म्हणून भूतानच्या बहुतांश घरांवर पुरूषांच्या लिंगाचे पेन्टिंग्स रेखाटले जातात.

भारताच्या शेजारीच असणाऱ्या भूतानची ओळख आपल्याला सर्वांधिक आनंदी लोकांचा देश म्हणून आहे. जगभर GDP मध्ये देशाची संपत्ती मोजली जाते मात्र या देशात GHI मोजला जातो. GHI म्हणजेच GROSS HAPPINESS INDEX. आपल्या देशातील किती लोक आनंदी आहेत यालाच हा देश आपली संपत्ती समजतो. 

असो, तर विषय हा आहे की याच देशात बऱ्याच घरांवर पुरूषांच्या लिंगाचे पेंटिग्स रेखाटले जातात. अनेकांना हा विषय नविन वाटतो. भूतानबद्दल ऐकून असणाऱ्या बऱ्याच जणांना या गोष्टीची वरची माहिती असते. 

पण हे सगळं का आणि कशासाठी, भूतानच्या भेटीत मी हेच जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नेमकी काय आहे ही गोष्ट वाचा. 

भूतानची राजधानी थिंम्पूपासून तीन ते चार तासांच्या अंतरावर पुनाखा टाऊन आहे. आमचा मुक्काम पुनाखामध्येच होता. सकाळचे दहा वाजले होते. कर्मा नावाचा ड्रायव्हर हॉटेलखाली वाट पहात होता. थिंम्पू टू पुनाखाच्या प्रवासात पुरूषांचे लिंग रेखाटलेली बरीच घरं दिसली असल्यानं आज त्या ड्रायव्हरला ही गोष्ट विचारायची हे ठरवूनच होतो. 

ड्रायव्हरजवळ गेल्यानंतर त्याला फोटो दाखवला. 

“ऐ क्या होतां हैं. असें पेटिंग्स घरोंपें क्यू होते हें.” 

मी विचारताच ड्रायव्हर म्हणाला,

अभीं आपकों वहापैं ही लेके जाणेवाला थां. चलोॆं जा करही देखतें हे. 

पुढच्या पंधरा मिनटात आमची गाडी पुनाखाजवळच्या एका खेड्यात होती. प्रत्येक घरांवर मोठमोठ्ठी चित्र. दारात लाकडांवर कोरलेले पुरूषांचे लिंग. घरांच्या दारात बसून काही बायका लाकडांपासून पुरूषांचे लिंग तयार करण्यात बिझी. घराच्या पुढे छोटीमोठी दूकाने होती. ती देखील पुरूषांच्या लिंगाने सजलेली. पाच दहा फुट उंचीचे लिंग विकण्यासाठी होती. अगदी गळ्यातल्या पेटंट पासून ते किचेन ते विमानांपर्यन्त प्रत्येक गोष्टीला पुरूषाच्या लिंगाचा आकार देण्यात आलेला होता. गावातून जात असताना दोन्ही बाजूला हेच चित्र. आपल्याकडे एखाद्या गावातून जात जात आपण टोकाला जातो आणि तिथून छोटीशी टेकडी चालू होते तशीच इथली रचना होती. गाडी गावच्या टोकावर आली आणि तिथूनच समोरच्या छोट्याशा टेकडीवर चिमी लाखांना मोनेस्ट्री होती. 

lw7

डिसेंबर अखेर इथे निशुल्क प्रवेश मिळायचा. पण जानेवारीपासून इथे सरकारमार्फत प्रतिव्यक्ती पाचशे रुपये तिकीट करण्यात आलं आहे. टेकडीखालीच तिकीट काढलं जातं आणि सोबत एक गाईड देण्यात येतो. पुरूषांची लिंग घराघरावर लावण्यामागे हीच मोनेस्ट्री आणि इथलाच संत कारणीभूत असल्याने सांगण्यात येत असल्याने पुढे जाणं गरजेच होतं.

त्याच गाईडने इथली कथा सांगितली, 

चिमी लखांग मोनेस्ट्रीची निर्मीती लामा ड्रुक्मा कुनलेच्या सन्मानार्थ करण्यात आली होती. लामा ड्रुक्मा कुनले यांनी डिवाइन मॅकमेन या नावाने देखील ओळखलं जातं. बौद्ध धर्माचे संत म्हणून त्यांची तिबेट आणि भूतानमध्ये ओळख आहे. साधारण १५ व १६ व्या शतकात डिव्हाईन मॅकमॅन आणि त्यांच्या क्रेझी विसडमची ओळख भूतानच्या लोकांना झाली. 

