लोकांनो मोदींनी आता पुन्हा दिवे लावण्याचं चॅलेंज दिलंय.

आगामी काळात ७ राज्यांच्या विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत. त्याच अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष निवडणुका जिंकाव्या म्हणून तयारीला लागले आहेत. विरोधक आंदोलनं करून राजकारण करू पाहत आहेत तर सत्ताधारी आपण केलेल्या कामांचे भांडवल करत सुटले आहेत. या श्रेयवादाच्या लढाईत सत्तधारी आणि विरोधक अनेक गोष्टींची पुनरावृत्ती करत आहेत. जरी हे मुद्दे मागच्या वेळेस फारसे चालले नाहीत किंव्हा त्या उपक्रमाचं हसं झालेलं.  कोरोनाची पहिली लाट आली तेंव्हा ह्या कोरोनाला हरवण्यासाठी मोदींनी भारतीयांना घरांमध्ये दिवा लावण्याचं आवाहन केलं होतं.

मोदींनी पुन्हा एकदा हेच आवाहन केलं आहे, पण यावेळेस खास आवाहन केलंय ते म्हणजे उत्तरप्रदेश राज्याला!

उत्तर प्रदेशच्या राजधानीत म्हणजेच लखनऊच्या कार्यक्रमात बोलतांना पंतप्रधान मोदी केंद्र सरकारच्या कामाचा एकप्रकारे हिशोबच लोकांना देत होते. त्यांनी भाजप सरकार तसेच राज्यातल्या योगी सरकारचे तोंडभरून कौतुक केले.

याचं निमित्त म्हणजे उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुका.

पंतप्रधान मोदींनी याच निवडणुकांना केंद्र स्थानी ठेवून, केंद्र सरकार आणि राज्यात सत्तेत असलेल्या सरकारच्या विकासकामांचा लेखा-जोख मांडला. त्याला निमित्त ठरलं ते म्हणजे आयोध्येमध्ये साडेसात लाख दिवे लावले जाणार आहेत. अयोध्या हि धार्मिक भूमी आहे. तिथे दर दिवाळीला दिवे लावण्याचा उपक्रम चालत असतो. तेथील नागरिक मोठ्या भक्तीभावाने हा सण साजरा करतात.

याच पार्श्वभुमीवर मोदींनी उत्तर प्रदेशातील लोकांना आवाहन केलेय कि ज्यांनी ज्यांनी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांनी आपल्या -आपल्या घरांमध्ये दिवे लावावे.

मोदी म्हणाले कि,”मी उत्तर प्रदेशला आवाहन करतोय की राज्यामध्ये ज्यांना ज्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरं मिळाली आहेत त्या ९ लाख लाभार्थ्यांनी आपआपल्या घरांमध्ये प्रत्येकी दोन दिवे लावावेत. म्हणजे अयोध्येमध्ये साडेसात लाख दिवे लागतील तेव्हा या घरांमध्ये १८ लाख दिवे लावले जातील. भगवान रामालाही याचा आनंद होईल” असंही मोदी म्हणालेत.

फक्त पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरं मिळालेल्या लाभार्थ्यांना हे आवाहन करण्याचा नेमका अर्थ काय ?

थोडक्यात असाच अर्थ आहे कि, या घरं मिळालेल्या लाभार्थ्यांना आठवण करून देत आहेत कि, भाजप सरकारमुळेच नागरिकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. आम्ही कसे कसे विकासकामे पूर्ण केली आहेत. या गोष्टींची आठवण करून देण्याचा उद्देश मोदिजी पूर्ण करत आहेत. 

मोदी यांनी विरोधकांवर टीका करत  म्हणाले कि, २०१४ च्या आधी जे कोणत सरकार सत्तेत होतं. त्या सरकारने या आवास योजनेअंतर्गत राज्यात फक्त १३ लाख घरं मंजूर केले होते. आणि त्यापैकी फक्त ८ च लाख घरं प्रत्यक्षात बनवली गेली. पण आमच्या सरकारने याच आवास योजनेअंतर्गत १ कोटी १३ लाखांहून अधिक घरांना मंजुरी दिलीये, आणि हे घरं कशी असणार, त्याचं डिझाईन कसं असणार हे सर्व ते ते लाभार्थीच ठरवणार. त्यांच्या स्वप्नातल्या घराप्रमाणे ते त्यांचं घर बनवतील त्यात सरकर कोणत्याही मार्गाने हस्तक्षेप करत नाही.

ना आम्ही इथे बसून त्यांच्या स्वप्नातल्या घराबद्दलचे निर्णय घेत नाही. हे सगळं लाभार्थीच ठरवतात. असंही त्यांनी निक्षून सांगितलं”.

परंतु त्यांनी हे देखील स्पष्ट केलंय कि, योगी सरकार सत्तेत आल्यानंतर शहरांमधील ९ लाख गरिबांना आम्ही घरं बांधून दिली आहेत. यात वीज, पाणी, गॅस, शौचालय अशा सुविधा देखील आम्ही दिल्या आहेत. तर सद्या १४ लाख घरांचं बांधकाम चालू आहे, लवकरच ते देखील पूर्ण होईल आणि याच नवीन घरांमध्ये लाभार्थ्यांनी येत्या दिवाळीत २-२ दिवे लावण्याचा उपक्रम करावा”.

थोडक्यात याच आवाहनातून मोदी येत्या निवडणुकीमध्ये नफा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत हे उघड उघड आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.