गौतम अदानींच्या या एका अफवेमुळे, NDTV चे शेअर्सचे भाव अचानक १० टक्क्यांनी वाढले.

NDTV ची कामगिरी गेल्या वर्षभरात उत्कृष्ट राहिली आहे हे सर्वच माध्यमे जाणून आहेत.  त्याचा शेअर आज दुपारपर्यंत प्रति शेअर वरून दुप्पट झाला होता. एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये आजच्या दिवसभरात जोरदार तेजी दिसून आली आहे. पण ते शेअर्स वधारण्यासाठी एक अफवा मात्र कारणीभूत ठरली आहे. मीडिया क्षेत्रात अदानी समूह उतरणार असल्याच्या बऱ्याच अफवा चालू होत्या त्यात NDTV विकत घेऊ शकतं असा कयास लावला जात होता.

अदानी ग्रुपने NDTV विकत घेतल्याच्या अफवांमुळे कंपनीच्या शेअर्स वर गेले.  

टेलिव्हिजन लिमिटेडचे शेअर्स आज १०% ने उंचावले आहेत. कारण अदानी समूहाने मीडिया व्यवसायात प्रवेश करण्याची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे विकत घेतले अशी अफवा मार्केट पसरली आणि कंपनीच्या शेअर्सने एकच उच्चांक गाठला.

त्यात योगायोग ठरला तो म्हणजे, अदानी समूहाने अलीकडेच संजय पुगलिया यांना मुख्य संपादक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली गेली.

पुगलिया यापूर्वी क्विंट डिजिटल मीडियाचे अध्यक्ष आणि संपादकीय संचालक होते. यापूर्वी त्यांनी सीएनबीसी-आवाजचे नेतृत्व केले आहे. त्यांनी स्टार न्यूजची हिंदी चॅनल देखील आणले आहे. तसेच ते  झी न्यूजचे प्रमुख होते आणि आज तकच्या संस्थापक टीमचे सदस्य होते.

संजय पुगलिया यांनी बिझनेस स्टँडर्ड आणि नवभारत टाइम्समध्ये प्रिंट पत्रकार म्हणून काम केले आहे. त्यांनी बीबीसी हिंदी रेडिओमधील देखील काम केले आहे.

अदानी आता माध्यम क्षेत्रातही पाऊल ठेवत आहेत संजय पुगलिया यांची अदानी समूहाच्या या नव्या प्रोजेक्टसाठी नियुक्ती झाली आहे दिल्लीतलं एक जुनं चॅनेल ते टेकओव्हर करणार अशी चर्चा होती.  पण नेमकं कुठलं चॅनेल हे अजून स्पष्ट नाही त्यामुळे NDTV बद्दलचे तर्क -वितर्क लावले जात आहेत.

 ETMarkets मध्ये सुरू असलेल्या बातमीनुसार, अहवालात दावा करण्यात आला आहे की, अदानी ग्रुप दिल्ली स्थित मीडिया हाऊस घेणार आहे.

मग व्यापाऱ्यांमध्ये अशी चर्चा आहे की अदानी विकत घेत असलेली कंपनी हि,  एनडीटीव्ही असू शकते. सगळ्यांना खरं वाटलं कि, खरंच अदानी NDTV विकत घेतलं असेल. त्यामुळे एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. तथापि, ईटीने सांगितले की आम्ही अद्याप या बातमीची पडताळणी केलेली नाही. BSE वर कंपनी ९.९४% वाढून ७९.६५ रुपयांवर व्यवहार करत आहे.

 पण NDTV ने एक निवेदन जारी करून स्पष्ट केलं आहे हि अफवा आहे. 

राधिका आणि प्रनॉय रॉय या  NDTV च्या पत्रकार सदस्यांनी हे स्पष्ट केले आहे कि, आमच्या कंपनीचा आणि अदानी ग्रुपचा कोणताही व्यवहार झाला नाही. शिवाय कंपनीचे शेअर्स अचानक का वाढले याची कोणतीही कल्पना आम्हाला नाहीये.

ते चँनेल NDTV असेल अशी चर्चा चालू होती पण NDTV च्या एका निवेदनामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

ndtv

एनडीटीव्हीची आर्थिक कामगिरी फारशी चांगली नाहीये.

असंही म्हणलं जातंय कि, गेल्या काही काळापासून एनडीटीव्हीची आर्थिक कामगिरी खराब राहिली आहे. कंपनीचे प्रमोटर कर तपासणीच्या अधीन आहेत. मात्र, कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या एका वर्षात १३० टक्क्यांची वाढ झाली आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.