भावी सचिन म्हणवल्या जाणाऱ्या प्रणव धनवडेचं काय झालं ?

जानेवारी २०१६, कल्याण जवळच्या वेलंगकर मैदानामध्ये भंडारी कप इंटरस्कुल स्पर्धा सुरु होती. के सी गांधी हायस्कुल विरुद्ध आर्य गुरुकुल सामना सुरु होता. के.सी.गांधी यांच्या कडून ओपनिंगला आकाश सिंग आणि प्रणव धनवडे उतरले. दोघांची पार्टनशीप जमली.

समोरची टीम नवखी होती, ग्राउंड देखील छोटं होतं. या दोघं ओपनरनी बघता बघता आर्य गुरुकुलच्या बॉलरना धुवायला सुरवात केली.

आकाश सिंग शतक मारल्यावर आउट झाला. पण प्रणव धनवडे खेळतच राहिला. त्याने शतक मारलं, द्विशतक मारलं, पाचशेचा आकडा पार केला. गडी थांबायचं नाव नाही. बघता बघता ३२३ बॉलमध्ये  १००९ धावा बनवल्या. आजवर जगात कोणीही एका मॅच मध्ये हजाराचा टप्पा पार केला नव्हता. 

धनवडेने १८९९ साला पासून कायम असलेला इंग्लंडच्या ए.ई.जे. कॉलीन्सचा साडे सहाशेचा रेकॉर्ड मोडला होता. 

धनवडेच्या या इनिंगमुळे संपुर्ण क्रिकेट जगतात धमाका झाला. काही वर्षांपूर्वी चौदा वर्षांच्या सचिन आणि विनोद कांबळीने मुंबईच्या शालेय क्रिकेटमध्ये अशीच इनिंग खेळली होती आणि त्यांची नावाची चर्चा जगभरात झाली होती. धनवडेच्या त्या इनिंगमुळे लोकांना सचिनची आठवण आली. याच खेळीमुळे सचिन गाजला आणि त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दार उघडले गेले.

प्रणव देखील पुढचा सचिन तेंडुलकर होणार अशी मीडियाने भविष्यवाणी केली.

खुद्द सचिनने देखील प्रणवचे ट्विटरवरून कौतुक केले.

 

 

प्रणव धनवडे याचं आयुष्यच बदलून गेलं. तो आपल्या मुलाखातीमध्ये म्हणाला,

“मैं एक रिकॉर्ड के बारे में नहीं सोच रहा था। यह मेरे दिमाग में नहीं था, लेकिन जैसे ही मैं करतब के करीब पहुंचा, मेरे लिए यह स्पष्ट था कि मैं इसे हासिल कर सकता था। ”

प्रणव एका गरीब कुटूंबातून आला होता. त्याचे वडील रिक्षा चालक होते. प्रणवला स्वतःला क्रिकेटमध्ये एवढा रस नव्हता पण त्याचे वडील क्रिकेटचे शौकीन होते. त्यांच्या इच्छेखातर प्रणवने खेळायला सुरवात केली. आपल्या यशाचं सगळं श्रेय तो आई वडिलांना देत होता.

जगभरातील मोठमोठ्या न्यूज संस्था या भावी सचिनचे इंटरव्ह्यू घेण्यासाठी येऊ लागल्या. तो सगळ्यांना सांगत होता की,

“एक दिन मुझे उम्मीद है कि मैं टेस्ट और वन-डे दोनों खेलों में भारत का प्रतिनिधित्व करूंगा। मेरा सपना भारत के लिए खेलना है। ”

त्याचे कोच मुबीन शेख देखील त्याच्या उज्वल भवितव्याबद्दल कॉन्फिडन्ट होते. त्यांनी या मॅचच्या आधीच प्रणवला सांगितलेलं की जर तू या टूर्नामेंटमध्ये  तीन शतक मारू शकलास तर तुला मुंबईच्या टीम मध्ये जाण्यास रोखण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. या सामन्यानंतर ते म्हणाले,

मैं उन्हें साढ़े पांच साल से प्रशिक्षित कर रहा हूं। शुरुआत में वह एक सामान्य खिलाड़ी की तरह थे लेकिन पिछले दो वर्षों में असाधारण प्रतिभा दिखाने लगे।

खुद्द मुंबई क्रिकेट असोशिएशनने प्रणवला पाच वर्षे दहा हजारांची स्कॉलरशिप जाहीर केली. 

पण प्रणवने जी स्वप्नं पाहिलेली ती खरी ठरू शकली नाहीत. त्या सामन्यात त्याने जो चमत्कार घडवून आणलेला तो त्याला पुन्हा करता आला नाही. सचिन होण्याचा दबाव, लोकांच्या अपेक्षा यामुळे त्याची कामगिरी खालावत गेली.

त्यात तो कल्याणला राहायचा. तिथे त्याच्या प्रॅक्टिससाठी चांगल्या सुविधा नव्हत्या. दादर आणि एआरआय ग्राउंडवर देखील त्याला खेळण्यास परवानगी दिली नाही. प्रणवचं करियर आणखी गाळात अडकत गेलं. त्याच्या कोचने ओळखलं की प्रणव त्याच्याबद्दलच्या अपेक्षांना सामोरे जाऊ शकत नाही आहे आणि याच मुळे तो डिप्रेशन मध्ये जात आहे. त्याच्या वरील मानसिक तणाव वाढत होता आणि याचा कामगिरीवर अधिक परिणाम होत होता. मुबीर शेख यांनी त्याच्या साठी एक महत्वाचा निर्णय घेतला.

प्रणवच्या वडिलांनी मुंबई क्रिकेट असोशिएशनला पत्र पाठवले,

“तुम्ही दिलेल्या स्कॉलरशिप बद्दल धन्यवाद मात्र आम्ही ती आता स्वीकारू शकत नाही.”

याबद्दल कोच म्हणाले,

लोग कहने लगे थे कि प्रणव को बांद्रा में घर मिलने वाला है. ये सब फर्जी बाते हैं. इसलिए हम पैसे लेकर बाद में ये नहीं सुनना चाहते कि पैसे भी लिया और कुछ किया नहीं.

त्यानंतर प्रणव धनवडे याच नाव परत कधी ऐकलं नाही. ना बातम्यांमध्ये ना क्रिकेटच्या ग्राउंडवर. त्याने अभ्यासावर आपले लक्ष केंद्रित केले असावे. प्रसिद्धीचा दबाव सहन न करू शकल्यामुळे आपल्या प्रतिभेला न्याय न देऊ शकणारा प्रणव धनवडेसारखा तारा आता लुप्त झाला.

हे ही वाच भिडू.

2 Comments
  1. Buddham Shakya says

    त्याला भाग पाडले लुप्त होण्यास, जो एका मॅच मध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करू शकतो तो असाच कसं माघे हटेल, त्याला सर्वच दरवाजे बंद करून टाकलं असेल म्हणून तर, सपोर्ट नाही, मदत नाही, प्रोत्साहन नाही छी आहे असल्या घनार्ड्या लोकांचा, कोण म्हणतं जातीवाद संपला म्हणून

  2. D sachin says

    प्रणव धनावडे चे नाव जर प्रणव धनावडेकर असते ना तर तो अंतर राष्ट्रीय संघात असता पण ते त्याचे दुर्दैव….

Leave A Reply

Your email address will not be published.