पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीला आतापर्यंत हे मोठे प्रोजेक्ट्स दिले आहेत…

नरेंद्र मोदी काल आपल्या मतदारसंघात अर्थात वाराणसीमध्ये होते. जवळपास ८ महिन्यानंतर ते मतदारसंघात गेले होते. या दौऱ्यात त्यांनी १८६ कोटी रुपये खर्चून बहुचर्चित रुद्राक्ष कन्वेंशन अँड को-ऑर्परेशन सेंटरचं लोकार्पण केलं. सोबतच अवघ्या ५ तासांच्या कार्यक्रमात त्यांनी काशीसाठी तब्बल १५०० कोटी रुपयांचे प्रोजेक्ट्सचं लोकार्पण केलं.

पंतप्रधान मोदींच्या याच सगळ्या उदघाटन सोहळा आणि दौऱ्यानंतर त्यांच्या एका बहुचर्चित वाक्याची आठवण झाली,

ती म्हणजे काशीला क्योटो बनवण्याचं.

नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर अवघ्या ३ महिन्यांमध्ये या बद्दलचा उल्लेख केला होता. त्यासाठी त्यांनी ३० ऑगस्ट २०१४ रोजी जपानसोबत करार देखील केला. त्यानंतर एप्रिल २०१५ मध्ये काशीच्या अधिकाऱ्यांची एक टिम क्योटोला जावून आली होती. तर जपानची एक टिम देखील काशीच्या दौऱ्यावर आले होते.

त्यानंतर पंतप्रधान मोदींनी वाराणसीला अनेक प्रकल्प देऊ केले आहेत. म्हणजेच क्योटो बनवण्याच्या दिशेने काम सुरु केलं. मात्र हे प्रोजेक्ट कोणते होते हे बघणं महत्वाचं आहे…

१. काशी विश्वनाथ कॉरिडोर

वाराणसी स्थित काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या सुशोभीकरणाच्या रूपात काशी विश्वनाथ कॉरिडोरची निर्मिती केली जात आहे. मंदिराच्या संग्रहित क्षेत्रातील अनेक घरांचं अधिग्रहण करून या परिसराला एका सुंदर आणि भव्य देवस्थानाचा परिसर म्हणून विकसित करण्यास चालू आहे.

पुढच्या वर्षीच्या सुरुवातील या प्रकल्पाचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे. जवळपास ७०० कोटी रुपये इतकी गुंतवणूक या प्रकल्पात करण्यात आली आहे.

२. वाराणसी रिंग रोड

वाराणसीचे खासदार बनल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आपल्या मतदार संघात रस्त्यांचं जाळं विणलं आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. यात सगळ्यात मोठा प्रोजेक्ट मोदींनी वाराणसीला दिला तो म्हणजे रिंग रोड.

तीन फेजमध्ये बनत असलेल्या या रिंग रोडचा एक मोठा हिस्सा वाराणसीच्या बाबतपुरच्या रस्त्यावर, दुसरा जिल्हा मुख्यालयापासून चांदोली आणि तिसरा कॅन्टपासून राजा तलावाच्या रस्त्यावर बनवला जात आहे. या सगळ्या तीन हिस्स्यामधील प्रकल्पावर १ हजार कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च केले जाणार आहेत.

३. बनारस हिंदू विद्यापीठातील सेवांचा विकास

बनारस हिंदू विद्यापीठामध्ये केंद्र सरकारकडून आरोग्य सेवांच्या बाबतीत अनेक कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. गुरुवारी बीएचयूमध्ये मुलांसाठी १०० बेडच्या एमसीएच विंगची सुरुवात झाली आहे. यासोबतच इथं एक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची देखील निर्मिती करण्यात आली आहे.

बीएचयूला सध्या एम्सच्या धरतीवर विकसित करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाकडून काम सुरु आहे. सोबतच वाराणसीच्या इतर हॉस्पिटल्समध्ये देखील नवीन ऑक्सिजन आणि इतर सुविधांचा विकास केला जात आहे.

४. वाराणसी स्मार्ट सिटी प्रॉजेक्ट

वाराणसीच्या अनेक भागांमध्ये स्मार्ट सिटीच्या धरतीवर विकसित करण्यासाठी अनेक योजनांवर एकाच वेळी काम सुरु आहे. यात शहरात स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम, इंटीग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सिस्टम, अंडरग्राउंड केबलिंग प्रॉजेक्ट, स्ट्रीट लाइटिंग प्रॉजेक्ट्स यावर युध्दपातळीत काम सुरु आहे.

५. इनलँड वॉटर वेज प्रॉजेक्ट

वाराणसीच्या हल्दिया पर्यंत पाण्यातून मालवाहतूक जहाज चालवण्याच्या दिशेने वाराणसीमध्ये इनलँड वॉटर वेज नेटवर्क बनवण्याचं काम सुरु आहे. याअंतर्गत वाराणसीच्या राजघाटमध्ये पोर्ट बनवणे आणि गंगा नदीमध्ये ड्रेजिंग करून क्रूज सेवा सुरु करण्यावर काम केलं जात आहे.

६. वंदे भारत एक्सप्रेस आणि स्टेशन्सचा विकास

वाराणसीच्या अनेक रेल्वे स्टेशन्सला नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान बनल्यानंतर विकसित केलं गेलं आहे. शहरातील प्रमुख मंडुवाडीह स्टेशनचे नाव बदलून आता वाराणसी स्टेशन करण्यात आलं आहे. यासोबतच अनेक मुख्य रेल्वे सेवांची सुरुवात करण्यात आली आहे, शिवाय प्लॅटफॉर्म देखील वाढवण्यात आले आहेत.

पंतप्रधान मोदींनी वाराणसीला सध्याला महामना एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस, महाकाल एक्सप्रेस, मंडुवाडीह – नवी दिल्ली सुपरफास्ट एक्सप्रेस या सारख्या अनेक मोठ्या रेल्वेचं गिफ्ट दिलं आहे. या सोबतचं वाराणसीला हायस्पीड रेल्वे कॉरिडोरमध्ये जोडण्याचं आणि बुलेट ट्रेन प्रॉजेक्टमध्ये समाविष्ट करण्यावर काम सुरु आहे

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.