प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यासाठी त्या प्राण्याच्या मालकाला जबाबदार धरण्यात येतं…!

अंगावर विषारी क्रोबा सोडत पत्नीची हत्या केल्याप्रकरणी केरळमधील एक दोषी पतीविरोधात कोर्टात सुनावणी पार पडली. यात आरोपी पती सुरजने हुंड्यासाठी २५ वर्षीय पत्नी उत्तराचा हुंड्यासाठी छळ करत हत्या केली. या प्रकरणी कोल्लमच्या सत्र न्यायालयाने निकाल दिला असून बुधवारी शिक्षेची सुनावणी होणार आहे.

पत्नी उत्तरा कोल्लमपासून ४० किलोमीटरवर असलेल्या तिच्या मामाच्या घरात राहत होती. झोपेत असताना तिला नाग चावला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. ही घटना ७ मे २०२० रोजी घडली होती. त्यावेळी सूरज-उत्तराच्या लग्नाला २ वर्षे झाली होती आणि त्यांना एक वर्षाचे मूलही आहे.

फिर्यादींनी उत्तराचा पती सूरज एस कुमारवर आरोप केला आहे की, त्याने पत्नीच्या खोलीत मुद्दाम कोब्रा सोडला होता, जेणेकरुन नागाने चावा घेतल्यामुळे तिचा मृत्यू होईल. हा संपूर्ण कट रचण्यापूर्वी त्याने आपल्या पत्नीला झोपेच्या गोळ्या दिल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.

तपासात असेही समोर आले आहे की,

गेल्या वर्षी २ मार्च रोजीही सूरजने पत्नीची हत्या करण्याच्या उद्देशाने घरात कोब्रा सोडला होता. ज्या व्यक्तीकडून सुरज ने हा कोब्रा १०,०००० रुपयांत खरेदी केला होता त्याला सुद्धा ह्या प्रकरणात आरोपी करण्यात आलं होतं.

ह्या घटनेमुळे प्राण्यांच्या मदतीने इतरांना इजा पोहचविणाऱ्या, प्राणघातक हल्ला करणारे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. प्रवृत्तीला कायद्याने शिक्षेचे प्रावधान आहे हे दिसून येत.

याआधीही पाळीव प्राण्याने  हल्ला केल्यावर त्या प्राण्याच्या मालकांना शिक्षा झाल्याचे अनेक उदाहरणं आहेत.

तुमच्याकडे जर पाळीव प्राणी असतील तर तुम्ही सुद्धा अशा घटनांबद्दलजागरूक असलं पाहिजे…

चला तर मग जाणून घेऊया अशी घटना ज्यामध्ये प्राण्यांच्या हल्ल्यामुळे त्यांच्या मालकांना कोर्टाने शिक्षा ठोठावली

पाळीव कुत्र्यावर नियंत्रण न ठेवता आल्याने तो एका मुलाला चावला, हे सिद्ध झाल्याने या कुत्र्याच्या मालक महिलेला नागपूर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी जे. डी. जाधव यांनी सहा महिने कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.

ही घटना २९ जून २०१४ रोजी सकाळी नऊच्या सुमारास नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीकृष्णनगर परिसरात घडली होती. सोनल नंदकुमार बंदकुले (वय ३२) असे या प्रकरणातील फिर्यादी महिलेचे नाव आहे.

त्यांचा ९ वर्षीय मुलगा आर्यवर्ष हा त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर खेळत होता. यावेळी बालकोटे यांचा पाळीव कुत्रा व अन्य एक कुत्रा या मुलाला चावला. या दोन्ही कुत्र्यांनी या मुलाच्या मानेला, खांद्याला आणि पायाला चावा घेत त्याला जखमी केले.

सोनल यांनी याप्रकरणी नंदनवन पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी भादंविच्या कलम २८९ आणि सीआरपीसीच्या कलम २४८ (१) अन्वये गुन्हे दाखल केले होते.न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावर आरोपी संगीता यांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचे नमूद करीत त्यांना दोषी ठरविले होते.

हि गोष्ट तर झाली प्राण्यांच्या हल्ल्यानंतर मालकांना झालेल्या शिक्षेची…

पण तुम्हाला माहितीये का ? कि आपण ; पाळत असलेल्या पाळीव प्राण्याची नीट काळजी घेतली नाही तर त्यासाठी भारतात कायदा तयार केलेला आहे.

चला तर मग जाणून घेऊया या कायद्याबद्दल…

प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा राज्यात 1960 पासून लागू करण्यात आला आहे. या कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन झाल्यास एक ते पाच वर्षांची शिक्षा अथवा दोन ते पाच हजारांपर्यंत दंड असून, हा गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्र आहे.

या कायद्यातील कलम तीनच्या तरतुदीनुसार कोणत्याही प्राण्याचे पालकत्व धारण करणाऱ्या व्यक्तीने त्या प्राण्याची सर्वतोपरी काळजी घेण्याबाबत उपाययोजना करणे आवश्यक आहे. प्राण्यांना अनावश्यक वेदना अथवा त्रास होणार नाही याची दक्षता घेणे बंधनकारक आहे.

या कायद्यातील तरतुदीनुसार प्राण्यांना चाबकाने, काठीने अथवा कोणत्याही प्रकारे मारहाण करणे, त्याला होणाऱ्या वेदनेस कारणीभूत असो, आजारी, जखमी किंवा वेदनाग्रस्त प्राण्यांना कामाला जुंपणे अथवा जपण्यास परवानगी देणे, प्राण्यांना जाणूनबुजून व विनाकारण अनावश्यक हानिकारक औषधी किंवा वस्तु खाऊ घालणे अथवा खाऊ घालण्यास कारणीभूत असणे, अनावश्यक अथवा वेदनादायी पद्धतीने प्राण्यांना हाताळणे किंवा वाहनातून घेऊन जाणे हा गुन्हा आहे.

मात्र, कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर पाळीव प्राण्यांचे हाल करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रार कल्याण मडळाकडे आल्या होत्या. त्यानुसार मंडळाने प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा 1960 च्या कलम 11 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच मालकाला तुरुंगाचीही हवा खावी लागू शकते.

प्राण्यांचा उपयोग करून त्याच्या साहाय्याने हल्ला करणाऱ्यांसाठी ह्या घटना जरब बसवण्यासाठी महत्वाच्या आहेत. तसेच पाळीव प्राण्यांना पाळणे हे सुद्धा जबाबदारीचे काम आहे हेच सरकारने १९६० साली केलेल्या कायद्यावरून दिसून येतं.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.