धडाकेबाज शतकामुळे आयपीएल गाजवलेला पॉल वाल्थटी अचानक कुठे गायब झाला ?
भारतात क्रिकेटला जास्तच महत्त्व दिलं जातं. त्यातल्या त्यात आयपीएल क्रिकेट प्रेमींसाठी कोणत्या उत्सवापेक्षा कमी नाही. कारण एकीकडे या क्रिकेटने लोकांना रोमांचित करण्याचे काम केले, तर दुसरीकडे हार्दिक पंड्या, क्रुणाल पांड्या आणि जसप्रीत बुमराह यासारखे अनेक पटाईतले खेळाडूही दिले, जे जगभरात भारताचे नाव गाजवत आहेत.
दरम्यान, आयपीएलमुळे प्रत्येकाची लाइफ बनतेच असे नाही. प्रत्येक सीजनमध्ये असे काही खेळाडू होते, ज्यांनी आपल्या खास कामगिरीने जगाची मने तर जिंकली, परंतु नंतर त्यांचा पत्ता कोणालाच लागला नाही.
या खेळाडूंमधलं आणखी एक नाव म्हणजे पॉल वाल्थटी. 2011 च्या आयपीएल हंगामात चेन्नईविरुद्ध जबरदस्त शतक ठोकत त्या खेळाडूने संपूर्ण भारताचे लक्ष वेधून घेतले होते. 2011 नंतर आता तो आयपीएलच्या 2018 च्या सीजनमध्येही पोहोचला होता. दरम्यान सध्या तो कुठेय आणि काय करतोय याचा कोणालाच पत्त्या नाही.
… एका शतकाने बनला स्टार
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला नेहमीच ती ऑस्ट्रेलियन टीम म्हणून पाहिलं जात, जी आपल्या जिद्दीच्या सामर्थ्याने आणि जादूई कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जोरावर कधीही सामना पलटू शकते. हेच कारण होते की, त्याला आयपीएल 2011 च्या विजेतेपदासाठी दावेदार मानले जात होते.
तर, पंजाब संघाने 2018 ला टीममध्ये अनेक मोठे बदल केले. यावेळी संघाचा कर्णधार युवराज सिंगऐवजी अॅडम गिलक्रिस्ट होता आणि संघात बहुतेक तरुण खेळाडू होते. अनेक अटकळ आणि दाव्यांदरम्यान या सीजनची सुरूवात झाली, त्यानंतर अख्खा भारत त्यातच मग्न झाला. या सीजनमधल्या 9 व्या सामन्यात चेन्नई आणि पंजाब समोरासमोर होते.
पहिल्यांदा बॅटिंग करताना चेन्नईच्या संघाने विजय (74) आणि बद्रीनाथ (66) च्या जोरावर 188 धावांची विशाल धावसंख्या उभारली. या सामन्यात धोनीने 20 चेंडूत 44 धावांची शानदार खेळीही खेळली.
189 रनच्या स्कोरचा पाठलाग करणे पंजाबला सोपे नव्हते. टीमला अश्विन, मॉर्केल, सूरज रणदिव या गोलंदाजांना सामोरे जावे लागणार होते. प्रत्येकाची नजर अॅडम गिलख्रिस्टवर होती. तो मैदानात ओपनिंगसाठी कोणाबरोबर उतरतो, याची प्रत्येकाला उत्सुकता होती.
यादरम्यान, अॅडम गिलख्रिस्ट आपला साथीदार, मुंबईचा ऑल राऊंडर पॉल वालथ्टी बरोबर मैदानावर दिसला. अॅडमचा निर्णय धक्कादायक होता. पणं, जेव्हा पॉलची बॅट बाहेर आली तेव्हा लोकांना याचं उत्तर मिळालं.
असे म्हटले जाते की नशीब एकदाच संधी देते. त्या सामन्यात पॉललाही असेच वाटले होते.
