एन्काउंटरचं प्रकरण अंगलट आलं अन् प्रदीप शर्मा साडेतीन वर्ष जेलमध्ये राहून आले..

मनसुख हिरेन आणि अंबानींच्या घराजवळच्या गाडीतल्या स्फोटक प्रकरणी प्रदीप शर्माना एनआयएने ताब्यात घेण्यात आलं आहे. एप्रिल महिन्यात सुद्धा याच प्रकरणाच्या बाबतीत त्यांची ८ तास चौकशी करण्यात आली होती. अंबानी यांना धमकी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा यांचा हात असल्याचा संशय एनआयएला वाटत आहे. मात्र पोलीस चौकशी होण्याची हि प्रदीप शर्मांची हि काही पहिलीच वेळ नाही तर याआधीही त्यांना अटक करण्यात आली होती.

त्यावेळी लखन भैय्या चकमक हे प्रकरण भयंकर गाजलं होतं. त्यावेळी १११ चकमकी पार पाडलेले तज्ञ, शर्मा यांना रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैय्या याच्या नोव्हेम्बर २००६ मध्ये झालेल्या खोट्या चकमकीबद्दल ८ जानेवारी २०१० या दिवशी अटक करण्यात आली होती. डी.एन नगर पोलीस स्टेशनमध्ये काम करत असताना त्यांना या घटनेबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. शर्मांव्यतिरिक्त १३ पोलिसांसह आणखी २१ जणांना अटक करण्यात आली होती.

पोलिसांना त्यांचंच  प्रकरण भोवलं होतं. ११ नोव्हेम्बर २००६  संध्याकाळी पोलिसांनी दावा केला कि नाना नानी पार्कच्या जवळ खुंखार गुंड लखन भैय्या याला चकमकीत ठार करण्यात आलं. पण या चकमकीच्या दुसऱ्याच दिवशी लेखन भैय्या याच्या भावाने प्रेस समोर सांगितलं कि त्याच्या भावाची हत्या हि काही चकमकीतून झालेली नसून त्याला मुंबई पोलिसांनी  अपहरण करून नेलं आणि तिथे त्याची हत्या केली आणि सांगितलं कि लखन भैय्याने गोळीबार केला म्हणून पोलिसांनी त्याला ठार केलं.

त्यावेळी लखन भैय्याच्या भावाने पुरावे म्हणून फॅक्स दाखवले ते ज्याने लखन गायब झाला होता त्या दिवशी पोलीस आयुक्तांना पाठवले होते. त्यात त्यांनी एन्काऊंटरची भीतीही वर्तवली होती. लखन भैय्याचा हा भाऊ रामप्रसाद गुप्ता वकील होता त्यामुळे त्याने हि केस शेवट्पर्यंत लढवली. 

पोलीस तपासात पोलिसांनी सांगितलेली घटना खोटी ठरली. हायकोर्टने त्यावेळच्या डिसिपीच्या नेतृत्वात एसआयटी बनवून चौकशीचे आदेश दिले. एसआयटीने पोलिसांविरोधात कारवाई सुरु केली. आणि या प्रकरणात एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा, सिनियर पोलीस इन्स्पेक्टर प्रदीप सूर्यवंशीसोबत आणखी पोलिसांना अटक करण्यात आली होती.

या प्रकरणात प्रदीप शर्मा यांना साडे तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली मात्र त्यातले अडीच वर्ष ते हॉस्पिटलमध्ये होते.

हॉस्पिटलमध्ये राहूनच त्यांनी आपली शिक्षा पूर्ण केली होती.

पोलीस तपासात  एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माना बडतर्फ करण्यात आलं होतं. याचं कारण होत कि प्रदीप शर्मा यांचे गुन्हेगारी जगताशी घनिष्ठ संबंध आहे. त्याकाळात छोटा राजन गँगचा कर्दनकाळ म्हणून प्रदीप शर्मानी राजनची निम्मी टोळी संपवली होती. छोटा राजनचा हस्तक असल्याच्या संशयावरून प्रदीप शर्मा यांनी आणि त्यांच्या टीमने लखन भैया याचा एन्काऊंटर केला. पोलिसांनी मात्र उलट गोळीबार केल्याने हे पाऊल उचलावं लागल्याचं सांगितलं होतं. 

पुढे शर्माना मॅटने दिलासा देत त्यांची बडतर्फी रद्द केली. तीन वर्षांच्या सुनावणीनंतर मुंबईतील सेशन कोर्टाने ५ जुलै २०१३ रोजी प्रदीप शर्मांची निर्दोष मुक्तता केली होती. पण या प्रकरणातील अन्य २१ जण दोषी ठरले. या दोषींमध्ये प्रदीप सूर्यवंशी यांच्यासह अन्य १३ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मात्र प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता झाल्याचं विशेष सरकारी वकिलांना रुचलं नव्हतं आणि त्यांनी त्याकाळी शर्मांविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा केला होता मात्र त्याचं पुढे काहीही झालं नाही.

अंडरवर्ल्डमध्ये गुन्हेगार लोकांशी मैत्री आणि पोलिसाना टीप देणारे गुन्हेगार हे प्रदीप शर्मांच्या कारकिर्दीत कायम लागत आलेले आरोप होते. प्रदीप शर्मा यांनी सुरवातीच्या काळात अमजद खान हा त्यांचा गुन्हेगारी जगतातला खबऱ्या होता, त्याची राजन टोळीने हत्या केली म्हणून प्रदीप शर्मानी राजन गॅंग कायमची बाद केली होती.   

या प्रकरणी प्रदीप शर्मा यांचं पोलीस करिअर धोक्यात आलं होतं. हे प्रकरण त्याकाळी शर्मांच्या चांगलंच अंगलट आलं होतं मात्र त्यांची यातून निर्दोष मुक्तता झाली होती. सुरवातीपासूनच प्रदीप शर्मा हे एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जायचे. माकडवाला गॅंग असो किंवा राजन गॅंग सगळ्यांना प्रदीप शर्मानी कायमचं गार केलं होतं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.