PM केअर आणि डॉ.हिरेमठ यांच्याबद्दल सुरू असलेला व्हेंटिलेटर वाद नेमका काय आहे?

गेले कित्येक महिने सुरु असलेलं कोरोनाच संकट अजूनही दूर होण्याचं नाव घेत नाही आहे. अजूनही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत च आहे. राज्य असो वा केंद्र सरकारी मदत कमी पडत आहे.

कोरोनावर आवर जरी घालता येत नसला तरी श्रेयवादाची युद्धे जोरात लढली जात आहेत.

असच काही ट्विटर वर पाहायला मिळालं. झालंय काय तर भाजपा महिला मोर्चाच्या सोशल मीडिया टीमच्या इनचार्ज प्रीती गांधी यांनी एक व्हेंटिलेटरचा फोटो टाकला आणि लिहिलं की,

My PM cares. He walks the talk! #PMCaresFund

 

जेव्हा मार्च महिन्यात कोरोनाचं संकट आले तेव्हाच लक्षात आलं होतं की

भारतात जेव्हा हा रोग पसरेल तेव्हा व्हेंटिलेटरची आवश्यकता लागणार आहे.

भारतात critical care medical ventilators (CCMV)चा प्रचंड तुटवडा होता. यासाठी लागणारी मशिनरी महाग होती व ती परदेशातून मागवावी लागणार होती.

भारतीय बनावटीचे CCMV व्हेंटिलेटर बनवण्यासाठी प्रचंड प्रयत्न सुरू झाले. बेंगलोर मधील Skanray या कंपनीने यात रिसर्च केला.

अगदी जावा येझडी या गाडीच्या बॅटरी पासून ते डीआरडिओच्या तेजस विमानाच्या तंत्रज्ञानापर्यंत अनेक गोष्टींचा वापर करून त्यांनी व्हेंटिलेटर तयार करण्याचे प्रयत्न सुरू होते.

भारत इलेक्ट्रिकल यांच्या तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे असा व्हेंटिलेटर बनवण्यात अखेर यश आलं.

एस सुहास या बेंगलोर मधील हॉस्पिटल चेनचे मॅनेजिंग डायरेकटर व अँनेस्थेशीया स्पेशालिस्ट असलेले डॉ. जगदीश हिरेमठ हे व्हेंटिलेटर तज्ञ मानले जातात. त्यांची ही कल्पना होती.

या महिन्याच्या 3 तारखेला व्हेंटिलेटरचे ट्रायल घेतले गेले.

त्या नंतर सरकारी परवानगी घेऊन मास प्रोडक्शन सुरू करण्यात आलं. महिन्याला 30 हजार व्हेंटिलेटर बनवण्याची क्षमता असलेल्या या कंपनीने फक्त 1 लाख किंमतीमध्ये हा व्हेंटिलेटर बनवला आहे.

सरकारने 3 हजार व्हेंटिलेटरची ऑर्डर सुद्धा दिली आहे. काही कोरोना साठीच्या हॉस्पिटलमध्ये हे मेड इन इंडिया व्हेंटिलेटर बसवले सुद्धा गेलेत.

पण प्रीती गांधी यांनी या व्हेंटिलेटरबद्दल पंतप्रधान मोदींना धन्यवाद देणारे ट्विट केले आणि ट्विटर वर युद्ध सुरू झालं.

भाजप समर्थकांच म्हणणं होतं की पंतप्रधानांच्या पीएम केअर फंडातून मिळालेल्या पैशातून हे स्वदेशी बनावटीचे व्हेंटिलेटर तयार झाले आहेत आणि गेल्या सत्तर वर्षात जे काम झालेलं नाही ते मोदींनी करून दाखवलं.

पण कोणी तरी या ट्विट मध्ये व्हेंटिलेटरचे निर्माता डॉ. जगदीश हिरेमठ यांना टॅग केलं. प्रीती गांधी यांचे ट्विट पाहून जगदीश हिरेमठ यांचा संताप झाला.

त्यांनी ट्विट करून सांगितलं की हे व्हेंटिलेटर आम्ही बनवले असून यावर स्टिकर चिकटवण्या पलीकडे पीएम केअरची कोणतीही मदत झालेली नाही.

आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात की,

पंतप्रधान आणि त्यांच्या ऑफिसला इतरांनी केलेल्या कामाचं श्रेय घेताना लाज वाटली पाहिजे. तुम्ही तुमचा एक समर्थक आज गमावला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.