मध्यरात्री वानखेडे स्टेडियममध्ये जाऊन न्यूड व्हिडिओ शूट केला अन आपले शब्द खरे केले

सोशल मीडियावर न्यूड फोटोशूट करणाऱ्या मॉडेल आणि त्यांच्यावर होणाऱ्या टीका कायम चर्चेचा विषय असतो. एखाद्या बॉलिवूड सेलिब्रिटीने सोशल मीडियावर असे फोटो अपलोड केल्यावर तिथे कमेंट सेक्शनमध्ये याला कोणी आर्ट म्हणतं तर कोणी पैशासाठी केलेला स्टंट सुद्धा म्हणतं. असे कित्येक स्टंट सोशल मीडियावर आपण पाहत असतो. तर आजचा किस्सा आहे इरॉटिक मॉडेल म्हणून प्रसिद्ध असलेल्या पूनम पांडेचा.

पूनम पांडे कोण आहे हे तरुणाईला सांगायची गरज नाही, सोशल मीडियावर आपल्या फोटोने मार्केट हॅक करण्याचं टॅलेंट पूनम पांडेला माहिती आहे. ती एकमेव अशी सेलिब्रिटी आहे कि आपल्या न्यूड किंवा सेमी न्यूड फोटोने सगळ्यात जास्त फॅन फॉलोईंग कमावली आहे. बॉलिवूडमध्ये डाळ न शिजल्याने पूनम पांडेने इरॉटिक मॉडेलिंगचा पर्याय निवडला आणि यात ती हिट झाली.

मूळची दिल्लीची असलेली पूनम पांडे बॉलिवूडमध्ये नशीब अजमावायला मॉडेल म्हणून आली होती. मॉडेलिंगमध्ये ती प्रसिद्ध होण्याचं कारण म्हणजे ग्लॅडरस मॅनहंट अँड मेगामॉडेल कन्टेस्टच्या टॉप ९ मॉडेलपैकी पूनम पांडे एक होती.

पूर्ण भारतभर तरुणाईमध्ये ती लोकप्रिय झाली जेव्हा फॅशन या प्रचंड खपाच्या मॅग्झिनच्या कव्हर पेजवर तिचा फोटो झळकला होता.

२०११ क्रिकेट वर्ल्डकपच्या वेळी पूनम पांडेने सोशल मीडियावर जाहीर केलं होतं कि जर भारत वर्ल्डकप जिंकला तर ती वानखेडे स्टेडियमवरून तिचा न्यूड व्हिडिओ पोस्ट करेल. भारत वर्ल्डकप जिंकला पण ऐनवेळी लोकांची नाराजी भोवली म्हणण्याऐवजी बीसीसीआयने तिच्या या स्टंटला नकार दिला होता. पण फॅन्सच्या आग्रहाखातर पूनम पांडेने मध्यरात्री वानखेडे स्टेडियममध्ये जाऊन न्यूड व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर टाकला होता. जो पुढचे बरेच दिवस कॉंट्रोव्हर्सी बनून लोकांच्या चर्चेत राहिला.

सेम असाच प्रकार पूनम पांडेने २०१२ साली आयपीएलच्या सीजन ५ वेळी सुद्धा केला होता. तेव्हा कोलकाता नाईट रायडर्स संघ आयपीएल जिंकला होता. पूनम पांडे कायम कॉंट्रोव्हर्सीच्या जाळ्यात अडकलेली दिसते याच कारण म्हणजे एकदा तिने तिचं स्वतःच ऍप तयार केलं होतं पण पुढे गुगलने ते ऍप प्ले स्टोर वरून हटवलं होतं. पण यालाही न जुमानता तिने तिची स्वतःची वेबसाईट तयार केली आणि तिथे तिने तिचे फोटो व्हिडिओ टाकायला सुरवात केली.

२०१३ मध्ये नशा या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. या सिनेमात तिने केलेला टिचरचा रोल गाजला पण सिनेमा पडला होता.  तिच्या एका पोस्टरमुळे लोकं नाराज झाले होते. दिल्लीत तिचे पोस्टर्स लोकांनी फाडले होते. मुंबईमध्ये तिचे एका पोस्टरवर अंगप्रदर्शनाचे फोटो झळकले होते तेव्हा शिवसेनेच्या नेत्यांनी ते होर्डिंग काढून टाकले होते. 

द अनकॅनी, लव्ह इज पॉइझन, अदालत, मालिनी, टोटल नादानीया, प्यार मोहब्बत श्श्श, लव्ह इन अ टॅक्सी अशा अनेक टीव्ही शो मधून ती झळकत राहिली. मॉडेल म्हणून तिने सोशल मीडियावर एकेकाळी राज्य केलं होतं. आज जसं उठसूट कुणीही व्हायरल होतं तेव्हा मात्र पूनम पांडेने सगळं मार्केट जाम केलं होतं.

कायम कॉंट्रोव्हर्सीमुळे चर्चेत असणारी पूनम पांडे सिनेमात मात्र विशेष चमक दाखवू शकली नाही. फक्त सोशल मीडियावरच्या चाहत्यांच्या बळावर ती भारतभर फेमस झाली. मॉडेलिंग हे पॅशन असल्याने आणि आवडीचं क्षेत्र असल्याने पूनम पांडे फक्त मॉडेलच बनु शकली. मॉडेलिंग क्षेत्रात ग्लॅमर आणणारी मॉडेल म्हणून पूनम पांडेला ओळखलं जातं. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.