तर पियुष मिश्रा आज बॉलिवूडचा सर्वात मोठ्ठा स्टार असता…

मैने प्यार किंया सिनेमा आठवतोय काय, तिच आपली महाराष्ट्राची भाग्यश्री पटवर्धन आणि सलमान खान या दोघांना सुपरस्टार बनवणारा पिक्चर. या एका पिक्चरमुळे अनेकांची करियर धक्क्याला लागली. सिनेमा सुरू झालेला तेव्हा या पिक्चरमध्ये एकमेव व्यक्ती होता ज्याच्या नावापुढे पहिल्यापासून स्टार नावाचा किताब लागलेला, आणि तो होता लक्ष्मीकांत बेर्डे… 

याच पिक्चरच्या निर्मितीचा हा किस्सा.. 

झालं अस की राजश्री प्रॉडक्शनचे सर्वेसर्वा असणाऱ्या ताराचंद यांचा नातु म्हणजे सुरज बडजात्या. सुरज तेव्हा १६ वर्षाचा होता. तेव्हाच कॉलेज बंद करून आपण फिल्ममेकर व्हायचा त्याने निर्णय घेतला. त्यासाठी तो महेश भट्टला असिस्ट करु लागला. एकदिवशी त्याने लिहलेली स्क्रिप्ट आपल्या वडिलांना म्हणजे राजकुमार बडजात्यांना दाखवली. 

ही स्क्रिप्ट बघुन राजकुमार म्हणाले, आपल्या वयाप्रमाणे एखादा सिनेमा लिही. अशा गंभीर स्टोरीत शिरू नको. त्याचसोबत एका राजस्थानी लोकगिताची लाईन देखील त्यांनी सुरजला सांगितली, 

ती ओळ अशी होती, 

एक बंजारा आपल्या मुलीला आपल्या दोस्ताकडे सोडून जातो. काही दिवसानंतर येवून पाहतो तर त्या बंजाऱ्याची मुलगी आपल्या दोस्ताची मुलाच्या प्रेमात पडली आहे, त्यावरून तिचा अपमान करण्यात आला आहे. 

या दोन ओळींवर संपुर्ण सिनेमा लिहण्याचं चॅलेंज राजकुमारांनी सुरजला दिलं.  

संपुर्ण स्क्रिप्ट लिहायला सुरजला सुमारे दहा महिने लागले. त्याने या पिक्चरचं नाव ठेवलं मेने प्यार किंया. आत्ता सिनेमाची पुर्ण जबाबदारी सुरजकडेच आली होती. 

त्या काळात म्हणजे १९८६ साली पियुष मिश्रा दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकत होता. तीसऱ्या वर्षाचा असणारा पियुष नाटकात जबरदस्त काम करत होता. अचानक एके दिवशी NSD चे डायरेक्टर मोहन महर्षी यांनी त्याला आपल्या चेंबरमध्ये बोलावलं. 

तिथे मोहन महर्षी यांच्यासोबत राजकुमार बडजात्या बसले होते. अनौपचारीक गप्पा रंगल्या. त्यानंतर सिनेमाचा विषय निघाला आणि राजकुमारांनी सांगितलं मी एक नवा सिनेमा करतोय. माझ्या डोक्यात तुझ्यासारखा मुलगा लिड रोल च्या भूमिकेत आहे. तू हा रोल कर. त्यासाठी त्यांनी पियुषला आपलं कार्ड दिलं आणि मुंबईला येवून भेटायला सांगितलं.. 

पण पियुष त्यावेळी नाटकात गुंतलेला. एकंदरित सिमेमा या गोष्टीवरच त्याचा विश्वास नव्हता. इतका मोठ्ठा डायरेक्टर आपणाला भेटून कार्ड देतो आणि रिड रोलची भूमिका देतो याच कौतुक पियुषला नव्हतं. तो त्यांना भेटायला गेलाच नाही… 

पियुष भेटण्यासाठी येत नाही म्हणल्यानंतर दूसरा पर्याय मिळाला तो फराज खानचा. पण सिनेमाच्या शुटपूर्वी त्याची तब्येत बिघडली आणि तो देखील बाहेर पडला.

या सिनेमासाठी हिरोईन म्हणून शबाना दत्तच नाव फिक्स करण्यात आलं होतं. राजकुमारांनी तिलाच विचारलं की तुझ्या नजरेत कोण आहे का? तेव्हा तिने सलमानचं नाव सुचवलं. सलमान ऑडिशन देण्यासाठी आला. राजकुमारांनी त्याची स्क्रिन टेस्ट पाहिली व ही गोष्ट सुरजला सांगितली. 

सुरज बडजात्या मात्र तरिही सलमानला घेण्यासाठी ठाम नव्हता. त्यासाठी तो सलमानला भेटायला गेला. आणि त्याला म्हणाला अजून तुझ नाव फिक्स नाही. तेव्हा सलमान त्याला इतर हिरोंची नावे सुचवू लागला. माझ्याठिकाणी हा येवू शकतो तो येवू शकतो म्हणून सांगू लागला. तेव्हा सुरजला वाटलं याला स्वत:च नाव नाही म्हणल्यानंतर वाईट वाटण्याऐवजी तो फिल्मकडे प्रामाणिकपणे पाहतोय. याच गोष्टींवरून सुरजने सलमानचं नाव फिक्स केलं आणि इतिहास घडला… 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.