पंडित नेहरूंची मुलाखत प्ले-बॉय मध्ये छापून आली होती.

पंडित नेहरूचं नाव एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या समोर घेतलं तर दोन प्रकारच्या रिएक्शन समोरून येतात. एक तर टोकाचं प्रेम नाहीतर टोकाचा द्वेष. बऱ्याचदा किंबहूना नेहरूंचा द्वेष वाटण्याचा प्रमुख कारण असत ते म्हणजे गेल्या कित्येक दशकात ठरवून पंडित नेहरूंची केली जाणारी बदनामी. मग त्यांचे आपली भाची, बहिण यांच्यासोबत असणारे फोटो असतो की त्यांच्या इतर गोष्टी.

आजही असे लिखाण, फोटो सर्रास नेहरूंच्या नावाने सोशल मिडीयातून शेअर केला जातो. एकविसाव्या शतकात तर नेहरूंच्या बदनामीच्या या केंद्रांना टेक्नॉलॉजिची साथ मिळाली आणि तुफान वेगाने नेहरुंची बदनामी करण्यात येवू लागली.

हे सर्व सांगण्याच कारण इतकच की, नेहरूंची बदनामी हा काही आजचा विषय नाही. नेहरू हयात असताना देखील त्यांच्या नावाने अशी बदनामी प्रकरण पेरली जात होतीच. पण छोट्या पातळीवर चालणाऱ्या या प्रकारांकडे नेहरू लक्ष देखील देत नसतं. पण असा एक प्रकार १९६३ साली घडला आणि संपुर्ण भारतासोबत जगाच्या भूवया देखील पंडित नेहरूंकडे उंचावल्या गेल्या.

काय होतं नेमकं हे प्रकरण,

तर १९६३ साली प्लेबाॅय या आंतरराष्ट्रीय मासिकानं पंडित नेहरूंचा पानभर इंटरव्ह्यू छापला होता. या पानभर लांब असणारा इंटरव्हू प्रश्न उत्तरांच्या फाॅरमेट मध्ये होता. यामध्ये नेहरूंनी अनेक प्रश्नांची कडक उत्तर दिली होती. जस की, सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून भारताकडे अणुबाॅम्ब हवा अस मत त्यांनी या इंटरव्हू मध्ये मांडल होतं.

आजपर्यन्त कुठल्याचं देशाच्या प्रमुखानं प्लेबाॅयला इंटरव्ह्यू द्यायचं धाडस केलं नसताना नेहरूंनी असली रिस्क का घेतली याबाबत जगभरातून विचारलं जावू लागलं याबाबत चाचा नेहरूंना विचारलं जावू लागलं. प्ले बॉयची पत पाहता सुरवातीपासून हा अंक भारतात बॅन करण्यात आला होता. मात्र नेहरूंची मुलाखत छापल्याची बातमी इतर माध्यमातून लोकांना समजू लागली आणि मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात हा अंक हातोहात खपू लागला.

अस सांगितलं जातं की मुळ किंमतीच्या तीस ते पन्नास पट महाग हा अंक विकत घेवून लोकांनी वाचला होता.

काळ्या बाजारात खपला जाणारा हा अंक आणि त्यात छापलेली मुलाखात हा उत्सुकतेचा विषय होता. पंडित नेहरूंनी अशी कोणतीच मुलाखत दिली नसल्याने सरकारने थेट प्ले बॉय़ या मासिकाकडे खुलासा मागितला.

जेव्हा सरकारमार्फत खुलासा मागण्यात आला तेव्हा या मासिकाने सांगितलं की,

” हि मुलाखत आम्ही आजवर नेहरूंनी दिलेल्या सार्वजनीक भाषणांना आधार देवून केली आहे. या इंटरव्हूच आमच्याकडे  रेकार्डिंग आहे.”

भारतानं या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा असे कोणतेच पुरावे नसल्याचं समोर आलं. नेहमीप्रमाणे इंटरव्हू चघळण्यात आला पण सत्य दाबून टाकण्यात आलं. आजही काही लोक ही मुलाखत खरीच होती म्हणून फोटो शेअर करत असतात.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.