डाकियाँ डाक लाया…टपाल तिकीट पत्रावर दिसायला लागलं यामागे देखील एक किस्सा आहे.

सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं गाणं आठवतं. डाकियाँ डाक लाया….खुशी का पयाम कही…. कही दर्दनाक लाया….. हे गाणं आजही प्रसिद्ध आहे. ह्या गाण्याच्या  शब्दांतून टपाल, पोस्टमन यांचं त्यावेळी लोक किती आतुरतेने वाट पाहत असतील याचा अंदाज येतो. आपल्या तरुण पिढीला आज कदाचित याचा अंदाज बांधता येणार नाही आपण तर  whatsaap ,फेसबुक, ई-मेल यावरून लगेच कोणाशी हि संपर्क करू शकतो .

या आधुनिक दळणवळणाच्या साधनांची सगळ्या वयोगटात वापर वाढत आहे. पण पत्राची वाट बघण्यात काय मजा असायची यावर आपले आई वडील तास-तास बोलू शकतात.

युद्धभूमीवर लढणाऱ्या जवानांना त्यांच्या घरच्यांनी पाठवलेली आणि त्यांच्या प्रत्युत्तरात जवानांनी पाठवलेली पत्रे वाचताना आजही डोळे पाणवतात. प्रियकराने आपल्या प्रियसीला पाठवलेली पत्रे वाचून प्रियसी च्या  विरहात आयुष्य काढणाऱ्या प्रियकराची प्रेमकथा वाचून अंगावर शहरा उभा रहातो.

एवढ्या अविस्मरणीय आठवणी देणारे टपाल आज काळाच्या पडद्याआड जाताना दिसत आहे.

आज ९ ऑक्टोबर, जागतिक टपाल दिन साजरा केला जातो. आजच बरं का साजरा केला जातोय हा टपाल दिन ? माहितीये का तुम्हाला

९ ऑक्टोबर १८७४ मध्ये स्वित्झर्लंडमधील बर्न येथे ‘युनिवर्सल पोस्टल युनियन’ची स्थापना झाली होती. म्हणून आजचा दिवस ‘विश्व टपाल दिन’ म्हणून साजरा होत आहे. हा निर्णय टोकियोत १९६९ साली भरलेल्या युनियनच्या परिषदेत घेण्यात आला होता. जगभराची टपाल व्यवस्था सुरळीत आणि  तत्परतेने चालू राहावी, हा या युनियनच्या स्थापनेमागचा हेतू होता.

जगभरातील देशात टपालाची मुक्त, मोकळी ये-जा व्हावी हे पोस्टल युनियनचे उद्दीष्ट आहे. पूर्वी च्या काळी  दूरदूरचा प्रवास करून टपाल वितरण केल्या जात असे . १६०० ते १७०० च्या काळात अनेक देशांनी एत्रित होऊन आपआपासात करार केले व टपाल वाटपाची योजना आखली. यामुळे  बऱ्यापैकी जाळे निर्माण झाले होते. अर्थात, त्यात त्रुटी होत्या, क्लिष्टता होती व भरवसा  नव्हता. ‘युनिवर्सल पोस्टल युनियन’ची स्थापना झाल्यावर टपाल व्यवस्थेत लक्षणीय फरक पडला.

आता हा झाला टपाल दिनाचा इतिहास , पण आजकाल अनेकदा बातम्यांमध्ये पंतप्रधान, मंत्री, आदी एखाद्या थोर व्यक्तींच्या नावाने  नवीन टपाल तिकीटाचे अनावरण करताना आपण बघतो, पण या तिकिटांचा नक्की काय विषय असतो हे तुम्हाला माहिती आहे का ?

पत्र पाठवताना का तिकीट चिकटवावं लागतो ? आता जाणून घेऊया याच टपाल तिकिटाबद्दल काही माहिती

टपालाच्या ने-आन करण्यासाठी आधी पोस्टात रक्कम भरावी लागायची किंवा ज्याला टपाल पोहचवायचं आहे त्याच्याकडून ते वसूल  करण्यात येत असे. परंतु त्यावेळी बरीचशी पत्रे हि फुकट पाठवली जात. ज्याला पत्र पाठवायचे आहेत तो पात्र स्वीकारत नसे यामुळे टपाल खाते नुकसान सहन करत होते याचा विचार करून १९३५ मध्ये इंग्लंडमधील रोलँड हिल यांनी टपाल ने-आन करण्याचा खर्च हा आधीच वसूल करून त्या रकमेचे टपाल तिकीट पत्रावर चिकटवण्याचे त्यांनी सुचवले व तेव्हा पासूनच आपल्याला टपाल तिकीट पत्रावर दिसायला लागलं.

जागतिक पातळीवर टपाल तिकिटाचा उगम वर सांगितल्या प्रमाणे झाला पण मग भारतामध्ये याची कधी सुरुवात झाली असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच तर थांबा.. याबद्दल पण काही मजेशीर गोष्टी आहेत त्या पण  सांगतो…

स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी भारतामध्ये इ. स. १८५४मध्ये पोस्ट ऑफिसची स्थापना इस्ट इंडिया कंपनीने केली. इ. स. १८५४ ते १९४७ या काळात राणी व्हिक्टोरिया, सातवा एडवर्ड, पांचवा जॉर्ज व सहावा जॉर्ज या तत्कालीन सत्ताधीशांची तिकिटे प्रसिद्ध करण्यात आली. त्याचबरोबर भारतातील काही वारसास्थळे, प्रेक्षणीय स्थळे यांचीही तिकिटे एकरंगी व बहुरंगी प्रसिद्ध करण्यात आली.

स्वातंत्र्यानंतरचे पहिले तिकीट २१ नोव्हेंबर १९४७ रोजी प्रसिद्ध झाले व तिकिटांचा प्रारंभ झाला.

शोध पहिल्या टपाल तिकिटाचा.

देशात टपाल सेवा सुरू केल्यानंतर इंग्रजांनी १८५४ मध्ये राणी एलिझाबेथचे चित्र असणारे पहिले टपाल तिकीट प्रकाशित केले. पहिल्या टपाल तिकिटामधील एक तिकीट इंग्लंडच्या संग्रहालयामध्ये आहे. एक मुंबईतील व्यक्तीकडे व दुसरे नवी मुंबईमधील एका नागरिकाकडे आहे. नवी मुंबईतील व्यक्तीचा पत्ता टपाल कर्मचाऱ्यांकडेही नाही.

या दुर्मीळ तिकिटाची किंमत आता एक कोटी रूपये आहे. हा ऐतिहासिक दस्तावेज काही प्रदर्शनामध्ये संबंधित नागरिकांनी पाहण्यासाठी उपलब्ध केला होता.

पात्राच्या सुरुवातीला ‘नमस्कार , विनंती विशेष’ आणि पत्राच्या शेवटी असलेले ‘तब्बेत सांभाळावी,खुशाली कळवावी’ या शब्दांची जागा जरी ईमोजी ने घेतली असली तरी पत्रव्यवहार करून  पत्रांच्या स्वरूपात अनेक आठवणी जपणाऱ्या लोकांच्या मनातुन टपालाच्या आठवणी कधीही विस्मरणात जाणार नाहीत एवढं मात्र नक्की.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.