गुजरातच्या राजधानीचं डिजाईन सुद्धा एका मराठी भिडूच्या सुपीक डोक्यातून आलंय

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे मुंबईच्या दौऱ्यावर आलेत. पटेल यांच्या या दौऱ्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. ते म्हणतायत,

गांधीनगर ही देशाची आर्थिक राजधानी होण्याची कुणी कितीही स्वप्न पाहिली तरी देशाची राजधानी होऊ शकत नाही. मुंबई हीच देशाची आर्थिक राजधानी राहील.

आता ही राजकिय पार्श्वभूमी असलेली वक्तव्य… याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. चर्चेत आलेल्या गांधीनगर विषयी आपल्याला एक मस्त माहिती सापडलीय. ती माहिती म्हणजे, गांधीनगर पण एका मराठी भिडूच्या डोक्यातली कल्पना आहे हे लोकांना माहितीच नाहीये. आता तुम्ही विचाराल कोण हे मराठी भिडू ? 

तर हे भिडू म्हणजे प्रकाश मधुसूदन आपटे. M.Tech. D.B.M. FIIA. FITP अशा डिग्र्या असणारे आपले महाराष्ट्रीयन भिडू.

आपलं शिक्षण आणि आपल्या कष्टाच्या जोरावर ते उच्चपदस्थ झाले. आणि विशेष म्हणजे त्यांनी गांधीनगर वसवण्यात मोलाच योगदान दिलंय. त्यांचाच हा किस्सा.

१९३९ सालात अमरावती शहरात जन्मलेले आपटे वाढले मात्र गुजरातच्या बडोदा शहरात. शालेय शिक्षण संपल्यावर त्यांनी ठरवलंच होत आर्किटेक्चर बनायचं. त्याप्रमाणे त्यांनी महाराज सयाजीराव गायकवाड आर्किटेक्चर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. १९५४ पर्यंत डिग्री पूर्ण ही केली. पुढं मास्टर्स करण्यासाठी त्यांनी आयआयटी खरगपूरला ऍडमिशन घेतलं. त्यांनी त्यांचं मास्टर्स सिटी अँड रिजनल प्लॅनिंग या विषयात पूर्ण केलं. झालं आता मास्टर्स ही १९६१ मध्ये पूर्ण झालं.

त्यांनी १९७० ते ७६ सालात ऍज हेड म्हणून पहिला प्रोजेक्ट केला तो हौसिंग आणि अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा. थोडक्यात HUDCO चा. त्या प्रोजेक्टवर काम करताना आपटेंनी एक नवी कल्पना अंमलात आणली. त्याप्रमाणे गरीब आणि इकॉनॉमिकली विकर सेक्शन मध्ये असणाऱ्या लोकांसाठी अफॉरडेबल घरांची मागणी होती. त्याप्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) शाश्वत गृहनिर्माण प्रकल्पांची योजना, डिझाइन आणि वित्तपुरवठा करण्यासाठीची धोरणे, कार्यपद्धती, प्रकल्प मूल्यांकन आणि देखरेख प्रणाली मांडणाऱ्या नव्याने स्थापन झालेल्या HUDCO चे ते पहिले प्रोजेक्ट हेड होते.

HUDCO मध्ये काम करताना त्यांची भक्कम धोरण आणि कार्यपद्धती यांमुळे एक आदर्श ठेवला गेला. आज ही हा प्रकल्प पूर्ण झाल्याच्या ५० वर्षानंतर ही कार्यपद्धती HUDCO मध्ये पाळली जाते.

त्यानंतर आपटेंच्या पावलावर पाऊल टाकत ख्रिस्तोफर बेनिंजर यांनी भारतभर कमी किमतीच्या गृहनिर्माण प्रकल्पांचे मॉडेल विकसित केले.

आपटेंच्या या कामाची दखल घेत १९६५ मध्ये त्यांना गुजरातच्या नव्या राजधानीच्या निर्माण कार्यासाठी बोलावलं गेलं.

ही नवी राजधानी होती गांधीनगर….

गुजरातच्या स्थापनेच्या वेळी म्हणजेच १९६० पर्यंत या राज्याची राजधानी अहमदाबाद होती. परंतु गुजरात आणि महाराष्ट्राच्या विभाजनाच्या वेळी गांधीनगर ही गुजरातची राजधानी म्हणून घोषित करण्यात आली. गांधीनगर हे साबरमती नदीच्या उजव्या तीरावर अहमदाबादपासून ३५ किमी अंतरावर ईशान्येकडे आहे.

गांधीनगर हे भारतातल्या चंदीगड नंतर दुसर नियोजित असं शहर आहे.

आता तुम्ही इंटरनेटवर सर्च केलं तर तुम्हाला सापडेल की, ज्या व्यक्तीने चंदीगड डिजाईन केलं त्या फ्रेंच वास्तुशिल्पकार ली कोरबुसियन याने या शहराला डिजाईन केलं आहे. पण तो एकटाच नव्हता. यात आपले आपटे पण होते.

गांधीनगर हे सामाजिक एकात्मतेच्या गांधीवादी तत्त्वांवर आधारित असं शहर म्हणून अस्तित्वात येणार होत. मग तिथं राहायला येणाऱ्या संपन्न अशा बहुसांस्कृतिक आणि बहुवर्गीय लोकांसाठी त्याचप्रमाणे मध्यमवर्गीय लोकांना परवडणारी कमी किमतीची सार्वजनिक घरे निर्माण करण्याचं काम आपटेंकडे होतं. त्याचप्रमाणे ओपन स्पेसेसची डेव्हलपमेंट, सामुदायिक केंद्रे, सार्वजनिक वाहतूक आणि ग्रंथालये यांची पण निर्मिती करण्याचं काम त्यांच्या विभागाकडे होतं.

त्यांनी या शहराच्या निर्मितीची जबाबदारी इतक्या भारी निभावली की, या प्रोजेक्ट नंतर त्यांची गणना टॉप टेन सिटी प्लॅनर्स मध्ये व्हायला लागली.

अशाप्रकारे गांधीनगर वसलं, त्याच्या सिटी प्लॅनींगच नाव ही झालं, पण आपले भिडू आपटे मात्र प्रकाशझोतात आलेच नाहीत. त्यांच्या या कार्याची दखल घेत बोल भिडूने हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवायचं असं ठरवलं. म्हणूनच हा किस्सा.

हे ही वाच भिडू :

 

 

English Summary : Prakash Apte was the head of Gandhinagar town planning committee

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.