कर्नाटकात हॉटेलवाल्यांनी नरेंद्र मोदींना रुम शिल्लक नाही अस सांगितलं होतं…
निकालाच्या दिवशी बारा वाजू लागले तसे कर्नाटकातल्या तिन्हीही पक्षांचे बारा वाजले. नुकतच निवडून आलेले आमदार गुलालातं आनंद साजरा करत होते तोच त्यांना हॉटेलमध्ये जाण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले.
मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये कॉंग्रेसन आपल्या आमदारांना ठेवलं. भाजपने त्यांच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं. कुमारस्वामी देखीव बाह्या सरसावत पुढे आले आणि त्यांनी देखील आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं. त्यानंतर चालू झालं ते हॉटेल पॉलिटिक्स. कर्नाटकातल्या या हॉटेल पॉलिटिक्सच्या पार्श्वभूमीवर प्रधानसेवक नरेंद्र मोदींचा हा किस्सा, “जेव्हा प्रधानसेवक मोदींनाच म्हैसुरमध्ये हॉटेलची रुम नाकारण्यात आली होती”
तर हा किस्सा फेब्रुवारी २०१८ मधला.
म्हैसुरचं ललिता महल हे हॉटेल संपुर्ण भारतात प्रसिद्ध आहे. या हॉटेलची निर्मीती सन १९२१ म्हैसुर संस्थानचे राजे चौथे कृष्णराज वडियार राजांनी केली होती. पांढऱ्याशुभ्र रंगात असणाऱ्या इमारतीची निर्मीती भारताच्या व्हाईसरॉयला म्हैसुरच्या दौऱ्यांवर असताना थांबण्याची सोय म्हणून करण्यात आली होती. स्वतंत्र भारतात या हॉटेलचा ताबा भारतीय पर्यटन विकास निगमच्या ताब्यात आला. त्यानंतर हे हॉटेल भारतातील अनेक राजकारण्यांच हक्काचं ठिकाण बनलं. हि झाली हॉटेलची माहिती आत्ता मुळ किस्सा कसा झाला ते,
तर फेब्रुवारी महिन्यात नरेंद्र मोदी कर्नाटकच्या दौऱ्यावर होते. साधारणं पंतप्रधानांचा दौरा हे पुर्वनियोजित असतो. मात्र कर्नाटकच्या दौऱ्यावर असणाऱ्या प्रधानसेवकांना अचानक श्रवणबंगलोर येथील जैन समाजाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित रहायला लागले. आत्ता म्हैसुरमध्ये पंतप्रधान मुक्काम करणार आहे असा आदेश जिल्हा प्रशासनास आला व जिल्हा प्रशासन नेहमीच्या ललिता महलमध्ये रुम बुक करायला गेले.
जिल्हा प्रशासनने हॉटेलच्या प्रशासनास सांगितल, प्रधानमंत्री येणार आहेत रुम शिल्लक ठेवा. हॉटेल प्रशासनाने सांगितलं रुम बुक आहेत..
चक्क मोदींना रुम बुक आहेत म्हणून सांगण्याचं धाडस ? हॉटेलचे नियम ते हॉटेलचे नियम. एका लग्नासाठी सर्व हॉटेलबुक असून फक्त तीनच रुम शिल्लक आहेत. प्रधानसेवकांचा ताफा पाहता तिन रुममध्ये व्यवस्था करणं अशक्य असल्याचं जिल्हा प्रशासनास कळवण्यात आलं. आलेला नकार मोठ्या कष्टानं पचवत प्रधानसेवक नरेंद्र मोदिंची सोय म्हैसुरमधील रेडिसन ब्ल्यू या हॉटेलात करण्यात आली.