मोदी आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये चर्चेत आलेले हेच ते भारतातील ५ बायडन…

भारताचे पंत्रप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात काल पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात जवळपास दिड तास बैठक झाली. या भेटीत दोन देशांमधील संबंध मजबूत बनवण्यावर चर्चा झाली. सोबतच अमेरिका आणि भारतातील संबंधांचा नवा अध्याय सुरु करत आहोत असं देखील बायडन म्हणाले.

या पलीकडे जाऊन असं सांगितले जात आहे कि जो बायडन यांनी भारतासोबतच्या आपल्या भावनिक नात्याचा देखील उलगडा केला आहे. बायडन यांनी याआधी देखील जेव्हा ते २०१३ मध्ये भारत दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी आपल्या भारतासोबतच्या नात्याबद्दल बोलून दाखवलं होतं. त्यांच्या मते त्यांच्या ५ बायडन पूर्वजांचा भारताशी संबंध होता.

पण नेमके कोण आहेत हे ५ बायडन?

जो बायडन अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष असताना जुलै २०१३ मध्ये भारताच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी याबाबत सांगितले होते. सोबतच २०१५ मध्ये वॉशिंग्टन डीसीमध्ये दिलेल्या एका भाषणात सांगितले होते कि त्यांच्या पंजोबांचचे वडिल ईस्ट इंडिया कंपनीमध्ये कॅप्टन होते. १९७२ मध्ये जेव्हा ते सीनेटर म्हणून निवडून आले होते तेव्हा मुंबईमधून त्यांना लिहिण्यात आलेल्या एका पत्रामधून त्यांना हि माहिती मिळाली होती. 

जो बायडन यांनी सांगितले कि ज्या व्यक्तीने हे पत्र पाठवले होते, त्यांचं नाव देखील बायडनचं होते. त्यावेळी त्यांनी या पत्रावर जास्त लक्ष दिले नाही.

लंडनस्थित किंग्ज कॉलेजमधील प्रा. टिम विलासे यांनी विस्तृत अभ्यासानंतर त्यांनी बायडन यांच्या वंशावळीवर भाष्य केलं आहे.

यात त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीमध्ये काम करणाऱ्या इंग्लंडमधील ख्रिस्तोफर बायडन आणि त्यांचा भाऊ विलियन हेनरी बायडन यांचा उल्लेख केला होता. हे दोन्ही भाऊ इंग्लंडमधून चीनला जाणाऱ्या एका जहाजावर चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते. सोबतच हे बायडन बंधू चेन्नईमधील अत्यंत प्रसिद्ध व्यक्ती होते. भारतीयांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते.

ख्रिस्तोफर बायडन १९३० साली ‘प्रिन्सेस शेरले ऑफ वेल्स’ चे कॅप्टन म्हणून निवृत्त झाले. त्यानंतर  लंडनजवळच्या ब्लॅकहीथ शहरात जाऊन ते राहू लागले. या काळात त्यांनी एक पुस्तक देखील लिहिलं. पुढे त्यांनी बोटं विकत घेऊन मुंबई ते कोलंबो असा प्रवास देखील केला होता. चेन्नईच्या एका प्रवासादरम्यान त्यांच्या मुलगीचा आजारी पडून मृत्यू झाला होता.

१८५८ मध्ये ख्रिस्तोफर बायडन यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना सेंट जॉर्ज कॅथेड्रलमध्ये दफन करण्यात आले होते. त्यांच्या आठवणी प्रित्यर्थ सेंट जॉर्ज कॅथेड्रलमध्ये एक दगड ठेवण्यात आला आहे. त्यानंतर त्यांचा मुलगा होराटियो बायडन चेन्नईच्या एका तोफखान्यात कर्नल झाले होते.

त्यानंतर, ख्रिस्तोफर बायडन यांनी पत्नी लंडनला परत निघून गेली आणि १८८० पर्यंत तिथेच राहिल्या. त्यांची माहिती देणारी काही कागदपत्र केंब्रिज विद्यापीठात उपलब्ध असल्याचं विलासे सांगतात. तर विलियन हेनरी बायडन पुढे जाऊन ‘एना रॉबर्टसन’ या बोटीचे कॅप्टन झाले. याकाळात त्यांनी गंगा आणि थालिया या बोटींवर कॅप्टन म्हणून काम केलं. ५१ वर्षाचे असताना त्यांचं रंगूनमध्ये निधन झालं.

जो बायडन यांनी सांगितल्याप्रमाणे, भारतात कोणीही जॉर्ज बायडन नाहीत. टिम विलासे आपल्या लेखात लिहितात, जर बायडन यांचे कोणी पूर्वज असतील तर ते ख्रिस्तोफर बायडन यांच्याशी संबंधित असले पाहिजेत.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.