पॉर्नला सार्वजनिक आरोग्यावर आलेलं संकट म्हणून घोषित करावं का?

पॉर्न भारताची उपरोधिक बाजू समोर आणतो, एकीकडे संस्कृतीची महिमा सांगत पुराणमतवादी भारताला सेक्सबद्दल बोलायला आवडत नाही, सामाजिकदृष्ट्या सेक्स वर बोलायला टाळत असलेला भारत दुसरीकडे, भारत पॉर्न साइटचा जगातील तिसरा सर्वात मोठा ग्राहक आहे. म्हणजेच ‘मॉर्डन’ इंडिया अश्लील सामग्रीचा वापर हा सामान्य बाब करण्याचा प्रयत्न करतो.

परंतु अमेरिकेसारखे देश ‘मुक्त अभिव्यक्ती’ अंतर्गत पॉर्नला नॉर्मलाइज करू शकतात, परंतु काही लोकांना मात्र याच पोर्नला देशातील सार्वजनिक आरोग्यावरचे संकट म्हणून घोषित करायचे आहे. रिपब्लिकन प्रतिनिधीने या संदर्भात प्रस्ताव सादर केल्यानंतर एरिझोना राज्य त्यावर विचार करीत आहे. 

मात्र, असं काही होण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१६ मध्ये, पोर्नला सार्वजनिक आरोग्य संकट घोषित करणारे उटाह अमेरिकेतील पहिले राज्य होते. यानंतर इतर ११ राज्यांनीही त्याचे अनुकरण केले होते. 

तुम्हाला हि बाब अतिशयोक्तीपूर्ण वाटू शकते, परंतु त्याबद्दलचा एक वाद आहे ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

पॉर्न कसं काय हानिकारक असू शकतं?

पॉर्नच्या अतिरिक्त व्यसनाचा परिणाम थेट आपल्या मेंदूवर होतो. यामुळे स्त्रियांना वस्तू म्हणून पाहण्याची प्रवृत्ती देखील वाढत आहे. हिंसक वर्तनाचे चित्रण, अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण वाढते आहे कारण पॉर्न मध्ये दाखवल्याप्रमाणे कित्येक जवळचे व्यक्ती घरातील, शेजारील लहान मुलांसोबत तशी कृती करू पाहतो.

साहजिकच पॉर्न  लैंगिक हिंसा भडकवतो. लैंगिक संबंधाचे अवास्तव आणि अनैसर्गिक चित्रण वगळता, पॉर्नमुळे इतरही अनेक समस्या उद्भवत आहेत. पॉर्न कमजोर बुद्धी असणाऱ्यांना हा विचार करण्यास भाग पाडते की, यात दाखवल्या जाणाऱ्या सर्व सामान्य गोष्टी आहेत. 

एरिजोनाच्या पॉर्नच्या सबंधितला प्रस्तावात असं म्हंटलंय कि, पोर्नोग्राफी हि लैंगिकदृष्ट्या विषारी वातावरण तयार करत आहे जे आपल्या समाजाला प्रचंड हानी पोहोचवत आहे. असंही म्हणलं गेलं कि, हे संकट मोठ्या झपाट्याने पसरत आहे, ज्याचा परिणाम वैयक्तिक तसेच सार्वजनिक आरोग्यावर होतोय. 

अभ्यासामध्ये असे आढळून आले आहे की,

पोर्नोग्राफी मेंदूला ड्रग्सचे व्यसन असते तसेच सेक्सला देखील व्यसन बनवते. लैंगिक अत्याचार, बलात्काराच्या कित्येक प्रकरणांमध्ये बलात्कारी आणि मारेकऱ्यांच्या ताब्यातून हिंसक स्वरूपाचे अश्लील साहित्य जप्त करण्यात आले आहे. असेही आढळले आहे कि, अशा लोकांनी  हे भयानक गुन्हेगारी कृत्य करण्यापूर्वी असे साहित्य पाहिल्याचे किंवा वापरल्याचे कबूल केले आहे.

पॉर्न हे लैंगिक हिंसेशी जोडते तर काही लोकांसाठी पॉर्नमध्ये दाखवलेल्या गोष्टी फँटॅसी बनतात आणि याच फँटॅसीला लोकं सेक्श्युअल रिऍलिटी समजतात. 

या प्रस्तावाला विरोध करणाऱ्यांचा असा विश्वास आहे की पॉर्नमुळे सार्वजनिक आरोग्यावर परिणाम होतो हे असं म्हणणे जरा अतिशियोक्ती आहे.

