केली होती का?

परशुराम हे विष्णुचे सहावे अवतार म्हणून ओळखले जातात. ते चिरंजीवी आहेत असही सांगितलं जातं. परशुरामांनी आपल्या आईची हत्या केल्याची गोष्ट प्रसिद्ध आहे. तर झालं काय की,

हवन करण्याच्या हेतून पाणी आणण्यासाठी रेणुका माता गंगा तटावर गेल्या. तिथे त्यांना गंधर्वराज चित्ररथ आपल्या अप्सरांसोबत विहार करताना दिसले. रेणुका माता त्यांना पाहू लागली.  यात पाणी आणण्यासाठी वेळ झाला. पाणी घेवून आल्यानंतर जनदग्नि अर्थात रेणुका यांचे पती व परशुराम यांचे वडिल यांनी रेणुकांना विचारले की इतका वेळ कुठे होती?

रेणुका मातेंनी काहीच उत्तर दिलं नाही तेव्हा जमदग्नि यांनी आपल्या त्रिकाळदृष्टीने पाहीलं की रेणुका राक्षसविहार पहात होती. जनदग्नि क्रोधीत झाले. त्यांनी आपल्या मुलांना एका रांगेत उभा केलं आणि आईचं शीर धडापासून वेगळं करण्याची आज्ञा दिली. मुलांची हिंम्मत झाली नाही. पण विष्णु अवतार असणाऱ्या परशुरांनी वडिलांची आज्ञा फॉलो केली आणि आपल्या परशुने आईचं डोकं धडावेगळं केलं.

इथे गोष्ट संपत नाही. जनदग्नि आपल्या मुलावर खूष झाले आणि म्हणाले वर माग. तेव्हा परशुरामाने आईला पुन्हा जिवंत करण्याचा वर मागितला आणि रेणुका पुन्हा जिवंत झाली अशी ती गोष्ट.

परशुरामाने २१ वेळा पृथ्वी निक्षत्रीय केली होती का ?

मुळात प्रश्न पडतो २१ वेळाच का?  पहिल्या वेळी काही क्षत्रिय वाचले असतील तर दूसऱ्यांदा हे लॉजिक असेल तर २१ व्या वेळी पण वाचले असतील की?

याचासाठी गोष्ट व्यवस्थित वाचावी लागले.

२१ वेळा निक्षत्रीय नाही तर निक्षत्रीय करण्यासाठी परशुरामाला २१ वेळा युद्ध करावं लागल्याचं काहीजण सांगतात. त्यातही सर्वच क्षत्रिय नसून हैहयवंशीय क्षत्रीयांची परशुरामाने हत्या केली.

याबद्दलची गोष्ट अशी की, सहस्त्रार्जून या हैहयवंशीय राजाने तप करुन दत्तात्रयांना प्रसन्न केलं होतं. त्यामुळे त्यांना १ हजार हात होते. त्याचबरोबर युद्धात पराभव होणार नाही असा वर देखील मिळाला होता.

Parasurama killing Sahasrarjuna

हे सहस्त्रार्जून एकदा जनदग्नि अर्थात परशुराम यांच्या वडिलांच्या आश्रमात गेले होते. तिथे त्यांना कामधेनू ही गाय दिसली. बळाचा वापर करुन त्यांनी ही कामधेनु गाय आपल्यासोबत नेली.

क्रोधीत झालेल्या परशुरामाने आपल्या परशुने सहस्रार्जुन यांचे हजार हात कापून टाकले. डोकं कलम केले आणि गाय परत आणली. त्यानंतर परशुरामांच्या अनुपस्थितीत सहस्त्रार्जूनांच्या मुलांनी जमदग्निच्या आश्रमात जावून जमदग्नि यांना ठार केले. त्यातच रेणुका सती गेल्या.

हे सर्व परशुरामाला कळाल्यानंतर त्यांनी पृथ्वीवरून हैहयवंशीय क्षत्रीय नष्ट करणार असल्याची प्रतिज्ञा केली.  बदला पुर्ण झाल्यानंतर महर्षि ऋचीक यांना परशुरामाला अस करु नये म्हणून सांगितलं आणि प्रकरण थांबल्याच सांगण्यात येत. पण पृथ्वी निक्षत्रीय झाले हे सांगून पुढे अनेक वर्ष गोष्टी घडत गेल्या.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकास देखील ते क्षत्रीय नसल्याचं कारण देवून विरोध करण्यात आला होता. तर कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या विषयी विदोक्त प्रकरण घडले त्यालाही ते क्षत्रिय नसल्याची मान्यता देण्यात आली होती. व त्यास आधार परशुरामाने पृथ्वी निक्षत्रीय केली असे सांगण्यात आले. 

त्याचबरोबरीने असही सांगतात की, परशुराम जेव्हा रामास भेटला तेव्हा क्षत्रिय कुलात विष्णु जन्माला आले आहेत म्हणून त्यांने निक्षत्रीय करण्याचे सोडून दिले.

आत्ता अजून एक गोष्ट ती म्हणजे परशुरामाने समुद्र पाठीमागे सारून कोकण तयार केला का ?

गंमत म्हणजे प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावरील राज्यात ही गोष्ट सांगितले जाते. भारतभरात अस सांगतात की परशुरामाने समुद्र मागे सारून केरळ तयार केले. गुजरातमध्ये गुजरातचा किनारा तयार केल्याचं सांगण्यात येत. त्याचपद्धतीने महाराष्ट्रात कोकण तयार केल्याचे सांगण्यात येते.

माहुर गडावर रेणुका मातेच्या मंदिराच्या पाठीमागे परशुरामाचे एक प्राचीन मंदिर आहे. त्याच बरोबरीने उत्तर प्रदेशातील जौनपूर बावर येथे ४०० वर्षे जुने परशुराम मंदिर आहे.

पण सर्वांना माहित असणारं परशुरामाचं मंदिर म्हणजे चिपळुणजवळचं असणार महेंद्रिगिरी डोंगरावरील मंदीर. याला लोटे परशुराम देखील म्हणतात. 

या मंदिराचं वैशिष्ट म्हणजे या मंदिराच्या रचनेत मोगल वास्तुकलेचा प्रभाव आहे. मंदिराचे घुमट सरळ उतार असलेले अष्टकोनाकृती आहेत. त्याबाबत हे मंदिर आदिलशहाच्या बेगमांपैकी एका बेगमने उभारल्याची कथा सांगण्यात येत. 

कथा अशी की, 

या आदिलशहाची बेगम कोकणात होती तेव्हा तीची तारवे समुद्रात बुडाली होती. कोणीतरी बेगमला सांगितले की समुद्राचा देव म्हणजे परशुराम. परशुरामाला नवस बोल. त्यानंतर बेगमने परशुरामास नवस बोलला. काही काळानंतर तारवे समुद्रास सुखरुप लागले. त्यामुळे बेगमने परशुरामाचे मंदिर बांधून हा नवस फेडला.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.