या साडीच्या डिझायनची नक्कल केली तर जेलमध्ये जायला लागेल !

गुजरात के खून मैं ही ब्यापार हैं साहाब ! रईस पिक्चरमधला शाहरूख खानचा हा डॉयलॉग. तसही शाहरूख बोलला नसता तरी आपल्याला माहितच आहे की, गुजरातच्या नसनसात फक्त आणि फक्त व्यापार भिनलेला आहे ते. तर हि गोष्ट त्याचं गुजरातची. 

मुद्दा असा की एक साडी आहे. त्या साडीचं डिझाईन तुम्ही कॉपी केलं तर तुमची रवानगी थेट तुरूंगात होवू शकते. त्या साडीचं नाव पटोला साडी. हा किस्सा त्याच पटोला साडीचा. 

पटोला साडी नेमकी आली कोठून ? 

गुजरातमध्ये एक प्राचीन शहर आहे. त्याच नाव पाटण. तर या पाटण शहरात इतिहासात प्रसिद्ध असणारी “राणी की वाव” आहे. वाव म्हणजे थोडक्यात मोठ्ठी विहीर. आत्ता हि “राणी की वाव” १०० रुपयांच्या नोटेवर सुद्धा आली आहे. असो तर या राणी की वाव चा इतिहास म्हणजे पाटणची राणी उदयमती हिने आपल्या राजाच्या स्मरणार्थ या वावचं निर्माण केलं. ६४ मीटर लांब आणि २७ मीटर खोल असणाऱ्या या वावच्या भितींवर सुरेख अस नक्षीकाम करण्यात आलं आहे. हे नक्षीकाम करण्यासाठी त्या सुमारे ७ वर्षांचा वेळ लागला होता. 

तर असं हे सुरेख नक्षीकाम राणीला इतकं आवडलं की तिने आपल्या कारागिरांकडून ते खास अस आपल्या साडींवर करुन घेतलं. तीने स्वत: तर हे नक्षीकाम शिकलच पण आपल्या निवडकच सहकाऱ्यांनी तीने हे नक्षीकाम शिकण्यास परवानगी दिली होती. त्यातून साडीवरचं जे नक्षीकाम तयार झालं ते अजोड अस होतं. त्यामुळेच या साड्यांना वेगळंपण प्राप्त झालं. या साड्यांनाच पटोला साडी अस नाव मिळालं. 

Screen Shot 2018 08 27 at 7.06.10 PM 1

या साड्या बनवताना अट एकच होती ती म्हणजे या साड्या फक्त राजघराण्यातील महिलांना वापरण्यासाठी उपलब्ध होत्या. त्या साड्या बनवण्यासाठी काही खासच कारागिर नेमण्यात आले होते. प्रत्येक धागा एकमेकांमध्ये जोडूनच अस नक्षीकाम करण्यात येत होतं. या सगळ्या गोष्टींमुळे झाल अस की, एक साडी बनवण्यासाठी कारागिरांना एक वर्षांचा अवधी लागत होता. थोडक्यात सांगायचं झालं तर राणीने खास आपल्यासाठी अशा या साड्या निर्माण केल्या होत्या. ते हि अकराव्या शतकात आणि हे सगळं भारताच्या स्वातंत्र्यापर्यन्त सुखाने चालू होतं म्हणजे कसं तर या साड्या फक्त राजघराण्यांपुरत्याच मर्यादित होत्या. 

त्यानंतरचा काळ आला लोकशाहीचा. राजघराणे संपली आणि या साडीचं देखील लोकशाहीकरण झालं. मात्र हे लोकशाहीकरण फक्त आणि फक्त पैशांवरती आधारलेलं होतं. म्हणजे कसं ? तर ज्यांच्याकडे हि साडी खरेदी करण्याइतके पैसे असतील तर हमखास ती व्यक्ती या साड्या खरेदी करु शकत होती. पण पैसे किती लागत होते तर १९४७ सालात या साड्यांची किंमत होती शंभर रुपये !!! या किंमतीमुळेच भलेभले लोक देखील या साडीच्या वाट्याला कधी गेले नाहीत. 

Screen Shot 2018 08 28 at 3.50.54 PM

दिड लाखांपासून पुढे सुरू होतात या साड्यांच्या किंमती.

सर्वात कमी किंमतीची पटोला साडी तुम्हाला दिड लाखांमध्ये मिळू शकते. ते हि दोन ते तीन वर्षांच्या वेटिंग पिरीयड नंतर. याच महत्वाच कारण म्हणजे आज काही निवडक कारागिरचं या साड्या तयार करु शकतात. साडीमध्ये सोन्या चादिंचे दागिने असतात व यासोबत तुम्हाला त्या धाग्याची गॅरेंटी देखील देण्यात येते. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक कारागिरला एक साडी तयार करण्यासाठी सुमारे सहा ते आठ महिने लागतात. आणि या साड्या बनवतानाचा नियम म्हणजे या एक साडी बनवण्यास सुरवात केल्यानंतर ती पुर्ण होईपर्यन्त दूसरी साडी तयार करण्यासाठी घेतली जात नाही. 

डिझाईन कॉपी केली तर तुरूंगवास नेमका कशासाठी ? 

त्याचं महत्वाच कारण असं की या साड्यांना. २०१४ साली जिओग्राफिकल इंडिकेशन अर्थात GI मानांकन देण्यात आलं आहे. GI मानांकन म्हणजे ती गोष्ट हि त्या भागातीलच असते. त्या वस्तूची कॉपी करण्यास, त्या वस्तूच्या नावाने आपल्या गोष्टी विकण्यास मनाई करण्यात येते. साड्यांची नक्कल करणाऱ्यास सध्या तरी दोन वर्ष तुरूंगवासाची शिक्षा देण्याची तरदूत असल्याचं सांगितलं जातं. 

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.