नरेंद्र मोदींना नंबर वन ठरवणाऱ्या कंपनीबद्दल थोडं माहिती करून घेऊ भिडू

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरातील प्रसिद्ध आणि बड्या नेत्यांपैकी एक. त्यांची प्रसिद्धी हरएक सर्वेक्षणातून पहायला मिळते. मग ते सर्वेक्षण देशांतर्गत असो किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचं नरेंद्र मोदी हे प्रसिद्ध नेत्यांच्या यादीत कायम आघाडीवर असतात.

असंच काहीसं सर्वेक्षण गेल्या दोन दिवसांपूर्वी सुद्धा केलं केलं. द मॉर्निंग कंसल्ट या कंपनीने एक सर्वे केला, जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांचा. या यादीत सुद्धा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नंबर वनला होते.

नरेंद्र मोदी यांना ७० % अप्रूव्हल रेटिंग मिळालं आहे.

कंपनीच्या या अप्रूव्हल रेटिंगमध्ये नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासोबत १३ राष्ट्रप्रमुखांना सुद्धा मागं सोडलय.

आता पेट्रोल – डिझेलचे वाढते दर, गॅस सिलेंडरचा वाढत्या किमती, कोरोनाच्या काळातली परिस्थिती या सगळ्या बाबतीत लोकांच्या नाराजगीवर मात करत नरेंद्र मोदी सर्वात लोकप्रिय नेते ठरणं ही जरा इंटरेस्टिंग गोष्ट आहे.

पण नरेंद्र मोदी यांना हे रेटिंग मिळवून देणारी कंपनी सुद्धा तितकीचं इंटरेस्टिंग आहे. चला तर मग भिडू जाणून घेऊया या कंपनीबद्दल…

तर मोदींना नंबर वन ठरवणारी द मॉर्निंग कंसल्ट ही एक अमेरिकन डेटा इंटेलिजन्स कंपनी आहे. जी लोक सद्यस्थितीत काय विचार करतात यावर मार्केट रिसर्च करते. आज अमेरिकेच्या टॉप कंपनीमध्ये ही लिस्टेड कंपनी आहे.

पण असं म्हणतात ना कुठल्याही मोठ्या व्यक्तीच्या किंवा कंपनीच्या उभं राहण्यामागं एक इंटरेस्टिंग किस्सा हा असतोचं.

तर मायकेल रॅमलेटने त्याच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने अमेरिकेतील तरुणांमध्ये स्वाक्षरी मोहीम आणि मतदान सुरू केले. यामध्ये अफोर्डेबल केअर अॅक्टमध्ये अमेरिकन तरुणांना सुद्धा समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली होती. इथूनच सुरूवात झाली द मॉर्निंग कन्सल्टला, जीचं २०१४ मध्ये कंपनीत रूपांतर झाले.

त्याच वर्षी जेव्हा नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले. कंपनी ऑनलाइन तंत्रज्ञानाद्वारे जगभरात संशोधन आणि सर्वेक्षण करते. त्याचे मुख्यालय वॉशिंग्टन डीसी येथे आहे.

इंडस्ट्री लीडिंग स्टॅंडर्ड साठी कंपनीने डेटा कलेक्शन टेक्नॉलॉजीला लॉन्च केलं. त्याच्या मदतीने कंपनी जगभरातील शंभर कोटींपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचली आहे. 

मॉर्निंग कन्सल्ट ७ दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजच्या आधारे अप्रूव्हल आणि डिसअप्रुव्हल रेटिंग तयार करते. या कॅल्क्युलेशनमध्ये १ ते ३ टक्के प्लस-मायनस मार्जिन आहे. म्हणजेच, अप्रूव्हल आणि डिसअप्रुव्हल रेटिंग १ ते ३ टक्क्यांनी कमी किंवा वाढवता येऊ शकते.

कंपनीचे आजपर्यंतचे सर्वेक्षण बऱ्यापैकी बरोबर ठरले आहेत. यातलचं एक उदाहरण म्हणजे २०१६ ची अमेरिकेचा राष्ट्रपती पदाची निवडणूक. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या सर्वेक्षणाच्या आधारे कंपनीने अहवाल जारी केला होता.

निवडणुकीचा निकाल लागल्यावर मॉर्निंग कन्सल्ट अहवालाची पुष्टी झाली. कंपनीचे आकडे केवळ एक टक्क्यांच्या फरकाने होते. निवडणुकीदरम्यान, कंपनीने राजकीय समस्या, उमेदवार आणि माध्यमांबाबत विविध रिपोर्ट पब्लिश केले होते.

यासोबतचं कंपनीने कंज्यूमर ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. याद्वारे कंपनी दररोज चार हजार कंपन्या आणि बहुराष्ट्रीय ब्रँड्सच्या उत्पादनांचे सर्वेक्षण करते.

कंपनीने जगभरातील देशांतर्गत आणि जागतिक आर्थिक अॅक्टिव्हीटीचा मागोवा घेणे सुरू केले. या दैनंदिन अॅक्टिव्हीटीच्या ट्रॅकिंग रिपोर्ट्सवर अनेक देशांच्या सरकारांचा विश्वास आहे.

कंपनीने २०१९ मध्ये मशीन लर्निंगचा वापर करून सर्वेक्षण अॅप विकसित केले. यामध्ये, मानवाच्या सामान्य बोलल्या जाणार्‍या भाषेचा वापर करण्यात आला आहे, जेणेकरून सर्वेक्षणादरम्यान कोणत्याही भाषेची अडचण होणार नाही.

मॉर्निंग कन्सल्टने कोरोना काळात ३६ मिलीयन डॉलरची सीरीज ए उभारली. त्याचे व्हॅल्यूएशन ३०६ मिलीयन यूएस डॉलर होती. याद्वारे, कोरोनाचा डेटा रिअल टाइममध्ये नेव्हिगेट केला जाऊ शकतो.

एका अकाउंटिंग कंपनीच्या मते, द मॉर्निंग कन्सल्ट ही २०१८ आणि २०१९ मध्ये सर्वात वेगाने वाढणारी टेक्नॉलॉजी बेस्ड कंपनी आहे. कंपनीची सध्याची उलाढाल म्हणाल तर ६ वर्षातच कंपनी १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाली आहे. 

हे ही वाचं भिडू : 

 

Leave A Reply

Your email address will not be published.