क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉ. रजत मित्रा म्हणतात, “जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला जेंव्हा संकट असे नाव देता, तेव्हा ती गोष्ट दहशत निर्माण करते. कोणतेही संकट घोषित करण्यापूर्वी ते कोणत्या दिशेने चालले आहे ते पाहावे. त्यावर नियंत्रण किंवा प्रतिबंध करण्यासाठी यंत्रणा विकसित कराव्यात. बदल घडविण्यासाठी आपण या पायऱ्या वगळू शकत नाही. ही संज्ञा लोकांमध्ये चिंता निर्माण करते”.

पोर्नोग्राफीच्या परिणामांबद्दल बोलायचं झालं तर पॉर्न पाहणाऱ्यांचा असा विश्वास असतो की पोर्नोग्राफी  धोकादायक आहे की नाही हे कोण पाहतं, का पाहतं, त्यावर त्यांची प्रतिक्रिया काय असते यावर अवलंबून आहे.

पोर्नोग्राफीला तुम्ही काय नाव द्याल हे महत्त्वाचे नाही, पण तुम्ही त्याला सार्वजनिक आरोग्य संकट म्हणा किंवा नाही. एक प्रश्न जो विचारला गेला तो म्हणजे – पॉर्न काही चांगले काम करतेय का? पॉर्न किती  हानिकारक आहे की नाही ह्याचा देखील आपण विचार केला पाहिजे.

थोडक्यात , धुम्रपान,मद्यपान प्रत्येकावर परिणाम करत नाही, परंतु कंपनी प्रत्येक बाटलीवर नमूद करते की दारू पिणे आरोग्यास हानिकारक आहे. तुम्ही लोकांना शिक्षित करता आणि ते घेणारी लोकं त्याची निवड करतात. तसेच पॉर्न बद्दल आहे, पोर्नोग्राफीच्या तोट्यांविषयी जन-जागृती निर्माण करणे हे महत्वाचे असून जगाने विचारात घेतले पाहिजे.

सार्वजनिक आरोग्य संस्थांचे काय म्हणणे आहे?

रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनी सीएनएनला सांगितले, ‘सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा म्हणून अश्लीलतेवर प्रस्थापित असे कंट्रोल नाही. लैंगिक हिंसा आणि इतर सार्वजनिक आरोग्य समस्या जसे की एचआयव्ही संक्रमणाशी पोर्नोग्राफी जोडली जाऊ शकते.

‘पोर्न म्हणजे समाज आणि संस्कृतींमध्ये झालेल्या बदलांना संदर्भित करते, जिथे तुम्ही नैतिक आधार घेऊ शकत नाही आणि ते चुकीचे म्हणू शकत नाही कारण ते खूप सापेक्ष आहे.’

पोर्नोग्राफीच्या अश्लीलतेबद्दल लोकांचे मत खूप वेगवेगळी आहेत.

बरं सर्व समस्या अश्लील सामग्रीची नाही. पोर्नोग्राफी आणि व्यसनाचा गैरवापर करण्याव्यतिरिक्त, बरेच लोक याचा वापर निरोगी लैंगिक आउटलेट म्हणून करतात, ज्याचा आनंद पुरुष आणि स्त्रिया दोघेही घेतात याबद्दल कुणाचे दुमत नाही.

उदाहरणार्थ, अनेक जोडपी तसेच पुरुष आणि स्त्रिया, ज्यांना लैंगिक संबंधात समस्या आहेत, त्यांचे संबंध सुधारण्यासाठी पॉर्न पाहतात. डॉक्टरांच्या सांगण्यावरून थेरपीमध्ये जोडप्यांनी असे मान्य केले आहे कि, लैंगिक आयुष्य सुधारण्यासाठी जोडपे पॉर्न पाहतात.

दुसरीकडे, डॉक्टरांचा असा विश्वास आहे की हिंसक, अपमानास्पद किंवा बाल पोर्नोग्राफी पाहणारे लोकं म्हणजे एक मोठी चिंताजनक समस्या आहे  आहे. नक्कीच ते हि समस्या वाढू नये  नाही तर  समाज अडचणीत येईल. मात्र काही बलात्कारी किंवा मारेकऱ्यांकडून हिंसक स्वरूपाचे अश्लील साहित्य जे आढळले, अनेकदा असे म्हटले जाते की या लोकांनी पॉर्नमुळे ते गुन्हे केले आहेत.

अमेरिकेसारख्या देशात पोर्नोग्राफीमुळे समाज हिंसक समाजाकडे वाटचाल करत आहे. यामुळे ते यावर अंकुश लावण्याचे मार्ग शोधात आहेत. भारतामध्ये पॉर्नवर बंदी आहे तरी देखील पॉर्न कसेबसे उपलब्ध केले जाते. यामुळे लोकसंख्येवर अश्लीलतेचे हानिकारक परिणाम थांबत नाहीत. दुसरीकडे, जागरूकता निर्माण करणे अत्यंत महत्वाचे आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.