फाळणीच्या वेळी टाईपरायटरची सुद्धा वाटणी झाली होती. ते ही टॉस करून !
१५ ऑगस्ट १९४७ ला आपला भारत देश स्वतंत्र्य झाला. त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच १४ ऑगस्टला पाकिस्तान भारतापासून वेगळा होऊन स्वतंत्र देश बनला. मात्र, या दोन्ही देशांचे विभाजन केले जाईल हा निर्णय महिनाभर आधीच ३ जून १९४७ ला घेण्यात आला होता.
पण हे विभाजन इतकं सोपे नव्हतं, कारण बऱ्याच गोष्टींची वाटणी होणार होती आणि फक्त ७३ दिवस बाकी होते.
भारत-पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी सार्वजनिक पैसा, पाणी आणि जमीन यांच्यासह अशा अनेक गोष्टींची विभागणी करण्यात आली ज्यावर विश्वास ठेवण कठीण आहे. फाळणीमुळे १ कोटी लोकांना स्थलांतर करावं लागलं होत. हे अजूनही जगाच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं स्थलांतर होतं.
फाळणीच्या वेळी एका फिरंगी रॅडक्लिफला दोन्ही देशांच्या बॉर्डर ठरवण्याची जबाबदारी देण्यात आली आणि त्याने भारताच्या भूमीवर जात, धर्म, संस्कृती या सगळ्या गोष्टींचा विचार न करता दोन्ही देशांच्या सीमा कागदावर उतरवल्या.
आता उरलेल्या सामानांची पाळी होती, ज्यांची वाटणी देखील ठराविक वेळेत सेट केलेल्या पॅरामीटर्सनुसार करायची होती. यासाठी शाब्दिक युद्धापासून सर्व प्रकारचे डावपेच खेळले गेले आणि शेवटी बऱ्याच प्रयत्नांनंतर हा प्रश्नही सोडवण्यात आला.
या दरम्यान, दिल्लीतील दोन लोकांना संपत्ती आणि मालमत्तेच्या वाटपासाठी अटी आणि शर्ती ठरवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. एच एम पटेल हे भारताचे प्रतिनिधी होते आणि चौधरी महंमद अली हे पाकिस्तानचे वकील होते.
जून ते ऑगस्ट पर्यंत दोघांनी संपत्तीच्या वाटपासाठी आणि कागदाच्या छोट्या तुकड्यांच्या वाटपासाठी संघर्ष केला. दोघेही परदेशी विचार आणि इंग्रजी कायदा आणि सुव्यवस्था या लाल फितीने बांधलेल्या फाईल्समध्ये अडकले होते.
अशा परिस्थितीत जाणून घेऊ की, भारत-पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी अशा कोणत्या गोष्टींची वाटणी करण्यात आली होती.
१- भारत-पाक विभाजनाच्या वेळी, पहिला दावा देशाच्या नावाने करण्यात आला. या नावावर भारताने दावा केला की, आम्हाला ‘भारत’ नावाचा अधिकार असेल. मात्र, पाकिस्तानी प्रतिनिधीने यावर आक्षेप घेतला, पण नंतर हा प्रस्ताव मान्य करण्यात आला.
२- भारत-पाक विभाजनादरम्यान, सार्वजनिक पैशाचे पाणी-जमीन यांची वाटणी तर होतीच पण सोबतच सर्व कार्यालयांची कॉपी-पुस्तके, टेबल-खुर्च्यांपासून टाइपरायटर आणि पेन्सिलची सुद्धा वाटणी करण्यात आली.
३- भारतात असलेल्या ‘राष्ट्रीय ग्रंथालय’ च्या पुस्तकांचे देखील वाटप केले गेले. या दरम्यान, ग्रंथालयाच्या एका शब्दकोशाला फाडून दोन्ही देशांमध्ये अर्ध-अर्ध वाटण्यात आले. याशिवाय, ‘एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका’ ला देखील वाटण्यात आले.
४ – भारत-पाक विभाजनादरम्यान, पगडी, बल्ब, पेन, काठी, बासरी, टेबल, खुर्ची, रायफल या छोट्या छोट्या गोष्टींचेही वाटप करण्यात आले.
५- भारत-पाक विभाजनाच्या वेळी, लोकसंख्येच्या आधारावर सगळ्यात आधी रूपया वाटण्यात आला. बँकांमध्ये असलेल्या पैशांपैकी भारताला ८२.५ टक्के आणि पाकिस्तानला १७.५ टक्के रक्कम मिळाली. तर जंगम मालमत्तेचा भारताला ८० टक्के वाटा मिळाला आणि पाकिस्तानला २० टक्के.
६- स्वातंत्र्यानंतर, भारतात राहिलेल्या ब्रिटिश व्हॉईसरॉयच्या बग्ग्यां नाणे फेकून वाटल्या गेल्या. या दरम्यान ६ बग्ग्या भारताला आणि ६ पाकिस्तानला देण्यात आल्या. नाणेफेक जिंकल्यावर भारताला ही बग्गी मिळाली.
७- भारत-पाकच्या फाळणीच्या वेळी, ज्यांच्या क्षेत्रात रस्ते आणि रेल्वे होत्या त्या तर वाटल्या गेल्याच, सोबत रेल्वेचे डबे, इंजिन, बुलडोझर आणि ट्रक यांचही वाटप करण्यात आलं.
८ -भारत-पाक फाळणीच्या वेळी अशी एक गोष्ट घडली ज्याबद्दल कधीही वाद झाला नाही. ती वस्तू होती वाइन. या दरम्यान, सर्व दारू व्यवसाय भारताच्या भागात आले, मुस्लिम देश पाकिस्तानने दारू मागितली नाही.
९- जेव्हा व्हाईसरायच्या सन्मान आणि शाही दर्जानुसार त्याच्या फेरफटक्यासाठी बनवलेली सोनेरी आणि पांढरी ट्रेन भारताच्या वाट्याला आली, तेव्हा भारतीय सैन्यदलाच्या कमांडर-इन-चीफ आणि पाकिस्तानचे राज्यपाल यांची वैयक्तिक वाहने पाकिस्तानला मिळाली.
१०- भारतीय सैन्याची फाळणी सर्वात दुःखद होती. २५ लाखांच्या फौजेचे विभाजन करण्यासाठी, सर्व सैनिकांना एक फॉर्म देण्यात आला, कोणाला कोठे जायचे आहे? या दरम्यान, हिंदू आणि शीख सैनिकांनी भारताची निवड करणं योग्य मानलं.
११ – सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वामुळे ‘गुप्तचर विभाग’ मध्ये कोणतेही रेकॉर्ड शेअर केले गेले नाही. गुप्तचर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले की या विभागाचा एकही कागद आणि पेन पाकिस्तानात जाऊ देणार नाही.
हे ही वाच भिडू :
- कधीही भारतात पाऊल न ठेवलेल्या माणसाने देशाचे तुकडे केले होते !
- फाळणीमुळे मंटो पाकिस्तानला गेला पण जाताना भारतीय फिल्म इंडस्ट्रीला प्राण मिळवून दिला..
- फाळणीमुळे रखडलेला मुगल ए आझम पूर्ण व्हायला १४ वर्ष लागली