प्रणबदांमुळेच पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले होते.

राजकीय क्षेत्रात अनेक एव्हरग्रीन नेते होऊन गेलेत आणि आणखीही आहेत त्यातलेच एक म्हणजे, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण.अवघा महाराष्ट्रच त्यांना आपुलकीने  पृथ्वीराजबाबा म्हणतो. त्यांचं वय आज ७५ च्याही वर असेल. पण अजूनही त्यांची तीच राजकीय, वैचारिक क्षेत्रातील सक्रियता आहे. सद्या ते कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री बनले यात एका व्यक्तीचे श्रेय आहे ते म्हणजे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं…..असं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. 

 नोव्हेंबर २०१० ते २०१४ हि चार वर्षे ते मुख्यमंत्री पदावर कार्यरत होते.  माझ्या मुख्यमंत्री पदाच्या निवडीमध्ये प्रणबदांची महत्वाची भूमिका होती, असं ते नेहेमीच म्हणत असतात.

पण या आधीचा घटनाक्रम थोडक्यात पाहिलं तर लक्षात येईल कि, तेंव्हा एक घटना देखील तत्कालीन परिस्थितीला कारक ठरली ते म्हणजे आदर्श हौसिंग सोसायटी घोटाळा. या घोटाळ्यामुळे मुख्यमंत्री असलेले अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागली होती. आणि त्या जागी वर्णी लागली ती पृथ्वीराज चव्हाण यांची. भ्रष्टाचाराचे आरोप आणि निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे काँग्रेसला मुख्यमंत्री पदावर असा नेता हवा होता जो, स्वच्छ प्रतिमेचा असावा. 

आणि हा शोध पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर येऊन थांबला.

अर्थातच त्यांची निवड प्रणव मुखर्जी यांनी केली होती. झालं असं कि, जेंव्हा २०१० च्या  नोव्हेंबर महिन्यात  अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला तेंव्हा पक्ष नेत्या सोनिया गांधी यांनी प्रणव मुखर्जी आणि ए. के.  एंटनी यांच्यावर महाराष्ट्राच्या पुढच्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्याची जबाबदारी टाकली. प्रणव मुखर्जी आणि ए. के.  एंटनी यांना निरीक्षक म्हणून महाराष्ट्रात पाठविले. या दोघांनी पक्षातील सर्व आमदारांशी चर्चा करून आपला अहवाल सोनिया गांधी याना सादर केला. त्यांनी त्यावर विचार करून  रात्रीच्या ३ वाजता पृथ्वीराजबाबांना फोन करून कळवले कि, “इथून पुढे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी तुमची”, असं म्हणत त्यांनी पृथ्वीराजबाबांना राज्याची मुख्यमंत्री पदाची सुत्रे स्विकारण्यास सांगितले. 

जेंव्हा भारत – अमेरिका करार झालेला तेंव्हा  डॉ. मनमोहनसिंग यांचा अमेरिका दौरा होता तेंव्हा पृथ्वीराज चव्हाण देखील त्या दौऱ्यात सहभागी होते. भारत-अमेरिका नागरी अणु कराराला संसदेमध्ये मंजुरी मिळवण्यासाठी ज्यांनी सलग ३ वर्षे सतत प्रयत्न केले त्यात मुख्य भूमिका हि प्रणव मुखर्जी यांची होती. तेंव्हा युपीए -१ सरकारला डाव्या पक्षांचा पाठींबा होता. 

या कराराला डाव्या पक्षांचा पाठींबा मिळवून हा करार संसदेत पारित व्हावा यासाठी डाव्यांशी चर्चा करण्यासाठी प्रणब मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली एक समन्वय समिती गठीत करण्यात आली. याच समितीचा निमंत्रक म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांना नेमण्यात आले. आणि शेवटी या समितीच्या प्रयत्नांमुळे डाव्या पक्षांची संमती मिळाली. 

त्यानंतर २०१० मध्ये प्रणव मुखर्जी यांनी अणू उर्जा अपघात उत्तरदायित्व विधेयक पारित करून घेण्याची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टाकली होती.

पृथ्वीराज चव्हाण यांचे आणि प्रणव मुखर्जी यांचे बरेच जिव्हाळ्याचे संबंध होते. 

पृथ्वीराजबाबांनी बोल भिडू सोबत त्यांच्या आणि प्रणबदांच्या आठवणी व्यक्त केल्या…

पृथ्वीराज चव्हाण जेंव्हा पहिल्यांदा म्हणजेच १९९१ ला खासदार झाले, तेव्हापासून ते २०१० पर्यंतच्या त्यांच्या दिल्लीच्या कार्यकाळात त्यांना प्रणबदां सोबत काम करण्याची संधी मिळाली तसेच त्यांची कारकिर्द अगदी जवळून पाहता अली होती.

प्रणव मुखर्जींबद्दल ते सांगतात कि, “राजकीय आयुष्यात कितीही चढ-उतार आले तरीही प्रणबदा त्यातून तावून सुलाखून बाहेर पडलेत. प्रणबदांच्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासाचा आणि त्यांच्या संसदीय कार्यपद्धतीच्या अनुभवापासून मी खूप काही शिकलो असं पृथ्वीराजबाबा सांगतात. प्रुथ्वीराज चव्हाण हे जेंव्हा काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते तेव्हा प्रणबदा पक्षांच्या विषयावर, तसेच पक्षाच्या धोरणावर चर्चा करण्यासाठी  जेव्हा ते दिवसभराच्या कामकाजातून निवांत व्हायचे, रात्री आठच्या नंतर ते पृथ्वीराज बाबांना घरी बोलावून अनेकदा दोन दोन तास चर्चा करायचे.

 हे ही वाच भिडू:

English Summary: Former Chief Minister of Maharashtra Prithviraj Chavan has become the Chief Minister of the state. One person is credited to him, President Pranab Mukherjee.

 

Web title : Pranab Mukherjee 86th birth anniversary : Pranab Mukharjee helps Prithviraj Chavan to become CM Of Maharashtra

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.