तिने पाहिलेलं एक स्वप्न संपूर्ण देशात पोलिओ मुक्तीचा पाया रचून गेलं..

पोलिओ हा एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे ज्यामुळे शरीराच्या विविध भागांमध्ये अपरिवर्तनीय पक्षाघात होऊ शकतो. एकेकाळी देशातील सुमारे पन्नास हजार मुले दर वर्षी या आजाराला बळी पडत. दरम्यान, आता भारताला पोलिओपासून मुक्त होऊन दहा वर्षांहून अधिक काळ लोटलाय.

दरम्यान, सत्तर वर्षांपूर्वी एका महिलेने पोलिओमुक्त भारताचे स्वप्न पाहिले होते. हा त्या महिलेने घातलेला पायाच होता, ज्यामुळे 2011 मध्ये भारत पोलिओमुक्त झाला. ती महिला म्हणजे फातिमा इस्माईल.

सुरुवातीपासूनच समाज सुधारणेत रस
4 फेब्रुवारी 1903 रोजी फातिमा इस्माईलचा जन्म झाला. गांधीवादी प्रख्यात नेते उमर सोबानी यांची ती बहीण. ज्यामुळं, लहानपणापासूनच ती राजकीय वातावरणात वाढली. याचा परिणाम असा झाला की अगदी लहान वयातच तिने सामाजिक सुधारणांबाबत गांभीर्याने विचार करण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला तिने महिलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करायला सुरवात केली. याच अनुषंगाने तिने महिलांसाठी सुरू केलेल्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शिकवायला सुरूवात केली. 1936 मध्ये त्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या शिमला शाखेत सचिव बनली.

त्यावेळी,देशात ब्रिटीशांविरूद्ध स्वातंत्र्य चळवळ संपूर्ण तीव्रतेने सुरू झाली. फातिमा यांनीही यात भाग घेतला. त्यांच्या मुंबई इथल्या घरी अनेक कॉंग्रेस नेते नावं बदलून रहायची आणि ब्रिटीशांविरूद्ध रणनीती आखत. या नेत्यांमध्ये जयप्रकाश नारायण आणि अरुणा असफ अली होते.

ब्रिटिशांविरूद्ध स्वातंत्र्यलढ्याची तीव्रता वाढली, ज्यानंतर 1942 मध्ये गांधीजींच्या नेतृत्वात भारत छोडो आंदोलन सुरू झाले.

तोपर्यंत फातिमा इस्माईलचे लग्न झाले होते आणि त्यांच्या घरी एक मुलगी झाली होती. 1945 मध्ये समजले की, त्यांच्या मुलीला पोलिओने ग्रासले आहे. आणि जर लवकर काही केले नाही तर परिस्थिती आणखी बिकट होईल. तिच्यावरच्या उपचारासाठी फातिमा यांनी देशभर फिरल्या. लवकरच त्यांना कळले की मुलीची प्रकृती सुधारण्यासाठी आणखी काही करता येणार नाही. पण फातिमा यांनी हिंमत गमावली नाही.

या संपूर्ण सहलीमध्ये त्यांना पोलिओशी झगडणारी अनेक मूलं दिसली. तिने निर्णय घेतला की,

ती आपल्या मुलीचीच प्रकृती सुधारणार नाही तर , या मुलांना शक्य तितकी मदत करेल.

दरम्यान, त्यांच्या पतीची इराण येथे बदली झाली. पण फातिमाने फक्त भारतातच राहायचं ठरवलं. त्यांना समजले की मद्रासमध्ये एमजी कीनी नावाचे एक डॉक्टर आहेत, जे आपल्या मुलीवर उपचार करू शकतात. वेळ न गमावता ती मद्रासला रवाना झाली.

जेव्हा ती मद्रासला पोहोचली तेव्हा डॉक्टरांनी तिच्या मुलीवर उपचार करण्यास नकार दिला. परंतु फातिमाच्या वारंवार विनंतीवरून शेवटी त्यांनी उपचार करण्यास सहमती दर्शविली. पुढील आठ महिन्यांपर्यंत त्यांच्या मुलीवर उपचार सुरू होते.

