पूजा चव्हाण आत्महत्येबाबत माध्यमे “संबंधित मंत्र्याचं” नाव का घेत नाहीत..? 

काही दिवसांपासून पूजा चव्हाण हे नाव तुम्हाला बातम्यांमध्ये झळकताना दिसत असेल.  पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील महमंदवाडी येथील हेवन पार्क या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केल्याची ही बातमी. या आत्महत्येनंतर माध्यमांमधून शिवसेनेचे विदर्भातील एक मंत्री या घटनेशी संबधित असल्याच्या बातम्या येवू लागल्या. 

काल माध्यमांसोबत बोलताना चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांचे नाव घेतले. यापूर्वी भाजपच्याच अतुल भातखळकर यांनी देखील संजय राठोड यांचे नाव घेतल्याचं सांगितलं जातं. पण त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात मात्र संबधित मंत्री असाच उल्लेख आहे.  

चित्रा वाघ म्हणाल्या की, 

पूजा चव्हाण घटनेत समोर आलेली माहिती पाहता या प्रकरणाचा रोख शिवसेना मंत्री संजय राठोंडांकडे जातो. पोलीसांनी स्यूमोटो घेवून मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. 

तर अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहले होते त्यात ते म्हणाले होते की, 

शिवसेना पक्षाचे यवतमाळ जिल्ह्यातील आमदार व आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री असलेल्या नेत्याचे नाव याप्रकरणी पुढे आले आहे. या मंत्र्यांचे व आत्महत्या केलेल्या तरुणीचे प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. यासंदर्भातील ऑडिओ क्लिप्स व काही फोटो व्हायरल होत आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे.

आत्ता वरच्या या दोघांचे स्टेटमेंट नीट वाचा यामध्ये चित्रा वाघ यांनी संबंधित मंत्र्याचं नाव घेतल्यानंतरच माध्यमांमधून चित्रा वाघ यांचा आरोप व त्यानंतरच संजय राठोड यांच नाव थेटपणे घेतलं जावू लागलं.  यापूर्वीच्या बातम्यांमध्ये सर्वच माध्यमांनी यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार अथवा महाविकास आघाडीतील मंत्री असा उल्लेख केला होता… 

नेमकं अस काय असत की अशा प्रकरणात “माध्यमे” संबंधित मंत्र्याचे नाव घेवू शकत नाहीत… 

सोशल मिडीयावर प्रत्येक बातमीच्या खालीच एकाच प्रकारचा प्रश्न विचारला जात आहे तो म्हणजे माध्यमे या मंत्र्याच नाव का घेत नाहीत. त्यासाठी काही दिवसांपूर्वी चर्चेत असणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाचा देखील दाखला दिला जात आहे.  त्या वेळी सर्वच माध्यमांनी धनंजय मुंडेचा उल्लेख थेटपणे केला असताना आत्ता मात्र हा उल्लेख का टाळला जात आहे. 

यासाठी धनंजय मुंडे आणि सध्याचे संबंधित मंत्र्यांचे उदाहरण यातील तफावत पहायला लागते.. 

धनंजय मुंडे यांचे कथित बलात्काराचे प्रकरण सोशल मिडीया अथवा एखादी कथित व्हिडीओ/ ऑडिओ क्लिप मधून उघडकीस आले नव्हते तर ते रेणू शर्मा अस तक्रारदार महिलचे नाव होतं. त्यांची लिखित स्वरुपात तक्रार होती.  थोडक्यात काय तर एखाद्या व्यक्तीवर आरोप करणारी व्यक्ती या प्रकरणात होती.. 

दूसरीकडे संबंधित मंत्र्यांचं प्रकरण पाहूया, 

पूजा चव्हाण ही तरुणी मुळची बीड जिल्ह्यातील परळी येथील आहे. तिचे कुटूंब देखील इथेच राहते मात्र काही दिवसांपूर्वीच ती महमंदवाडी येथील हेवन पार्क या सोसायटीमध्ये राहण्यास आली. या दरम्यान तीने आत्महत्या केली. 

