एक बाई पुरुषीरूपात तब्बल दोन वर्षे पोप पदावर होती आणि कुणालाही ते कळलं नाही.

आजवरच्या इतिहासात चर्चचे पोप हे फक्त  पुरुष असतात असं दाखवण्यात आलं मात्र एका स्त्रीने हि पुरुषी परंपरा मोडत काढत पुढची तब्बल दोन वर्ष कुणालाही काहीच कळू न देता पुरुषी वेशात पोप बनून राहिली.

पुरुषी परंपरेला छेद देणारी हि स्त्री नक्की कोण होती ? तिने असं का केलं ? मग ती पकडली कशी गेली ? तिला काय शिक्षा देण्यात आली ? असे अनेक प्रश्न पडले असतील तर आजचा हा किस्सा या महत्वाकांक्षी स्त्रीचा जिने सगळीच यंत्रणा आणि इतिहास कामाला लावले होते.

युरोपातील व्हॅटिकनच्या अधिकृत नोंदणीनुसार आजवर २६० पेक्षा अधिक कॅथॉलिक पोप हे पुरुष होते. परंतु एका आख्यायिकेनुसार म्हणा किंवा इतिहासानुसार म्हणा या काळात पोप जोऍन  नावाची एक स्त्री पोप म्हणून कार्यभार सांभाळत होती.

गोष्ट आहे आठव्या शतकातील. जोऍन ही लहानपणापासून प्रचंड बुद्धिमान होती. तिला शिक्षणाची देखील भरपूर आवड होती. मात्र तत्कालीन समाजाचे नियम स्त्रियांच्या विरुद्ध असल्यामुळे जोऍनने आपलं स्त्रीत्व लपवलं

पुढे तर तिने  पुरुषी वेष धारण करून ख्रिश्चन धर्माचे सगळे बारीकसारीक शिक्षण घेतले. आजूबाजूच्या आणि इतर लोकांना ती पुरुष असल्याचं भासवत सगळी कामं करत होती. खाण्यापिण्याच्या सवयींपासून ते पार कपडे परिधान करण्यापर्यंत तिने सगळ्या अंशी स्वतःला पुरुष म्हणून अधोरेखित केलं. कुठलीही उणीव तिने तिच्या पुरुषीपणात ठेवली नाही.

ख्रिश्चन मिशनरीमधून पोप बनण्यापर्यंतचं सगळं शिक्षण तिने धाडसाने मिळवलं. एक विद्वान आणि पारंगत व्यक्ती म्हणून स्वतःची ओळख पटविल्यानंतर ती इसवी सन पूर्व ८५५ साली पोप जोऍन आठवी म्हणून निवडली गेली.

अगदी पोप बनल्यावर देखील सगळ्यांच्या नकळत तिने दोन वर्षे चर्चचा कारभार अत्यंत लीलया हाताळला.

परंतु तिचं हे कारस्थान अगदी दोनच वर्षात उघडकीस आलं आणि तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलं. इसवी सन ८५८ मध्ये पोप बनून चर्चचा कारभार सांभाळत असताना ती अनपेक्षितपणे गरोदर राहिली . ती गरोदर आहे हे सुद्धा तिने सगळ्यांपासून अत्यंत खुबीने लपवून ठेवले.

तिच्या पोप बनण्याचा प्रवास जितका रहस्यमय आहे तितकाच रहस्यमय तिचा मृत्यू देखील आहे. परंतु तिच्या मृत्यूविषयी काहीच ठोकताळे नाही. मात्र असंही म्हणतात कि,

तिचा मृत्यू हा प्रसववेदना सहन न झाल्यामूळे झाला असावा किंवा बाळाला जन्म देऊन झाल्यावर असावा. काहीजण म्हणतात कि तिचा मृत्यू हा तिचं खरं रूप निदर्शनास आल्यावर तिच्या संतप्त अनुयायांनी  तिला घोड्याच्या पायदळी देऊन दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली असावी. तिच्या मृत्यूचे अनेक कयास त्याकाळी लावण्यात आले.

हि हळूहळू दंतकथा बनू लागली होती पण १३व्या शतकात तिची हि कहाणी जीन डी मेलली आणि बोरबन स्टीफन यांनी इतिहासात प्रकट केली. त्या स्त्री पात्राला त्यांनी जोऍन हे नाव देऊन तिचा इतिहास कॅथॉलिक पंथात अधिक प्रखरतेने मांडला आणि व्यापक प्रमाणात त्याची माहिती गोळा करून लोकांसमोर मांडली. यामुळे जोऍन हि लोकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिली.

१४व्या शतकाच्या लेखिका जिओव्हानी बोकॅसीओ यांनी जगभरातल्या प्रसिद्ध स्त्रिया या पुस्तकात तिची माहिती लिहिली आणि ती खरोखर अस्तित्वात होती असा ठाम दावा केला. पुढे पोप जोऍनच्या कल्पनेला अनुसरून चित्रे , शिल्प रेखाटली जाऊ लागली आणि इतिहासात तिला जीवंत ठेवली.

ख्रिश्चन धर्माला हि स्त्री मारक आहे असं काही कडवट लोकांना वाटून त्यांनी अशी कोणती स्त्री अस्तित्वात नसल्याचंही दावा केला. दंतकथा म्हणनूच तिला ऐका , तिचे काही ऐतिहासिक संदर्भ नाहीत त्यावरून लोकांनी बाष्कळ बडबडी करून धार्मिक वातावरण दूषित केल्याचंही युरोपात बोललं जाऊ लागलं.

मात्र पोप जोऍन या स्त्रीची थेट पोप बनण्यापर्यंतची मजल सगळ्या जगाला आश्चर्यचकित करून सोडणारी होती. पोप बनवताना निवड करणार्यांना इतकंही कळू नये कि ती स्त्री आहे यावरून त्याकाळच्या पोप लोकांची खिल्लीही उडवण्यात आली आणि तिच्या बहादूरपणाची तारीफही केली गेली.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.