लस बनवणाऱ्या पूनावाला फॅमिलीनं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला तब्बल ५०० कोटींचं गिफ्ट दिलंय

‘सिरम इन्स्टिटयूट’ आज जगातील सर्वात मोठे लस उत्पादक आहेत. कोरोना व्हायरस येणाच्या आधीच ते पोलिओ आणि डिप्थेरिया,  BCG, हिपॅटायटीस बी आणि MMR (गोवर, गलगुंड आणि रुबेला) यांचे वर्षाला 1.5 बिलियन डोस  बनवत असत. पण हे लसींचे उत्पादन करण्याची आयडिया आता ‘प्रिन्स ऑफ वॅक्सीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदर पूनावालांची नव्हती, तर ‘किंग ऑफ वॅक्सीन’ म्हणून ओळखले जाणारे त्यांचे वडील सायरस पूनावाला यांची होती. आता किंग आणि प्रिन्स ही नावं आम्ही  नाही तर तुमच्यापैकीच काही जणांनी दिलेली आहेत.

सायरस पूनावाला यांनी त्यांच्या घोड्यांच्या पागेच्या बाजूला, या घोड्यांच्या रक्तामधील सिरमचा उपयोग करून लसी बनवण्याचा उद्योग सुरु केला.

मात्र या लसींचा बिझनेस मोठा करण्याचं श्रेयं जातं ते आदर पुनावाला यांना.

बिल गेट्स यांनी आपले जग हे विषाणूच्या मोठ्या साथींसाठी तयार नाही असं म्हटलं होतं. याचा बरोबर अर्थ घेतला तो आदर पूनावाला यांनी. मग आदर पूनावाला यांनी वडिलांचा बिझनेस वाढवायचं ठरवलं.

 हा बिझनेस एवढा वाढला कि पूनावाला फॅमिली आज भारतातली सहावी सगळ्यात श्रीमंत फॅमिली आहे.

करोना काळात बाकीचे उद्योग ठप्प पडले असताना, घोड्यांमुळं चालू झालेल्या सिरम इन्स्टिट्यूटची घोडदौड जोरात चालू होती. त्यांना ऑक्सफोर्डच्या जेन्नर इन्स्टिट्यूट कडून एस्ट्राजेनका या लसीचं उत्पादन करण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. भारतात कोव्हिशिल्ड या नावाने ती लस उपलब्ध करण्यात आली. भारताला एवढ्या मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करण्यामागे सिरम इन्स्टिट्यूटचा सिंहाचा मोठा वाटा आहे.

जेन्नर इन्स्टिट्यूट जिने ही एस्ट्राजेनका लस बनवली होती त्यांना सिरम इन्स्टिट्यूटनं थँक्स म्हणायचं ठरवलंय. 

जेन्नर इन्स्टिट्यूटला त्यांचं नवीन ऑफिस आणि लॅबोरेटरीसाठी सिरम आपल्या लंडनमधील कंपनीमार्फत ५०० कोटी रुपये देणार आहे. शास्त्रज्ञ एडवर्ड जेन्नर ज्यांनी देवी रोगावर लस बनवली होती त्यांचं नाव या जेन्नर इन्स्टिटयूटला देण्यात आलं आहे. लसींवर संशोधन करणारी हि जगातील एक नामंकित संस्था आहे. सिरमनी दिलेल्या देणगीमुळं या संस्थेला विस्तार करता येणार आहे. त्याच बरोबर त्यांना जवळपास ३०० नवीन शास्त्रज्ञ घेता येणार आहेत असं ऑक्सफर्ड करून सांगण्यात आले आहे.

जेनर इन्स्टिट्यूटचे संचालक प्रोफेसर एड्रियन हिल म्हणाले, “भारताच्या सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी यांच्यातील मलेरिया आणि कोविड-19 या दोन्ही लसींवरील सहयोगी कार्यक्रमांच्या उल्लेखनीय यशामुळे आघाडीच्या विद्यापीठांमधील भागीदारीची मोठी क्षमता अधोरेखित झाली आहे. यामुळं मोठ्या प्रमाणात उत्पादन करून परवडेल अशा किमतीत विकसनशील देशांना लस पुरवठा करणे शक्य झाले आहे”.

आता हे नुसतं गिफ्ट नाहीये तर ‘It’s also about business’

होय, खरं आहे ! सिरमच्या देणगीमागे बिझनेस अँगल पण आहे. जेन्नर इन्स्टिट्यूटने आता मलेरियावर पण लस शोधली आहे. या लसीचं कॉन्ट्रॅक्ट हि आता सिरमला मिळण्याची शक्यता आहे. मलेरिया रुग्णाची जगभरातील संख्या पाहता सिरमसाठी ही खूप मोठी संधी ठरणार आहे. तर बिझनेसमन लोकं हे असलं वाढीव डोकं लावतात. 

बाकी भारतात हि अशाच युनिव्हर्सिटी आणि उद्योग यांच्या भागीदारी व्हायला हवी असं जाणकार सांगतात. बाकी सिरमनं बाहेरच का देणगी दिली? भारतात का दिली नाही? या फंद्यांत न पडता या भागीदारीमुळं अखंड मानवजातीचं कल्याण व्हावं अशीच सामान्य लोकांची इच्छा असेल.

हे ही वाच भिडू:

English Summary : The owners of the Serum Institute of India, the Poonawalla family, have announced a £50 million (Rs 500 crore) donation to Oxford University to build a new research Centre focused on vaccinology.


The donation from Serum Life Sciences, wholly owned by the Poonawalla family, is Oxford university’s largest ever gift for vaccines research. It will be used to create a new facility to house more than 300 research scientists in the Old Road Campus.

 

Web Title : Poonawalla family tp give a gift worth 500 crore to Oxford institute

Leave A Reply

Your email address will not be published.