मोदीजी म्हणाले ते खरय, पेट्रोलवर देशात सर्वाधिक टॅक्स “महाराष्ट्र सरकार” घेतय..

देशात कोरोनाची रुग्णसंख्या परत वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला. विषय कोरोनाचा होता पण मोदींजींनी डाव साधत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालला पेट्रोलच्या दरावरून धरलं.

मोदीजी म्हणाले,

“काही राज्यांनी इंधनाचे दर कमी केले नाहीत. त्यामुळे त्या राज्यातील लोकांवर अन्याय होतोय. गुजरात आणि कर्नाटकने टॅक्स कमी केला पण पश्चिम बंगाल, महाराष्ट्राने टॅक्स कमी केला नाही”

साहजिक मुद्दा उपस्थित राहिला तो म्हणजे खरचं महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत पेट्रोल डिझेल महाग आहे का तर त्याचं उत्तर होय असच आहे…

देशभरात १०० रुपयांच्या पेट्रोलमागे जवळपास निम्मा टॅक्स..!

आणि यामध्ये सगळ्यात जास्त टॅक्स आपला महाराष्ट्र भरत असल्याचं स्पष्ट झालंय भावांनो…

चला जरा सविस्तर बघू.

वर सांगितल्याप्रमाणे सगळ्यात जास्त पेट्रोल टॅक्स भरतो महाराष्ट्र. पेट्रोलियम मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या पेट्रोलियम प्लॅनिंग अ‍ॅण्ड अ‍ॅनलिसिस सेलच्या आकड्यांनुसार महाराष्ट्रात १०० रुपयांच्या पेट्रोलमध्ये जवळपास ५२.५ रुपयांचा टॅक्स आपण सारे भरतो.

तर आकडेवारी नीट बघितल्यास एकूण असे सात राज्य असल्याचं कळतं जिथे पेट्रोल भरायला गेल्यास अर्धे पैसे टॅक्स म्हणून गोळा केले जातात.

महाराष्ट्रानंतर नंबर लागतो आंध्र प्रदेशचा. आंध्र प्रदेशात १०० रुपयांच्या पेट्रोलसाठी ग्राहकांकडून ५२.४ रुपये इतका कर घेतला जातो. नंतर ५१.६ रुपयांच्या टॅक्स सहित येतं तेलंगणा, मग ५०.८ रुपयांच्या टॅक्स सहित येतं राजस्थान, ५०.६  रुपयांच्या टॅक्स भारतात मध्यप्रदेशचे नागरिक,  ५०.२ रुपयांचा टॅक्स केरळच्या वाट्याला येतो आणि शेवटी ५०  रुपयांच्या टॅक्स लागतो बिहारच्या भिडूंना.

पन्नासचा टप्पा झाला. उरलेले बाकी सगळे राज्य चाळीस रुपयांपेक्षा जास्त टॅक्स बघतात. परत एकदा लक्षात घ्या, किती रुपयांवर तर १०० रुपयांच्या पेट्रोलवर…

यात फक्त २ ठिकाणं असे आहेत जिथे ३० च्या घरात टॅक्स नागरिक भारतात. 

ते म्हणजे ३४.६ रुपयांच्या टॅक्स सहित लक्षद्वीप आणि ३५.३ रुपयांच्या टॅक्स सहित लक्षद्वीप अंदमान निकोबार. 

तुम्हाला आधी सांगितलं बघा की, हा टॅक्स राज्य आणि केंद्र अशा दोन्ही सरकारांना जातो. तेव्हा कोणते राज्य असे आहेत जे केंद्रापेक्षा जास्त टॅक्स स्वतःच्या खिशात घेतात, हे शोधलं तेव्हा समोर आले ३ राज्य.

आणि यातही आपला महाराष्ट्र अव्वलच बरका. मग येतात आंध्र प्रदेश आणि तेलंगणा.

सगळ्या राज्याची आकडेवारी तुम्ही स्वतःच नीट बघा. त्यासाठीच फोटो देतोय….

WhatsApp Image 2022 03 24 at 2.43.06 PM

आकडेवारी बघून झाली? आता आपण याचा राजकीय दृष्टिकोन बघूया. त्यासाठी आपण भारताच्या राज्यांची दोन भागांत विभागणी करूया. केंद्रात सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे. म्हणून एक भाग- बीजेपी शासित राज्य आणि दुसर- नॉन बीजेपी स्टेट्स. 

ज्या सात राज्यांचा निम्म्या टॅक्स भरण्यात क्रमांक लागतो त्यातील दोन राज्य अशी आहेत जिथे बीजेपीची सत्ता आहे. म्हणजेच मध्यप्रदेश आणि बिहार. तर इतर पाचही राज्यात नॉन बीजेपी शासन आहे. चाळीशी पार टॅक्स राज्यांमध्ये ७ राज्य नॉन बीजेपी शासन वाली आहेत तर १६ राज्यांवर बीजेपीची सत्ता आहे. 

यात जम्मू-काश्मीर मधील नागरिक १०० रुपयांच्या पेट्रोलमध्ये ४५.९ रुपयांचा टॅक्स भारतात. जिथे राष्ट्रपती राजवट आहे. 

स्टॅट्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार,

प्रत्येक राज्यामध्ये व्हॅट हा वेगवेगळा आकारला जातो. ज्यामुळे दरांमधील फरक दिसून येतो. महाराष्ट्रामध्ये २५ टक्के व्हॅट सोबत १०.१२ रुपये प्रति लिटर कर आणि केंद्र सरकारकडून घेण्यात येणारा कर, अशी रक्कम आकारली जाते. त्यातही मुंबई, ठाणे, अमरावती आणि औरंगाबादमध्ये एक टक्का जास्तीचा व्हॅट आकारला जातो.

थोडक्यात मोदीजी बोलले ते बरोबरच आहे महाराष्ट्रात सर्वाधिक पेट्रोलवर टॅक्स आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.