रविंद्रनाथ टागोरांच्या कविता अन् मोदींच्या कविता…

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला नवीन लुक मधील फोटो फेसबुकवर पोस्ट केला. या फोटोमध्ये नरेंद्र मोदींच्या लुकची तुलना रविंद्रनाथ टागोर यांच्यासोबत करण्यात आली.

आत्ता लुक नेमका टागोर यांच्यासारखा दिसतो की नाही हे नेमकं सांगता येत नसलं तरी नरेंद्र मोदी हे कवी आहेत हे सांगण आमचं काम आहे. 

रविंद्रनाथ टागोर यांच्याप्रमाणे त्यांच्या कविता आहेत की नाहीत हे वाचकच ठरवतील पण २००७ साली ६७ कविता असणारा त्यांचा “आंख आ धन्य छे” हा कवितासंग्रह प्रकाशित झाला होता. याचा मराठी अनुवाद नयन हे धन्य रे  या नावाने जयश्री जोशी यांनी केला आहे. 

यातीलच निवडक कविता 

गरबा 

गाईल त्याचा गरबा 

साथ देईल त्याचा गरबा 

गुजरातचे गौरवशाली वैभव म्हणजे गरबा 

खेळेल त्याचा गरबा 

आणि नाचेल त्याचा गरबा 

गुजरातचे गौरवशाली वैभव म्हणजे गरबा 

सुर्यचंद्रही गरबा 

अन् ऋतू देखील गरबा 

गुजरातचे गौरवशाली वैभव म्हणजे गरबा 

दिवस म्हणजे गरबा 

अन् रात्र देखील गरबा 

गुजरातचे गौरवशाली वैभव म्हणजे गरबा 

संस्कृती म्हणजे गरबा 

अन् प्रकृती म्हणजे गरबा 

बासरीही गरबा, मोरपीसही गरबा 

गरबा म्हणजे मति, गरबा म्हणजे सहमति

वीरांचाही गरबा, अमिरांचाही गरबा… 

  • नरेंद्रमोदी ( आंखआधन्यछे) 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूसरी कविता 

प्रेम 

माझं प्रेम जळाच्या साखळीसारखं 

बांधून ठेवता येत नाही 

शपथ घातली कुणी तर ते मला नाही आवडत 

तशा संबधात मग माझं मन नाही रमत 

रात्रभर दवांसराखं जमणारं हे प्रेम 

पकडून ठेवता येत नाही 

उन्हे मुठ्ठीत येणार कशी? 

हवा पिंजऱ्यात राहणार कशी? 

बहुरूपी ढगांसारखं विहरणारं हे प्रेम 

पकडून ठेवता येत नाही 

धुके पसरते, धुके निवळते 

सुर्याला त्याचे काहीच नसते 

राजहंसासारखं तरंगणारं हे प्रेम 

उगाच माळेत ओवलं जात नाही..

नरेंद्र मोदी ( आंख आ धन्य छे) 

लखलाभ तुम्हां 

पाण्याला दगड म्हणा 

किंवा म्हणा दगडाला जल 

ढगांना गगनाचे सळ म्हणा 

की म्हणा कमळाला बाभुळ 

त्यांना काहीच फरक पडत नसतो 

अफवांना तुम्ही सत्य समजू शकता 

दिवसाला रात्रही म्हणू शकता 

वसंताला पानगळ म्हणू शकता 

आणि सागराला वाळवंट 

जीवनाला मरणही म्हणू शकता 

हा तुमच्या वाणीचा व्यभिचार 

तुम्हा लखलाभ असो 

निसर्ग तर असतो तसाच असतो 

स्वस्थ आणि तटस्थ 

  • नरेंद्र मोदी ( आंख आ धन्य छे) 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तिसरी कविता 

सोडा 

काया सोडा, माया सोडा 

वस्तू अन् सावल्याही सोडा 

किल्ले तोडा, पिंजरे तोडा 

मऊ हळुवार ही, स्वप्ने सोडा ! 

रात रखडते, रात भटकते 

एकटीच काही बडबडते 

वाणी सोडा, अर्थही सोडा 

आणि भ्रमाचा, पाया सोडा ! 

नाही कुणी तर, नसेल ना का 

असेल कुणी तर असेल ना का 

आहे असेलचे सोडा मंथन 

नसण्याच्या पंथा घ्या हो पांघरून ! 

  • नरेंद्र मोदी ( आंख आ धन्य छे) 

आत्ता आपण रविंद्रनाथ टागौर यांच्या निवडक कविता पाहू. मुळ कविता बंगाली मधून आहेत ज्याचे हिंदी भाषांतर करण्यात आले आहे. 

मान ली, हार मान गई.

जितना ही तुमको दूर ढकेला

उतनी ही मैं दूर भई.

मेरे चित्‍ताकाश से

तुम्‍हे जो कोई दूर रखे

कैसे भी यह सह्य नहीं

हर बार ही जान गई.

अतीत जीवन की छाया बन

चलता पीछे-पीछे,

अनगिन माया बजाकर वंशी

व्‍यर्थ ही पुकारें मुझे.

सब छूटे, पाकर साथ तुम्‍हारा

अब हाथों में डोर तुम्‍हारे

जो है मेरा इस जीवन में

लेकर आई द्वार तुम्‍हारे.

  •  रविंद्रनाथ टागौर (गितांजली अनुवाद रणजित साहा) 

चित्त जहाँ भय-शून्य, माथ हो उन्नत

हो ज्ञान जहाँ पर मुक्त, खुला यह जग हो

घर की दीवारें बने न कोई कारा

हो जहाँ सत्य ही स्रोत सभी शब्दों का

हो लगन ठीक से ही सब कुछ करने की

हों नहीं रूढ़ियाँ रचती कोई मरुथल

पाये न सूखने इस विवेक की धारा

हो सदा विचारों ,कर्मों की गतो फलती

बातें हों सारी सोची और विचारी

हे पिता मुक्त वह स्वर्ग रचाओ हममें

बस उसी स्वर्ग में जागे देश हमारा.

  • रविंद्रनाथ टागौर (गितांजली अनुवाद प्रयाग शुक्ल)

चुप-चुप रहना सखी, चुप-चुप हीरहना,
काँटा वो प्रेम का-
छाती में बींध उसे रखना
तुमको है मिली सुधा, मिटी नहीं अब तक
उसकी क्षुधा, भर दोगी उसमें क्या विष !
जलन अरे जिसकी सब बेधेगी मर्म,
उसे खींच बाहर क्यों रखना !!

  • रविंद्रनाथ टागौर (गितांजली अनुवाद प्रयाग शुक्ल)

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.