पाच नवऱ्यांच्या पांचालीची परंपरा आजही या गावांमध्ये पाळली जाते…
हा प्रसंग आहे, महाभारतातला
पण जिंकल्यावर द्रौपदीसह पांडव घरी आले, आपल्या मुलांची चाहूल ऐकून कुंती म्हणाली,
“बाळांनो, आज जे काही मिळाले असेल, ते पाचीजणात वाटून घ्या बरे”
झालं इथंच सगळं गंडलं.
हे ऐकून युधिष्ठीराने हट्टचं धरला, की मातृवचन ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. आपल्या सगळ्यांकडून याचं पालन झालंच पाहिजे. आता सर्वच पांडवांना द्रौपदी हवीहवीशी वाटतं होती. म्हणून कुंतीने निर्णय दिला, की द्रौपदीने पाचही पांडवांची पत्नी बनून राहावे.
आता हा लै जुना किस्साय. त्याचा आत्ताच्या काळाशी संबंध जोडायचा विषय काय?
तर महाभारताच्या द्रौपदीच्या नावाखाली मुलींच आयुष्य कसं उध्वस्त होत हे आज तुम्हाला वाचायला मिळणार आहे. वाचून तुम्हाला जरा विचित्र वाटेल ? पण ‘एका बाईचे पाच नवरे’ ऐकून कसं वाटतंय सांगा जरा..
पाच नाहीतर मग जास्तीचे पण नवरे केले जातात. पण त्याला म्हणतात काय?
एका बाईने अनेक नवरे करणं या प्रथेला पॉलिएन्ड्री प्रॅक्टिस असं म्हणतात. या प्रथेनुसार एक स्त्री कुटुंबातील सर्व भावांशी लग्न करते. परिणामी तिला दोन, तीन किंवा कधीकधी सहा नवरा देखील बोनस म्हणून मिळतात.
हि प्रथा नेमकी चालते कुठं ?
उत्तराखंडच्या जौनसार बावर, दक्षिण काश्मीरमधील हिमालयीन प्रदेश, नीलगिरीच्या पायथ्याला, त्रावणकोरचे नायर आणि मलबार टेकड्यांच्या इजरेह जाती आणि नेपाळच्या लामा समाजात आजही ही प्रथा कायम आहे. या व्यतिरिक्त, देहरादूनच्या खासा जमाती, अरुणाचल प्रदेशची गाइलोंग जमात, केरळचे मदेसर, माविलन, कोटा, करवाजी, पुलाया, मुथुवन आणि मन्नान जातींमध्येही हे अनेक नवऱ्याचं प्रकरण चालतं.
‘घोटुल’
पण जास्त प्रमाणात ही प्रथा हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यात चालते. या प्रथेला इथल्या भाषेत घोटुल सिस्टम म्हणतात. या जुन्या प्रथेमुळे सर्व भाऊ एकाच मुलीशी लग्न करतात. या प्रथेविषयीची मान्यता पांडव आणि द्रौपदीशी संबंधित आहे. त्यामुळं हे सर्रास चालतं.
असे मानलं जातं की महाभारत काळात द्रौपदी व आई कुंती यांच्यासह पांडवांनी किन्नौर जिल्ह्याच्या लेण्यांमध्ये अज्ञातवासाचे काही क्षण घालवले.
आणि त्यामुळे हे पांडवांची प्रथा पुढं चालवतायत वाटतं.
आता जेव्हा या भागात मुलीचं लग्न ठरवलं जातं तेव्हा मुलीच्या घरचे भावी नवऱ्यांचं घर बघायला जातात. लग्न ठरवल्यावर या भावांना एकेक टोपी दिली जाते. आता ह्या टोपीचं मुख्य काम म्हणजे, जर कोणी एक भाऊ बायको सोबत खोलीत बंद असेल तर तो आपली टोपी दरवाजावर लटकवतो. आता यामुळं दुसऱ्या भावांना समजतं की, आपण आत्ता खोलीत प्रवेश करायला नको.
१९११ साली झालेल्या जनगणनेत अशा जातींचा मोठ्या प्रमाणात उल्लेख आला आहे ज्यात पॉलिएन्ड्री प्रकरणांची उदाहरणं सापडली आहेत. पण शतकानुशतके सुरु असलेली ही प्रथा आजही संपलेली नाही. आजही लोक या प्रथेचे पालन करतात. जे लोक या पद्धतीवर विश्वास ठेवतात ते म्हणतात की,
अशा विवाहांमुळे मालमत्ता आणि संपत्तीचे विवाद टाळता येतात. आणि काही लोक ही प्रथा लोकसंख्या नियंत्रित करण्याचे एक साधन मानतात.
एकविसाव्या शतकातसुद्धा असे लोक आहेत जे आपल्या मुली आणि बहिणींचं संपूर्ण आयुष्य अशा नरकात ढकलतात.
या पॉलिएन्ड्री प्रथेविषयी एका टीव्ही कार्यक्रमात एक मुलगी म्हणते,
तिनं तिच्या कुटुंब आणि चालीरितीचे पालन करुन एकाच कुटुंबातील तीन मुलांबरोबर लग्न केले. लग्नानंतर ती मुलगी आपल्या लांडग्यासारख्या तीन पतींची भूक शांत करण्यात व्यस्त आहे.
आता बायांचं हे दुःख कोणाला समजणार, कदाचित कोणाला नाही. या मुलींसारख्या अनेक मुली आहेत ज्या हे सगळं सहन करतायत. आणि आपण महिला सशक्तीकरण, बेटी पढाओ आणि बेटी बचाओ या विषयांवर चर्चा करतोय.
हे ही वाच भिडू
- जगात चर्चाय, सेक्स पॉवर वाढवायला कडकनाथ कोंबड्यासोबत हे प्राणी पण खातात !
- सोसायटीवाल्यांच्या त्रासाला वैतागून त्या म्हणाल्या, मी सेक्स रॅकेट चालवत नाही
- भारताचं सर्वात पहिलं सेक्स स्कॅण्डल : यामुळे चांगला माणूस पंतप्रधानपदापासून मुकला होता