रीलीझच्या ५ दिवसात पठाणने ५ मोठे रेकॉर्ड्स केलेत…

शाहरुख खाननं तब्बल ४ वर्षांनंतर बॉलीवूडमध्ये पुनरागमन केलंय. २०१८ च्या झीरो नंतर थेट यंदा आलेला पठाण या सिनेमात तो मुख्य अभिनेत्याच्या रोलमध्ये दिसतोय. मधल्या काळात त्याने काही कॅमिओ रोल केले होते, पण त्याची असलेली ‘किंग खान’ची ओळख टिकून राहील असा रोल पठाणमध्ये त्याने केलाय असं त्याचे चाहते बोलतायत.

रीलीझ होईपर्यंत पठाण हा चित्रपट अतिशय वादग्रस्त राहिला.

पठाण चित्रपट येणार म्हणून त्याचे फॅन्स खूष होते. त्याच्या नावाने ट्विटरवर #KingIsBack , #KingKhan असे ट्रेंड सुरू झाले. सगळं व्यवस्थित सुरू होतं आणि तेव्हा पठाण चित्रपटातलं बेशर्म रंग हे गाणं रीलीझ झालं. हे गाणं रीलीझ झाल्यानंतर मग वाद व्हायला सुरूवात झाली.

विषय असा झाला की, या गाण्यात शाहरूख आणि दीपिकाचा काहीसा रोमँस दाखवलाय आणि गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बीकिनी घातली आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांच्या भावना दुखावल्या गेल्याने या संघटना आक्रमक झाल्या. 

पठाण विरोधात निदर्शनं झाली, मोर्चे झाले आणि थेट सिनेमा रीलीझ न होऊ देण्याच्या धमक्याही देण्यात आल्या, पण मग सेन्सॉर बोर्डाने आवश्यक ते बदल करून घेतले आणि चित्रपट रीलीझ झाला.

आता हा पठाण चित्रपट नुसता रीलीझ नाही झालाय तर, त्याने अनेक रेकॉर्डही तोडलेत.

सगळ्यात पहिला रेकॉर्ड आहे तो प्री-बुकिंगचा.

पठाणने रेकॉर्ड मोडायला सुरूवात केली ती पिक्चर रीलीझ होण्याच्याह आधीच. खरंतर सिनेमा रीलीझ होण्याच्या आधी हा पाहण्यासाठी प्री-बुकींग सुरू झालं होतं. या प्री-बुकींग किंवा अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत सर्वाधिक रक्कम कमवणारा चित्रपट म्हणून समोर आलाय. जवळपास ५०-५५ कोटींचं फक्त अ‍ॅडव्हान्स बुकींग या चित्रपटाचं झालं होतं. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या वॉर सिनेमाचं अ‍ॅडव्हान्स बुकींग हे ४२ कोटींचं झालं होतं.

हिंदी भाषेतल्या फिल्मने ओपनिंग डेला केलेल्या कमाईचा रेकॉर्ड.

ओपनिंग डे ला १०० कोटी रुपयांची कमाई ही पठाणने केली. ही आतापर्यंत फक्त बॉलीवूडच  नाही तर टॉलीवूड, हॉलीवूडच्या हिंदी भाषेतील  चित्रपटांनीही पहिल्या दिवशी इतकी कमाई केलेली नाही. त्यामुळे, पहिल्या दिवशी सर्वात जास्त कमाई केलेला हिंदी भाषेतील पिक्चर म्हणून पठाणने रेकॉर्ड केलाय.

ओपनिंग डेला परदेशात केलेल्या कमाईचा रेकॉर्ड.

पहिल्याच दिवशी साधारण ४५ कोटींपेक्षा जास्त कमाई ही पठाणने केलीये त्यामुळे, आतापर्यंतच्या बॉलिवूड चित्रपटांमधला पहिल्या दिवशी परदेशात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा रेकॉर्डही पठाणने नावावर केलाय.

ओपनिंग डेला वर्लडवाईड सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट:

पहिल्याच दिवशी पठाणने वर्ल्डवाईड १०० कोटींपेक्षा अधिकची कमाई केलीये त्यामुळे ओपनिंग डेला वर्ल्डवाईड सर्वाधित कमाई करणारा चित्रपटाचा रेकॉर्ड पठाणने केलाय.

नॉन हॉलिडेला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट.

साधारणपणे एखादा चित्रपट हा शुक्रवारी रीलीझ होतो. त्यामागचं कारण असं आहे की, शनिवार रविवार लोकांना सुट्टी असते आणि लोक मनोरंजनासाठी सिनेमागृहांकडे जाण्याची शक्यता जास्त असते. असं असलं तरी, पठाण मात्र बुधवारी रीलीझ करण्यात आला होता. आणि त्याच दिवशी पठाणने भारतात ५५ कोटींची कमाई केली. त्यामुळे नॉन हॉलिडेला सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा रेकॉर्ड पठाणने आपल्या नावावर केलाय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.