यानंतर काही ऑडिओ क्लिप सोशल मिडीयातून प्रसारित करण्यात आल्या. या तरुणींच्या बाबतीत एका कार्यकर्त्याचे आणि त्या नेत्याचे संभाषण या ऑडिओ रेकॉर्डमध्ये असल्याचा दावा या ऑडिओ क्लिप्स सोबत करण्यात आला. 

त्यानंतर भाजपच्या अनेक मंत्र्यांनी संबंधित मंत्र्याचे नाव न घेता चौकशीची मागणी केली.  या तरुणीचे एका मंत्र्यासोबत 

पूजा चव्हाण ही 22 वर्षीय तरुणी मूळची परळी, जिल्हा बीड येथील रहिवासी आहे. गेल्या काही दिवसांपासून ती पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क या सोसायटीमध्ये राहत होती. 

आत्महत्येचा बातमीसोबत या तरुणीचे विदर्भातील एका मंत्र्यांसोबत किंवा महाविकास आघाडीतील एका मंत्र्यांसोबत परिचय असल्याची माहिती देण्यात आली. काही माध्यमांनी तिचे आणि संबंधित मंत्र्यांचे फोटो देखील प्रसिद्ध केले. मात्र नाव घेणं टाळलं. 

दूसरीकडे भाजपच्या देखील कोणत्याही मंत्र्याने संबंधित मंत्र्याचे नाव घेतले नव्हते. अगदी फडणवीसांच उदाहरण पाहायचं झालं तर ते म्हणतात, 

“संबंधित तरुणीचे प्रेमसंबंध एका मंत्र्यांशी असल्याच्या क्लिप सोशल मीडियावर फिरत असल्याचे समजले आहे. एका तरुणीचा मृत्यू व त्याभोवती निर्माण झालेले संशयाचे वर्तुळ पाहता हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांनी करु नये, त्यातील सत्य तात्काळ समोर आले पाहिजे, या तरुणीच्या आत्महत्येभोवती संशयाचे वर्तुळ निर्माण झाले असून याप्रकरणी सखोल चौकशी पोलिसांनी करावी”

अस त्याचं स्टेटमेंट आहे. यामघ्ये देखील संबंधित मंत्र्याच नाव नाही. 

याच मुख्य कारण म्हणजे या मंत्र्यांवर आरोपपत्र दाखल नाही की तक्रारदार कोणी नाही. अशा वेळी पोलीसांची भूमिका महत्वाची ठरते.  पोलीस जोपर्यन्त स्यूमोटो दाखल करुन घेत नाहीत तोपर्यन्त कोणताही विरोधक किंवा माध्यमे संबंधित मंत्र्याचे नाव जाहीरपणे घेवू शकत नाहीत. 

मग चित्रा वाघ यांनी कशाचा आधारावर राठोड यांचे नाव घेतले. 

“पुजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे updates पहाता याचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोडांकडे  जातो पोलिसांनी स्यु-मोटोतंर्गत तक्रार दाखल करत मंत्री संजय राठोड वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा मुख्यमंत्री जी एव्हढे पुरावे असतांनाही मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय”

या ट्विट सोबतच त्यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. त्यात त्या संबंधित ऑडिओ क्लिप्स आणि फोटो यां पुरेशा पुराव्यांचा उल्लेख करतात.  म्हणजे पोलीसांनी या पुराव्यांच्या आधारावर स्यु मोटो दाखल करुन चौकशी करावी अशी त्यांची मागणी आहे. 

हे पुरावे सोशल मिडायवर आल्यानंतरच त्यांनी संजय राठोड यांचे नाव घेतले. 

आत्ता माध्यमांमध्ये संजय राठोड यांचे नावाचा कुठे कुठे उल्लेख आहे हे पाहताना आपणास लक्षात येईल की जिथेजिथे चित्रा वाघ किंवा एखादा मंत्री संजय राठोड यांच्या नावाचा उल्लेख करतो तिथेच संजय राठोड यांच्या नावाचा उल्लेख माध्यमे करतात, अथवा संबंधित मंत्री असाच उल्लेख केला जातो.

पोलीसांनी स्युमोटो दाखल केल्यास किंवा तरुणीच्या कुटूंबानी संबंधित मंत्र्यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतरच तक्रारीमध्ये ज्या मंत्र्याच नाव असेल त्याच नाव माध्यमे थेटपणे घेवू शकतात. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.