रशियामध्ये झालेली तेलगळती जगावरच्या नव्या संकटाची नांदी आहे?

काही दिवसांपूर्वी व्हॉट्स ऍप वर एका अतिशय स्वच्छ आणि सुंदर नदीचे फोटो फिरत होते, पण अस वाटतं होत की, त्या नदीत 30 ते 40 ऑईल चे टँकर कुणीतरी पलटी केलेत. तर ती घटना म्हणजे रशिया च्या सायबेरिया प्रांतात झालेली तेलगळती.

रशिया चे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी त्या घटनेची दखल घेत आणीबाणी घोषित केली.

त्या घटनेवर पुतीन महाशयांच म्हणणं असं की,

मला ही घटना “सोशल मीडिया” वरून कळाली!.

ज्या कंपनीत ही ऑईल गळती झाली, त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांना त्यांनी तुफान झापाझापी केली अस कळतंय.

ज्या नदीत ही गळती झाली त्या नदीचं नाव AMBARNAYA.

आणि त्या शहराच नाव NORILSK. (दोन्हीचा उच्चार तुमचा तुम्हीच बघा). ही कंपनी निकेल आणि प्लॅटिनम च उत्पादन करते. आणि कंपनी चालवताना पाळावयाचे हवामानाचे निकष धाब्यावर बसवण्या साठी हि कंपनी बरीच कुप्रसिध्द आहे.

तर NORILSK NICKEL  या कंपनीने सांगितलं की, पर्मा फ्रॉस्ट थाविंग मुळे ऑईल टँक चां एक पिलर ढासळला, आणि त्यामुळे जवळपास २० हजार टन ऑईल गळती झाली.

तर भिडूला प्रश्न पडला हे permofrost thowing काय भानगड आहे?

मग खोलात गेल्यावर माहिती मिळाली ती अशी.

permofost म्हणजे जमिनीचा असा भूभाग, जो सलग २ वर्षांकरिता कायम गोठलेला असतो. आणि त्या भूभागाचे तापमान ० डिग्री सेल्सिअस किंवा उणे -32,  फॅरेनहाईट सेल्सिअस पेक्षा कमी असते. उच्च रेखा वृत्तीय प्रदेशात किंवा उच्च पर्वतीय प्रदेशात हा permofrost भूभाग आढळतो, भारताच्या जवळचा तिबेट हा permofrost भूभाग आहे. आणि thawing म्हणजे हा गोठलेला भूभाग तापमान वाढल्यामुळे वितळणे जसे की जागतिक तापमानवाढ.

पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाचा वन फोर्थ भाग  हा permofrost  मध्ये  मोडतो. permofrost भागातल्या माती, दगड, आणि   वाळूला बर्फाने  गोठवून ठेवलेलं असतं. permofrost जमिनीच्या वरच्या भागाला ‘ ऍक्टिव्ह लेयर’ म्हणतात.  हा ॲक्टिव्ह लेयर उन्हाळ्यात वितळतो आणि हिवाळ्यात  पुन्हा गोठतो.  हा एक्टिव लेयर 15 सेंटिमीटर पासून काही मीटर्स एवढ्या  जाडीचा असू शकतो.

permofrost  मध्ये काय काय असतं?

permofrost  चा काही काही भाग हा शेवटच्या  ‘आईस एज’ पासून बर्फाखालीच आहे.  या permofrost मध्ये प्राणी आणि वनस्पतींचे अवशेष असतात ज्यांचं संपूर्ण पणे विघटन म्हणजे डीकॉम्पोझिशन झालेलं नाही. आणि तसेच या permofrost भागाखाली तब्बल पंधराशे  बिलियन कार्बन आहे. जो वातावरणात असलेल्या कार्बनच्या दुप्पट आहे.

विचार करा तापमानवाढीमुळे हा सगळा permafrost वितळला तर काय होईल?

 

permofrost  नेहमी   गोठलेल्या अवस्थेत असल्याकारणाने त्यांचे विघटन म्हणजेच डीकॉम्पोझिशनच  होऊ शकत नाही किंवा ते कुजत पण नाहीत.  जेव्हा  permofrost वितळेल.  तेव्हा त्या सर्व अवशेषांच  विघटन सुरू होईल.  ही प्रक्रिया कितीतरी  कार्बन आणि मिथेन वायू  वातावरणात सोडेल.

म्हणजे जागतिक तापमान वाढीमुळे permofrost  वितळतोय आणि त्यामुळे  अजून जागतिक तापमान वाढ होते  असे हे त्रांगडे आहे.

शिवाय जे बॅक्टेरिया आणि विषाणू  या permofrost मध्ये अडकून बसले  आहेत ते वातावरणात पुन्हा आले तर संपूर्ण  मानव जातीला नवीन रोगांना  सामोरे जावे लागेल  ते वेगळेच!.

वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार  काही काही बॅक्टेरिया हे  सुमारे 4  लाख वर्षांपूर्वीचे आहेत!.

शिवाय permofrost भूभाग हा वर्षानुवर्षे   बर्फाखाली राहिला असल्याने,  तो काँक्रीट एवढा टणक  झाला आहे.  त्याचा उपयोग पाया म्हणून करत  उत्तर गोलार्धात कितीतरी लोकांनी  आपली घरे बांधली आहेत.

आता हा permofrost वितळल्यामुळे  त्या घरांचे बांधकामांचे पिलर  ढासळत आहेत.  आता झालेली ऑईल गळती,  ही एका ऑईल  टँक चा पाया  ढासळून झालेली गळती आहे.  नॉर्थ पोल जवळची  कितीतरी गावे PERMOFROST THAWING  च्या  भितीदायक सावटाखाली आहेत.

तर थोडक्यात काय भिडू!  वातावरणा मधल्या  छोट्या छोट्या बदलांमुळे असे लई मोठे  मोठे घोटाळे होऊ शकतात.

  • भिडू  स्वप्निल गोसावी

मोबाईल नंबर-  7020190335

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Kapil bhosale says

    Bhari explain kelay bhawa .

    Keep it up

Leave A Reply

Your email address will not be published.