या उपचारानंतर तिच्या मुलीची फिजिओथेरपीद्वारे एकदम ठीक करणे आवश्यक होते. ज्यामूळं फातिमा पुण्यात आल्या. पुण्यात फिजिओथेरपी सेंटर होते. तेथे जखमी झालेल्या ब्रिटीश सैनिकांवर उपचार केले जात होते. पुढे विनंतीनंतर, त्यांच्या मुलीला फिजिओथेरपीद्वारे बरं करण्याची परवानगी मिळाली.

त्याआधी, 1920 मध्ये, फातिमा व्हिएन्ना येथे मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी गेल्या होत्या मात्र कुटूंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना मधूनच शिक्षण सोडून परत यावे लागले होते. या दरम्यान त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात बरेच काही शिकले होते. याचा फायदा त्यांना आता झाला.

दुसरीकडे, फिजिओथेरपीनंतर त्यांच्या मुलीची प्रकृती बर्‍याच प्रमाणात सुधारली. यामुळे प्रोत्साहित होऊन फातिमाने निर्णय घेतला की पोलिओने पीडित मुलांना मदत करतील.

पोलिओने ग्रस्त मुलांसाठी उघडले क्लिनिक

तो 1947 चा काळ होता. देश स्वातंत्र्याच्या शेवटच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. यावेळी फातिमा यांनी मुंबईच्या चिकीत्सा समाजातील नामांकित व्यक्तींना पोलिओ ग्रस्त मुलांसाठी पुनर्वसन क्लिनिक उघडण्याचे आवाहन केले.

परंतु आर्थिक संसाधनांच्या अभावामुळे हे शक्य झाले नाही. दरम्यान, बॉम्बे डॉक्टर एव्ही बालिगा यांनी फातिमा यांना त्यांचे क्लिनिक दिले. त्याचवेळी पुणे केंद्रातील फिजिओथेरपी आणि तिथे काम करणारे डॉक्टर व कर्मचारीही या क्लिनिकमध्ये आले. हे पुणे केंद्र ब्रिटीशांच्या सुटण्याच्या जवळजवळ बंद होणार होते, त्यामुळे तसे करणे सोपे झाले.

मे 1947 मध्ये, हे क्लिनिक कार्यरत होऊ लागले आणि एका वर्षाच्या आत येथे जवळपास 80 मुलांवर उपचार सुरू केले.

या क्लिनिकची बातमी वर्तमानपत्र आणि मासिकांमधून पसरली आणि बॉम्बे सिरकर यांनी फातिमा यांना क्लिनिकच्या विस्तारासाठी अधिक जागा दिली. पुढे फातिमा यांनी अमेरिका आणि इंग्लंडमध्ये भाषणे केली आणि पोलिओने पीडित मुलांसाठी रुग्णालय उघडण्याच्या आवश्यकतेकडे भारत सरकारचे लक्ष वेधले.

यानंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1953 मध्ये अशाच प्रकारच्या रुग्णालयाचे उद्घाटन केले. 1953 मध्ये फातिमा यांनी पोलिओने ग्रस्त मुलांसाठी एक शाळा देखील उघडली. पुढे त्यांनी अशा आणखी शाळा उघडल्या. आज त्यांच्या शाळांमध्ये 300 हून अधिक मुले शिक्षण घेत आहेत.

फातिमा यांच्या या निःस्वार्थ सेवेबद्दल त्यांना 1958 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.

त्याने आपल्या मुलीलाच नव्हे, तर हजारो मुलांना पोलिओच्या असह्य वेदनातून बाहेर काढले. 2011 मध्ये आपला देश पोलिओपासून पूर्णपणे मुक्त झाला हा त्यांच्या प्रयत्नांचा परिणाम होता. दरम्यान, 4 फेब्रुवारी 1987 रोजी फातिमा इस्माईल यांचे निधन झाले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.