पूनम ढिल्लो होती म्हणून पद्मिनी कोल्हापूरेंना पळून जाऊन लग्न करता आलं….

बॉलिवुडमध्ये मराठी ऍक्टर दिसल्यावर सुखद धक्का लोकांना बसतो त्यातही जर त्याने सिनेमात मराठीत डायलॉग म्हणल्यावर तर विषयच संपला. मराठीतल्या बऱ्याच अभिनेत्यांनी, अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे त्यात सयाजी शिंदे, नाना पाटेकर, सदाशिव अमरापूरकर, पद्मिनी कोल्हापूरे, रितेश देशमुख, माधुरी दीक्षित आणि अजून बरेच कलाकार आहेत. आजचा किस्सा आहे पद्मिनी कोल्हापूरे यांच्याबद्दलचा, चिमणी पाखरं सिनेमा म्हणल्यावर पद्मिनी कोल्हापुरे चटकन डोळ्यासमोर उभ्या राहतात.

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी अगदी लहान वयातच फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले होते. आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकण्यात त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. अलीकडेच त्या त्यांच्या बेस्ट फ्रेंड आणि प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री पूनम ढिल्लनसोबत ‘सारे ग म पा’ च्या मंचावर दिसल्या, जिथे त्यांनी स्पर्धकांचा परफॉर्मन्स पाहण्यासोबतच स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले.

पद्मिनी कोल्हापूरे यांनी आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध पळून जाऊन लग्न कसे केले आणि अभिनेत्री पूनम ढिल्लननेही तिला या सगळ्यात मदत केली होती. पूनम ढिल्लनने पद्मिनी कोल्हापुरेशी संबंधित एक किस्सा शेअर करताना म्हटले की,

“सोप्या शब्दात सांगायचे तर पद्मिनीने पळून जाऊन लग्न केले होते आणि तिने घातलेले सर्व दागिने मी दिले होते. त्यावेळी आम्ही खूप लहान होतो आणि लग्नासाठी काय परिधान करावे याची कल्पना नव्हती. अशा परिस्थितीत आम्ही त्यांच्या कपड्यांचीही व्यवस्था केली.

तिची मैत्रिण पद्मिनी कोल्हापुरेबद्दल बोलताना पूनम धिल्लन पुढे म्हणाली, “आम्ही अनेक चढ-उतार एकत्र पाहिले आहेत आणि एकाच वेळी आनंदी आणि दुःखी झालो आहोत. माझा विश्वास आहे की कुटुंब देवाच्या इच्छेने येते, परंतु एक नाते आहे जे आपण मुक्तपणे निवडतो आणि ते म्हणजे मैत्री. या मैत्रीसाठी आम्ही काहीही करू शकतो.”

पूनम धिल्लनबद्दल बोलताना पद्मिनी कोल्हापुरे सांगतात “पूनमने या मैत्रीत खरोखर खूप काही केले आहे. साहजिकच माझ्या आई-वडिलांना हे लग्न अजिबात मान्य नव्हते, पण पूनमने मला या सगळ्यात मदत केली. पद्मिनी कोल्हापुरे यांचे आई-वडील खूप कडक होते. याबाबत पद्मिनी कोल्हापुरे म्हणाल्या, “आमचे पालक खूप कडक होते. माझे केस मोकळे असले तरी माझे वडील म्हणायचे, बांधा नाहीतर कापून टाकेन. अभिनय हा फक्त एक व्यवसाय होता आणि त्यानंतर मला थेट घरी यावे लागत असे. अशा परिस्थितीत प्रेमविवाहाचा प्रश्नच उद्भवत नाही. पण माझे पती टुटूला भेटल्यावर प्रेम झाले.”

पूनम धिल्लन होती म्हणून पद्मिनी कोल्हापूरे यांना पळून जाऊन लग्न करता आलं, नंतर सगळं निवळल्यावर सगळ्यांनी त्यांचं लग्न स्वीकारलं.

हे ही वाच भिडू :

Webtitle :poonam dhillo helped padmini kolhapure for her marriage

Leave A Reply

Your email address will not be published.