डिव्हाईन मॅकमेन हे तिबेटमध्ये रहात होते. वशीकरण, भूतबाधा असल्या निगेटिव्ह गोष्टींना कंट्रोल करण्याची जादूई ताकद त्यांच्याकडे होती अशी मान्यता होती. त्यांना वाईन आणि मुलगी या दोनच गोष्टी आवडाच्या. ते वेगळ्या प्रदेशाच्या शोधात होते. त्यासाठी त्यांनी काय केलं तर आपल्या धनुष्यबाणातून आकाशाच्या दिशेने बाण मारला. तो बाण थेट इथे येवून पडला. आपल्या बाणाच्या दिशेने त्यांनी तिबेटवरून चालण्यास सुरवात केली. 

lw5

त्या काळात डोंगरदऱ्यातून जात असताना मुक्काम साधारण एखाद्या पास मध्ये होत असे. आजही डोचुला पास या ठिकाणी पर्यटक थांबत असतात. आपण मारलेल्या बाणाच्या दिशेने येत असताना डिवाईन मॅकमन डोचुला पास लागली. पुर्वीच्या काळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूताटकी असायची. रात्रीच्या वेळी अशाच एका निगेटिव्ह ताकदीने डिव्हाइन मॅकमेनला भिती दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र डिव्हाईन मॅकनेन संत असल्याने त्याने त्या निगेटिव्ह शक्तीला कुत्र्यात परिवर्तित केलं. 

आज जिथे चिमी लखांग मोनेस्ट्री आहे तिथेच त्या या निगेटिव्ह शक्तीचा स्तूप देखील आहे. बौद्ध धर्मात पांढऱ्या किंवा लाल रंगात स्तूप असतात मात्र इथे काळ्या रंगाने रंगवलेले स्तूप आहे.

डिव्हाईन मॅकमेन या ठिकाणी आला. इथेच तो लोकांना भूताटकी व निगेटिव्ह शक्तीपासून दूर करू लागला. अस सांगितलं जातं की त्याच्या जगाला तो क्रेझी वर्ल्ड म्हणतं. त्यानूसार चित्र विचित्र गोष्टी करण्यात त्याचा हातखंडा होता. त्याला महिला व वाईन प्रिय होती. ज्या महिलांना मुलं होतं नाही अशा महिला त्याच्या दर्शनासाठी जात. इथेच त्यांने लिंगाची पुजा करण्यास सांगितलं. घरांवर पुरूषाच्या लिंगाची चित्र काढण्यास सुरवात झाली. 

lw1

या मोनेस्ट्रीचा अर्थात मठाचा अंक ५,७,१३ असा आहे.

आत्ताची प्रथा अशी की आतमध्ये लाकडीचे साधारणं अडीच ते तीन फुटाचे पुरूषाचे लिंग आहे. ज्या महिलांना मुल होत नाही अशा महिला इथे येतात. त्या मठातले लिंग घेवून मठाला तीन वेळा प्रदक्षिणा मारतात. त्यानंतर डिवाइन मॅकमेनच्या मुर्तीसमोर ठेवण्यात आलेल्या तीन सोंगट्या हातात घेतात. लुडोच्या किंवा सापशिडीच्या खेळात असतात तशा तिन लाकडी सोॆगट्या असून त्यावर १ ते सहा अंक वेगवेगळ्या बाजूस आहेत. तीन फास्यांवर येणाऱ्या अंकाची बेरीज ५,७,१३ असेल तर तुम्हाला मुल होवू शकते अस सांगण्यात येत. 

तीन प्रयत्नातच यापैकी एक अंक यावा लागतो. पहिल्या प्रयत्नात अंक आल्यास गुड, दूसऱ्या प्रयत्नात आल्यास बेस्ट आणि तिसऱ्या प्रयत्नात आल्यास फिफ्टी फिफ्टी चान्स असल्याचा समज आहे. यापैकी एक अंक आल्यास पुढे असणारी चिठ्ठी उचलावी लागते. यात मुलगा आणि मुलगीची नावे असतात. पैकी जी चिठ्ठी येईल त्यावरुन मुलगा होईल की मुलगी असा अंदाज बांधला जातो. 

lw6

म्हणूनच गॉड ऑफ फर्टिलीटी या नावाने देखील डिव्हाईन मॅकमेन ओळखला जातो. ही झाली समज-गैरसमजाच्या गोष्टी. त्याचसोबत निगेटिव्ह गोष्टींना दूर करण्यासाठी इथे लिंग अडकवण्याची प्रथा आहे. सोबतीने पुरूषांच्या लिंगाच्या प्रतिकासोबत वेगवेगळे सण-प्रथा-परंपरा वर्षभर चालतात.

lw2

अस सांगण्यात येत की जगात फक्त असा एकमेव संत आहे ज्याची पुरूषांच्या लिंगाच्या स्वरूपात पूजा केली जाते. त्याच्या शक्तीच प्रतिक म्हणून पुरूषाचे लिंग ठिकठिकाणी पूजण्यात येते.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.