पार्ले-जी पुड्यावरचा फोटो सुधा मूर्तींचा आहे ही गोष्ट शुद्ध थाप आहे. खरं काय ते वाचा.

विषय पार्ले जी बिस्कीटांचा आहे. खरं सागायचं झालं तर पार्ले जी या विषयावर आम्ही खूप काही सांगू शकतो. आमच्या भाषेत त्याला लेखात पाणी ओतणं म्हणतात. म्हणजे सांगण्यासारखे कमी मुद्दे असतील तेव्हा वर-खाली सजावटीसाठी तुफान आभार मारायचं. आत्ता विषय पार्ले जी बिस्कीटाचा असल्यावर लहानपणी कसं बिस्कीट खायचो. आजपर्यन्त बिस्कीट फक्त चार रुपयालाच कस विकायचे. पाण्यासोबत बिस्कीट कस खायचो. चहा आणि पाणी सोडून कोरडी बिस्कीट खाण्याची पैज आजपर्यन्त कोणच जिंकू शकलेलं नाही इथपासून ते पुण्यात MPSC, UPSC करायला लागल्यानंतर कस फक्त एका बिस्कीटपुड्यावर दिवस काढलेत हे सगळं रंगवून सांगू शकतो.

पण भिडूंनो प्रत्येक ठिकाणी पाणी ओतण्यात काय अर्थ नसतोय. त्यातपण लयच जवळची गोष्ट असल्यावर परत विस्कटून सांगण्यात काहीच अर्थ नाही. आत्ता पार्ले जी इतकं जवळच आहे की त्याच्याबद्दल काहीच सांगण्यासारखं नाही.

असच आम्हाला वाटाचयं, पण एक फेक गोष्ट प्रत्येक वेळी समोर यायची आणि डोकं फिरायचं. एकएकट्याला गाठून आम्ही प्रत्येकाला समजवायचा प्रयत्न करायचो पण परत पहिले पाढे पंच्चावन असायचे. मग विचार केला आत्ता शहाणे करुन सोडावे सकळजन..!

तर पार्ले जी थाप काय आहे…

पार्ले जी बिस्कीटावर जी मुलगी आहे ना ती मुलगी जेष्ठ लेखिका व सुधा मुर्ती आहेत. इन्फोसिसचे मालक नारायण मुर्ती यांच्या पत्नी. त्यांचाच लहानपणीचा फोटो  पार्ले जी च्या पाकीटावर आहे.

पार्ले जी बद्दलची ही एकमेव अफवा सोडली तर बिस्कीट एकदम अस्सल आहे. तर ही गोष्ट शुद्ध थाप आहे. मग खरं काय आहे.

त्या अगोदर थोडा पार्ले जी चा इतिहास पाहूया.

पार्ले जी अस्सल भारतीय कंपनी आहे. दूसऱ्या महायुद्धाच्या सुरवातीला १९३९ च्या दरम्यान मुंबईच्या पार्ल्यात ही कंपनी सुरू झाली. कुकी, केक असले प्रोडक्ट ते तयार करायचे. मोहनलाल दयाळ यांनी भारतीयांसाठी भारतीय गोष्टी करण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी पहिल्यांदा कॅण्डी बनवण्यास सुरवात केली. मोहनलाल दयाळ हे कापड व्यवसायिक होते. पण स्वदेशी चळवळीस प्रभावित होवून त्यांनी कॅण्डीचे उत्पादन घेण्यास सुरवात केली. कॅण्डी तयार झाली पण त्याला नाव काय द्यायचं हा प्रश्न होता तेव्हा त्यांनी विले-पार्ला व पार्ले हे नाव ठेवलं.

त्यानंतर त्यांनी पार्ले ग्लुको नावाचं बिस्कीट मार्केटमध्ये आणलं. हे बिस्कीट तुफान चालू लागलं. बघता बघता पार्ले ग्लुकोने ब्रिटीश कंपन्यांना भारताच्या बाहेर सारलं आणि आपलं साम्राज्य उभा केलं.

त्यानंतरच्या काळात बिस्कीटावर फोकस करुन जाहिरात सुरू ठेवली. या पुड्यावर पहिल्यांदा एक बाई आणि गाई वापरण्यात आली. दरम्यानच्या काळात काय झालं तर ग्लुकोच्या नावाने पोत्याने बिस्कीट येवू लागले. कारण ग्लुकोज हा अन्नघटक असल्याने त्यावर ट्रेडमार्क घेता येत नव्हता.

मग पार्लेने काय केलं तर आपलं नावच बदललं. त्यांनी फक्त पार्ले जी वापरलं. पुढे तर या G चा अर्थ जिनीयस असा केला. त्या पद्धतीने जाहिरात करण्यात आली.

हे सगळं कांड १९८२ सालात करण्यात आलं.

त्यासाली बिस्कीट पुड्यांच जे कवर करण्यात आलं ते आजतागायत कायम आहे. पार्ले जी ने किरकोळ बदल सोडले तर त्यात विशेष अस काही केलं नाही. पहिला कागदांचे असणारे पाकीट नंतर प्लॅस्टिकचे झाले इतकाच मोठ्ठा फरत सोडला तर पाकीट जैसे थे.

तर याच काळात ती पारले जी ची पोरगी या कवरवर आली. लोकं म्हणतात ती मुलगी सुधा मुर्ती आहे.

पण नाही. याबद्दल टोटल दोन दावे आहेत. पहिला दावा आहेत तो निरू देशपांडे यांचा. निरू देशपांडे यांच्या वडिलांनी त्या सहा वर्षांच्या असताना त्यांचा फोटो काढला होता. तो फोटो पार्ले जी वाल्यांकडे पोहचला व त्यांनी तो फोटो आपल्या पाकीटांवर वापरला. मिडायमध्ये हीच थेअरी वापरली आहे. त्यासाठी फोटो मात्र सुधा मुर्तींचा वापरला आहे. सुधा मुर्ती व निरू देशपांडे सारख्याच दिसत असल्याने पुढे सुधा मुर्तींची स्टोरी जोडण्यात आली.

मग खरी गोष्ट काय आहे…!

खरी गोष्ट सांगण्याअगोदर बेसिक सांगतो. त्या निरू देशपांडे असत्या तर कंपनीने तसा कोणततरी अग्रीमेंट त्यांच्यासोबत केलं असतं. तस केलं नसतं तर निरू देशपांडे यांनी दावा दाखल करण्यासाठी मुळ फोटो सादर केला असता. पण या दोन्ही गोष्टी घडल्या नाहीत.

पार्ले जी जे अधिकारी मयांक जैन यांनी मध्यंतरी स्पष्ट केलं होतं की हे एक इलुस्ट्रेशन आहे. म्हणजे ब्रश आणि रंग घेवून काढलेलं चित्र. कल्पनेत आलेली मुलगी चितारण्यात आली. हे काम केलं होतं मगनलाल दहिया नावाच्या आर्टिस्ट माणसाने. या चित्राप्रमाणे त्यांनी खालच्या फोटोत दिसणारी मुलगी देखील चितारली होती.

मात्र लोकांना त्या सुधा मुर्ती आहेत अस सांगण्यात जास्त इंटरेस्ट असतो. आम्हाला वाटतं इन्फोसिसमध्ये ओपनिंग असल्यास फायदा होईल याचा विचार करुन आयटीवाल्यांनीच ही थाप पसरवण्यात हातभार लावला असेल. असो सुधा मुर्ती काय, निरू देशपांडे काय किंवा मगनलाल दहिया काकांची करामत काय आपल्याला बिस्किट खाण्याशी मतलब.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.