प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, श्रीमंती पैशात नाही तर घराबाहेर चपला किती आहेत यावरून मोजायची!

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे म्हणजे बंडखोर व्यक्तिमत्व. हिंदू धर्माचा त्यांना जाज्वल्य अभिमान तर होताच मात्र त्यात असलेले जातीभेद, अनिष्ठ रूढी परंपरा याबद्दल राग होता. हिंदू धर्माची सर्वसमावेशकता उच्चवर्णियांच्यामुळे नष्ट होत आहे यावरून त्यांनी जोरदार टीकाटिप्पणी केली नव्या सुधारणा घडवून आणल्या.

आज कोणी त्यांना फक्त बाळासाहेब ठाकरेंचे वडील म्हणून ओळखत असेल तर तो त्यांच्यावर अन्यायच ठरेल. महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या नावाची जेव्हा कधी चर्चा होते, त्यावेळी प्रबोधनकारांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागतं. लेखक पत्रकार, इतिहासकार म्हणून ते स्वयंभू होते.

प्रबोधनकारांचे व्यक्तिमत्व अगदी सुरवातीपासून झंझावती होते. भाषणातील ‘ठाकरी शैली’चा उगम त्यांच्यापासूनच झाला. बाळासाहेब आणि पुढच्या पिढीला त्यांनी ‘मराठी बाणा’ आणि ‘हिंदुत्व’ यांचा वारसा दिला. प्रबोधनकारांचा हिंदुत्ववाद हा आजही अनेकांना पचनी पडणारा नाही. 

संयुक्त महाराष्ट्र चळवळ प्रबोधनकारांच्या जीवनातील महत्त्वाचा लढा होता. 

या चळवळीत त्यांनी कुशल संघटकाची भूमिका बजावली. चळवळीत सामील वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्ती आणि पक्ष यांना एकत्रित बांधून ठेवण्याचे कार्य त्यांनी केले. चळवळी, प्रचारासाठी हाती वृत्तपत्रासारखे साधन हवे याची जाणीव प्रबोधनकारांना झाली. या जाणिवेतून त्यांनी वृत्तपत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी सुरु केलेल्या ‘प्रबोधन’ या नियतकालिकावरून त्यांना प्रबोधनकार ही उपाधी मिळाली.

भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ठिकठिकाणी भाषिक राज्यांची मागणी होऊ लागली. त्यासाठी आंदोलने होऊ लागली. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू व उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल या दोघांचा मात्र याला विरोध होता. भाषेनुसार राज्ये निर्माण केली तर देशाचे तुकडे होण्याची भीती या दोघांना वाटत होती. पण देशाच्या स्वातंत्र्यासाठी एक होऊन लढा देणाऱ्या सर्व भाषिक राज्यांना आपल्या भाषकांचे राज्य असणे गरजेचे वाटत होते. म्हणून भाषावार प्रांतरचना व्हावी म्हणून आंदोलने सुरू झाली. प्रामुख्याने ही आंदोलने दक्षिणेत होऊ लागली.

तेलगू राज्य व्हावे यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबून नंतर प्राणत्याग करणारे श्रीरामलू पोट्टी हे अखेरीस राज्य पुनर्रचना आयोग नेमण्यास कारणीभूत ठरले. त्यानंतर स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना समितीने आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडू अशी राज्ये स्थापन करण्याची शिफारस केंद्राला केली. त्यावेळी या समितीने मराठी व गुजराती भाषिकांचे स्वतंत्र राज्य न करता या दोहोंचे मिळून एक राज्य करावे व त्याची राजधानी मुंबई असावी अशी शिफारस केली. या शिफारशीवरच ही समिती थांबली नाही, तर निजामाच्या ताब्यात असलेला मराठी भाषिकांचा मराठवाडावा व तत्कालीन मध्य भारतात असलेला विदर्भ यांचे मिळून मराठी भाषकांचे विदर्भ राज्य करण्याची शिफारस करून तमाम मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळले.

याला विरोध करण्यसाठी सर्व पक्षीय मराठी नेते एकत्र आले. 

त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी समितीची स्थापन सहा फेब्रुवारी १९५६ रोजी केली. या समितीचे अध्यक्ष म्हणून एकेकाळचे ब्राह्मणेतरांचे नेते केशवराव जेधे यांची निवड करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्र समितीत त्यावेळी सर्व पक्षांचे नेते होते. आचार्य अत्रे यांची मुलखमैदान तोफ तर होतीच, पण सुधारकाग्रणी प्रबोधनकार ठाकरे, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, कॉम्रेड डांगे हे नेतेही त्यात होते.

संयुक्त महाराष्ट्र समितीच्या काही बैठका या प्रबोधनकारांच्या घरी सुद्धा होत असतं. अशाच एका बैठकीचा किस्सा बाळासाहेब ठाकरेंनी सांगितला होता. 

त्यावेळी बाळासाहेबांचं वय नाही म्हंटल तरी एक १२ ते १३ वर्ष असेल. त्यांच्या घरी संयुक्त महाराष्ट्र समितीची बैठक भरली होती. बैठकीला बरेच नेते मंडळी आले होते. त्यामुळे दारात चपलांचा खच पडला होता. बाळासाहेब आलेल्या पाहुण्यांना चहा पाणी देत होते. त्यांच्या हातात असलेला ट्रे बाजूला ठेऊन प्रबोधनकार बाळासाहेबांना दारात घेऊन गेले आणि म्हंटले, 

तुला हे काय दिसतंय ? यावर बाळासाहेब म्हंटले, कि या चपला बूट आहेत. त्यावर प्रबोधनकार म्हंटले, 

नाही हे फक्त चपला बूट नाहीत तर हि आपली संपत्ती आहे. आपण कमावलेली लोक हि आपली संपत्ती असते आणि श्रीमंती पैशात नाही तर घराबाहेर चपला किती आहेत यावरून मोजायची असते !

या घटनेतून बाळासाहेबांना काय संदेश मिळायचा तो मिळाला आणि त्यांनी हि आपल्या आयुष्यात खूप माणसं कमावली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.