FTII मध्ये कचरा गोळ्या करणाऱ्या पार्वतीबाईंनी २० पेक्षा जास्त पिक्चरमध्ये काम केलं आहे

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या (FTII) नियामक अध्यक्ष म्हणून अभिनेते गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नियुक्तीला FTII मधील विद्यार्थ्यांचा विरोध होता. आणि त्या विरोधात आंदोलन सुरु केले होते.  

बॉलीवूड मध्ये FTII चं नाव मोठं आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे सगळ्या देशाचं लक्ष होत. FTII च्या गेटवर हे आंदोलन चालायचं. यात कपाळाला भलं मोठं कुंकू लावलेल्या आज्जी सहभागी असायच्या. त्यामुळे आज्जीकडे सगळ्यांचं लक्ष जायचं. 

मग प्रश्न पडला की, हे आंदोलन तर FTII चे विद्यार्थी करत आहेत. यात एकआज्जी का सामील झाल्या आहेत.    

त्यानंतर कळालं की, त्यांचे नाव पार्वती लिंबाजी सूर्यवंशी आहे. त्यांनी आतापर्यंत FTII च्या विद्यार्थ्यांच्या २० पेक्षा जास्त पिक्चर मध्ये काम केले आहेत. यातील काही पिक्चरला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्थरावर चांगले यश मिळाले आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी पार्वती सूर्यवंशी यांचा पुण्यात मृत्यू झाला. 

FTII बद्दल विचारल्यावर नेहमी त्या म्हणायच्या, माझं कोणीही नाही, FTII हेच माझे माहेर आहे.  

पारुबाई म्हणून त्या सगळ्या FTII मध्ये फेमस होत्या. १९७२ च्या दुष्काळ नंतर सोलापूरवरून पुण्यात आल्या होत्या. ज्येष्ठ समाज सेवक बाबा आढाव यांच्याकडे त्यांनी काम मिळेल का म्हणून विचारणा केली होती. तेव्हा बाबा आढाव यांनी FTII कचरा गोळा करणाऱ्याची गरज असल्याचे सांगितले होते. 

असा प्रकारे पारुबाई FTII मध्ये आल्या. काही वर्षांपर्यंत पारुबाई कागद, कचरा जमा करण्यासाठी सगळं FTII कॅम्पस फिरायच्या. हे जमा झालेला कचरा विकायच्या आणि त्यावरच त्यांचा घर खर्च चालायचा. मात्र, वय वाढल्यानंतर त्यांनी हे काम थांबवले होते. 

पारुबाईच्या कपाळाला भलं मोठं कुंकू असायचे. 

त्यात त्या रंगी बेरंगी साड्या घालत. FTII कॅम्पस मध्ये कचरा वेचायला आल्या की, त्यांना तेथील विद्यार्थी ऍक्टिंग करणार का म्हणून विचारायचे. त्या FTII मधील विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्ट मध्ये काम करू लागल्या. त्याबदल्यात त्यांना पैसे मिळू लागले होते. 

पारुबाईना यांना कोणताही अभिनयाचा अनुभव नव्हता. मात्र, शिकण्याची त्यांच्यात जिद्द होती.  विद्यार्थांनी ऍक्टिंग करणार का असं विचारल्यावर तुम्ही शिकवलं तर नक्की करेल असं उत्तर द्यायच्या. १० वर्षांपूर्वी त्यांनी त्यांच्या पतीला आणि एक मुलाला गमावले आहे.

२००९ मध्ये पार्वती बाईंना पिक्चर मध्ये काम करण्यासाठी ११ हजार मिळाले होते. त्यांनी त्या पैशाने स्वतःसाठी झोपडी बनविली होती. दुसरा मुलगा त्यांना पोसत नव्हता. 

IMDB वर पारुबाई यांचे पेज आहे. त्यावर २०१५ आलेल्या कामाक्षी आणि २०१३ मध्ये मकारा या पिक्चर अभिनेत्री म्हणून ओळख सांगितली आहे. सतींदर सिंग बेदी याने  FTII मधील डिप्लोमा दरम्यान करुणा देवी या पुराणातील एक कथेवरून कामाक्षी चित्रपट बनवला आहे. या पिक्चरने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्थरावर चांगले नाव मिळविले होते. 

इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, मुंबई फिल्म फेस्टिवल मध्ये ‘कामाशी’ पिक्चरला पुरस्कार मिळाले होते. त्यात पारूबाईने दुष्काळी भागात पाणी पुरविणाऱ्या वृद्ध जिद्दी बाईचा रोल केला होता. त्या मुख्य भूमिकेत होत्या. तर मकारा २०१३ मध्ये रोम फिल्म फेस्टिवल मध्ये प्रदर्शित झाला होता.       

कामाक्षी चित्रपट पाहून अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पारुबाईंकडे एक माणसाला पाठविले होते आणि तुम्ही कधी पासून पिक्चर मध्ये काम करायला सुरुवात केली का ? असा प्रश्न विचारला होता. तसेच चांगले काम केल्याचे सुद्धा सांगितले असल्याची आठवण पारुबाई अनेकवेळा सांगायच्या.

कामाक्षी पिक्चर गाजल्यानंतर पुण्यातील पेपर मध्ये कचरा वेचक बनल्या अभिनेत्री अशी बातमी छापून आली होती. त्यानंतर त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली आणि ऍक्टिंग करणार का म्हणून विचारणा करण्यात येऊ लागली होती.

अडाणी आहे मुलांनी शिकवलं आणि मी ऍक्टिंग शिकल्याचे पारुबाई सांगत.

त्या पिक्चरच्या शुटिंग बद्दल नेहमी उत्साही असायच्या. FTII विद्यार्थांनी कधीही बोलावलं तर त्या यायच्या. शूटिंग सुरु झाल्यापासून पॅक अप होई पर्यंत त्या तिथेच थांबलेल्या असायच्या. FTII हे त्यांच्यासाठी दुसरे घर बनले होते. साधारण ३० वर्षे त्यांनी या कॅम्पस मध्ये काढले होते.  

पारुबाई यांचा स्वतःच्या मुलाने त्यांचा सांभाळ केला नाही. मात्र FTII मुलांनी शेवटपर्यंत पारुबाईची साथ दिली. त्यांना काय हवं काय नको हे सुद्धा पाहत होते. 

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.