आयपीएलमधील मोठ्या संधीचा फायदा घेत पॉलने हा सामना संस्मरणीय बनवला. 189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबचा कोणताही फलंदाज खास कामगिरी करू शकला नाही. पॉलने या संधीचा पुरेपूर फायदा उठवत अवघ्या 63 चेंडूत 120 धावांची खेळी करून सर्वात मोलाचा विजय मिळवून दिला. या खेळीत त्याने 19 चौकार आणि 2 षटकारही ठोकले. या खेळीने त्याला स्टार म्हणून लोकांसमोर ठेवले.
या खेळीनंतर, पॉलने पुन्हा एकदा पुढच्या सामन्यात 47 चेंडूंत 75 धावांचा डाव खेळला होता. या सामन्यात त्याने चार विकेटही घेतले. त्याचबरोबर त्याने 46 धावांचा धमाकेदीर डाव खेळत आयपीएलमध्ये स्वत: ला सिद्ध करण्याचा प्रयत्नही केला. यावेळी त्याने तीन सामन्यांमध्ये अशी अविस्मरणीय कामगिरी केली की लोक त्याला पुढचा स्टार मानू लागले, पण त्यांच्यासाठी ही कामगिरी नव्याचे नऊ दिवस अशी ठरली.
यानंतर पॉल कधीही फलंदाजीची धार दाखवू शकला नाही. एकेकाळी आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला पॉल फॉर्मच्या बाहेर होता. त्याचा खराब फॉर्म असा होता की, तो आयपीएलच्या शेवटच्या पाच डावांमध्ये दहाचा आकडाही पार करू शकला नाही.
त्याने शेवटचा सामना हैदराबादविरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्याने अवघ्या 6 धावा केल्या.
कुठेय हा आयपीएल स्टार!
मध्यंतरी इंस्टाग्रामवर टाकलेल्या एका व्हिडीओ मध्ये त्याने आपली सगळी कर्मकहाणी ऐकवली. मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला मोठा फटका बसला. आयपीएलपासून दूर झाल्यानंतर त्याला रणजी क्रिकेट खेळण्याचीही संधी मिळाली नाही. पॉल मुंबई टी-२० लीगमध्ये खेळताना दिसला होता, मुंबई साऊथ सेंटरने 50,000 रुपयांमध्ये त्याला संघाशी जोडले होते. पण तिथे देखील चमकदार कामगिरी न करता आल्यामुळे तो आता गायबच झालाय.
आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल की, पॉल 2002 च्या अंडर -19 टीमचा एक भाग देखील होता. या संघात पार्थिव पटेल आणि इरफान पठाण असे अनेक स्टार खेळाडू होते. दरम्यान, बांगलादेशविरूद्ध डोळ्याच्या दुखापतीमुळे तो विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला. अनं अशा प्रकारे बाहेर पडला की कधीही खेळताना दिसला नाही.
पॉलच्या आयपीएलच्या आकडेवारीबद्दल बोलताना त्याने 23 सामने खेळले. यावेळी त्याने 23 सामन्यांमध्ये 22.95 च्या सरासरीने 505 धावा केल्यात. यादरम्यान, त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी 120 धावांची होती. त्याने आपल्या कारकीर्दीत शतक आणि दोन अर्धशतकेही ठोकली. बॉलिंगमध्ये देखील त्याने 7 विकेट घेतल्या.
पॉल जरी मोठ्या लेव्हलच्या क्रिकेटमधून बाहेर गेला असला तरी तो आज एअर इंडिया सारख्या टीमकडून कॉर्पोरेट लीगमध्ये खेळतो. सध्या त्याच वय ३७ वर्षे असल्यामुळे पुनरागमनाची त्याला कोणतीही संधी नाही. म्हणूनच नवीन खेळाडूंना कोचिंग देणे वगैरे गोष्टीकडे त्याने लक्ष घातले आहे.
हे ही वाच भिडू.
- गृहमंत्री म्हणत होते आयपीएल रद्द करा, मोदी म्हणाले संपूर्ण स्पर्धा गुजरातमध्ये घेऊन दाखवतो
- झहीर खानच्या त्या एका बॉलने अख्ख्या आयपीएलच गणित बदलून टाकलं.
- पहिल्या सिझनपासून आयपीएल खेळणारा एकमेव खेळाडू, जो कधीच लिलावात ‘विकला’ गेला नाही!!!