फिलिप्सच्या डोक्यातला बल्ब पेटला आणि ६० देशातल्या लोकांना रोजगार मिळाला…

दररोजच्या वापरातल्या वस्तू या कुठल्या ना कुठल्या ब्रँडचं प्रोडक्ट असतात. दाढीपासून ते गाडीपर्यंत, मिक्सरपासून ते आरोग्याची काळजी घेणाऱ्या उपकरणांपर्यंत एक ब्रँड आपल्याला नक्की आढळून येतो तो म्हणजे फिलिप्स. फिलिप्स म्हणल्यावर सगळ्यात अगोदर डोळ्यासमोर येतो तो म्हणजे फिलिप्सचा बल्ब. पण आज ६० देशांमधल्या लोकांना रोजगार देणारी फिलिप्स कंपनी उभी कशी राहिली आणि ब्रँड कशी बनली त्याबद्दल जाणून घेऊया.

फिलिप्सची सुरवात झाली ती १८९१ मध्ये. गेराल्ड फिलीप्सने आईंडहॉवन, नेदरलँडमध्ये हि कंपनी सुरु केली. गेराल्डला लहानपणापासूनच इलेकट्रोनिक विषयांमध्ये गोडी होती. यामुळे त्याने आपलं पुढचं शिक्षण हे इलेकट्रोनिक्समधेच पूर्ण केलं. पुढे अँग्लो अमेरिकन ब्रश इलेकट्रीक लाईट कॉर्पोरेशन या कंपनीसाठी तो काम करू लागला. युरोप आणि बर्लिन अशा दोन्ही देशात गेराल्ड कामानिमित्त दौरे करायचा. यामुळे त्याला बरच ज्ञान या क्षेत्राबद्दल झालं होतं. 

यातूनच गेराल्ड फिलिप्सने स्वतःची कंपनी थाटायचा विचार केला पण जमीन आणि कंपनी सुरु करता येईल इतके पैसे नसल्यानं हा विचार बारगळला. वडिलांना सांगून गेराल्डने बँकेतून कर्ज काढायला लावलं. यातून वडिलांसोबत गेराल्डने आपली कंपनी सुरु केली. कंपनीत सुरवातीला बल्ब बनु लागले आणि कंपनीचं फिलिप्स नाव हळूहळू प्रसिद्ध होऊ लागलं.

बल्ब बनवण्याबरोबरच कंपनीमध्ये इतर बारीकसारीक इलेकट्रोनिक वस्तू सुद्धा बनवल्या जाऊ लागल्या. कंपनी सुरु झाल्याच्या चार वर्षानंतर गेराल्डला समजलं कि कंपनी लॉसमध्ये चालली आहे. फॅक्टरीसाठी तोवर गेराल्ड फिलीप्सने भरपूर लोन घेतलेलं होतं. पण मागे न हटता गेराल्डने आपलं काम सुरु ठेवलं. यात आपल्या लहान मुलालासुद्धा त्याने सामील केलं. हळूहळू यात अनेक नातेवाईकसुद्धा सामील झाले. 

१९२७ साली फिलीप्सने लॉंच केलेला रेडिओ जगभर फेमस झाला होता. पण १९४० हा काळ फिलीप्ससाठी इतका वाईट होता कि नेदर्लंडवर जर्मनी आक्रमण करणार आहे तेव्हा गेराल्ड फिलीप्सने कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण दुसऱ्या देशात कंपनी हलवुनही कंपनीला फायदा होतच राहिला. हळूहळू प्रदेशात कंपनी विस्तारू लागली होती. या युद्धाचा फायदाही कंपनीला झाला.

कंपनी वेग धरू लागली होती. फिलीप्सला पहिला मोठा ब्रेक मिळाला तो म्हणजे ऑडिओ कॅसेट टेपमुळे. सरकारी आणि खाजगी कार्यालयांमध्ये हे टेप हातोहात विकले जाऊ लागले आणि फिलिप्सचा दबदबा आणि नफा कायम राहिला. टेबल लॅम्प, लेझर डिस्क, व्हिडिओ रेकॉर्डर अशी उत्पादन फिलीप्सला जास्तच प्रसिद्ध करून जात होती.  बल्ब निर्मितीत तर फिलीप्सला कोणीही मागे टाकू शकलं नाही, इतक्या प्रचंड वेगाने हे बल्ब निर्मिती उद्योग चालायचे कि इतर कंपन्यांना यात आघाडी घेताच आली नाही. 

होमथेटर, टीव्ही, रेडिओ अशा घरगुती वस्तूंची विक्री फिलीप्सने मोठ्या प्रमाणावर वाढवली. यानंतर कंपनीला ब्रेक लागलाच नाही. जगभर फिलिप्सचा बल्ब फेमस झाला. हळूहळू कंपनी जगभर पोहचली. तब्बल ६० देशांमधल्या लोकांना आज घडीला फिलिप्स रोजगार देतेय. सव्वा लाखाहुन अधिक लोकं फिलीप्समध्ये काम करतात.

फिलिप्स आजही त्याच्या क्वालिटीसाठी जगभर ओळखलं जातं. दाढीचं रेझर, मिक्सर, बल्ब, हेल्थकेअर अशा अनेक गोष्टींमध्ये फिलिप्स आघाडीवर आहे. करोडो रुपयांची उलाढाल फिलिप्स कंपनी करते. आज घडीला फिलिप्स कंपनीचं म्युझियम तयार करण्यात आलं आहे आणि या म्युझिअम मध्ये कंपनी कशी सुरु झाली आणि आज कुठल्या ठिकाणी आहे याचा प्रवास यामध्ये आहे.

फिलीप्सच्या दिमाग कि बत्ती जली आणि इतकी मोठी हि कंपनी झाली. गेराल्ड फिलीप्सने हार न मानण्याचा निर्णय घेतला आणि कंपनी इतक्या उच्च स्थानावर नेऊन ठेवली. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.