शरद पवारांनी जनसंघच्या मंत्र्यांचा केला होता #prank.
महाराष्ट्रात पुलोद आघाडीच सरकार होत. तरूण शरद पवार त्यांचे मुख्यमंत्री होते. वसंतदादा पाटलांच काँग्रेस सरकार पाडून पवार साहेबांनी स्वतःची वेगळी चूल मांडली होती. यात त्यांनी स्थापन केलेला समाजवादी काँग्रेस, शेकाप, जनता पार्टी,जनसंघ (भाजप चे त्याकाळातले नाव) अशी अनोखी आघाडी होती,
आणि नाव होत “पुरोगामी लोकशाही आघाडी“.
एकदा काय झालं की मुख्यमंत्री शरद पवार बंद गळ्याचा कोट अशा ऐटबाज पोशाखात मंत्रीमंडळाच्या बैठकीला आले. एवढच नव्हे तर राज्यशिष्टाचार मंत्री जावेद खान हे देखील सेम असाच बंद गळा कोट घालून आले होते.
दोघांचा एक सारखा पोशाख बघून कोणीतरी पवारांना छेडल. मुंबई विमानतळावर कोणीतरी परदेशी राष्ट्रप्रमुख आले होते म्हणून त्यांच्या स्वागताला आम्ही दोघे गेलो होतो आणि तिथूनच थेट मंत्रीमंडळ बैठकीला आलो, असं पवारांनी सांगितलं.
“मग तुमच्या दोघांचे कोट सारखे कसे?”
जनसंघाच्या दोन मंत्र्यांना विशेष उत्सुकता होती. पवार साहेबाना त्यांची फिरकी घेण्याची लहर आली.
ते म्हणाले,
“राजभवन कडून आम्हाला हा पोशाख मिळाला आहे.प्रत्येक मंत्र्याला तो दिला जातो. शपथविधी झाला की लगेच राजभवनचा अधिकृत शिंप्याला आपलं माप द्यायचं असतं. तुंम्हाला मिळाला नाही का कोट?”
बिचारे ते दोघे पहिल्यांदाच मंत्रिमंडळात आले होते. सरकारी खर्चात एवढा सुंदर कोट शिवून मिळतोय आणि तो आपल्याला मिळत नाही म्हणजे काय? दोघेही मंत्रीमहोदय तावातावात राजभवन कडे निघाले.
राज भवनात गेल्यावर त्यांनी राज्यपालाच्या सचिवांना गाठले आणि राजभवनच्या अधिकृत शिंप्याला भेटायचे असल्याचे सांगितले. सचिवानी त्यांची शिप्याशी भेट घालून दिली. मंत्रीसाहेबांनी शिप्याला कोटाचे माप घेण्याचा आदेश दिला. बिचाऱ्या शिंप्याने पडत्या फळाची आज्ञा मानून दोघांचेही माप घेतले.
तेव्हा महाराष्ट्राचे राज्यपाल सादिक अली हे होते. अचानक दोन मंत्री राजभवनवर आलेलं त्यांना कळाल. त्यांनी दोघांना चहापानाला बोलावून घेतलं. चहा घेता घेता त्यांनी मंत्र्यांना सवाल केला
“आज इकडे कुठे?”
मंत्री म्हणाले, “राजभवनाकडून मिळणाऱ्या बंद गळा कोटासाठी माप द्यायला आलो आहे.”
राज्यपालांना आश्चर्य वाटलं,”असे काही कोटबीट दिले जातात हे मला तर ठाऊक नाही.”
तेव्हा जनसंघाच्या त्या मंत्र्यांना लक्षात आलं की मिश्कील मुख्यमंत्र्यांनी आपलं माप काढलं आहे. आपल्याला एप्रिल फुल बनवलय हे जाणवू न देता दोघांनी हळूच राजभवनातून काढता पाय घेतला.
हे ही वाच भिडू.
- १९६८ साली सांगलीचा माणूस बनवलां ठाण्याचा नगराध्यक्ष शरद पवारांची अशीही करामत.
- पवारांचा अर्थसंकल्प चुकला होता
- विलासराव म्हणाले, आमदारांच्या डोक्यावर प्रचंड जागा आहे, वृक्षारोपणाची सुरवात तिथूनच करा.
- शरद पवारांपासून ते सुशिलकुमार, भाई वैद्य, राम नाईक…. सर्वांनी मिळून कस फसवलं ?