एकेकाळी प्रशांत किशोरांना काँग्रेसमध्ये आणा असं म्हणणाऱ्या नेत्यांनी आता पलटी मारलीये

निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर नेहमीच चर्चेचा विषय. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विजयाची रणनीती आखण्यात त्यांचच डोकं होत. त्यांनतर बहुतेक पक्ष त्यांना आपल्या बाजूने घेण्याच्या विचारात आहेत.

यात काँग्रेस टॉपला आहे

याच साखळीत आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या प्रमुख सल्लागार म्ह्णून नियुक्ती केली होती. मात्र काही दिवसांतच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 

यांनतर महिन्याभरापूर्वीच प्रशांत किशोर यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा होती. तसं पाहिलं तर, प्रशांत किशोर थेट राजकारणात नसले तरी या क्षेत्रात त्यांचा चांगलाच जम आहे. पण आपल्याला थेट प्रत्यक्ष राजकारणात जायचं नाही, असं प्रशांत किशोरांनी स्पष्टपणे सांगितलं होत.

मात्र, आता पुन्हा एकदा प्रशांत किशोरांच्या राजकीय एन्ट्रीची चर्चा होतेय. काँग्रेसमध्ये त्यांना पक्षाच्या महासचिवपदी नियुक्त करणार असल्याचं बोललं जातंय. पण, किशोरांच्या पक्ष प्रवेशाच्या मार्गात खूप मोठा अडथळा असल्याचं समोर आलंय.  

काँग्रेसचा वरिष्ठ नेत्यांच्या जी- २३ गटानं प्रशांत किशोरांच्या एन्ट्रीवर सक्त मनाई केलीये. या नेत्यांच्या म्हणण्यानुसार जर पिके पक्षात आले तर निवडणुकी संदर्भातील महत्वाचे निर्णय हे आऊटसोर्सिंग होतील. त्यामुळे ते पक्षापासून लांब राहिलेलेचं बरे.

आता ही सगळी चर्चा झालीये ती कपिल सिब्बल यांच्या बंगल्यावर. ३० ऑगस्टला काँग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या घरी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली गेली. या निमित्तानं पक्षाचे जी- २३ गटाचे नेतेसुद्धा तिथं उपस्थित होते.  ज्यात कपिल सिब्बल व्यतिरिक्त गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, शशी थरूर, मनीष तिवारी, भूपिंदर सिंह हुडा यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

या बैठकीत आगामी राज्यांच्या निवडणुकी विषयी चर्चा तर झालीच, पण या बैठकीचा मुख्य हेतू होता तो म्हणजे निवडणूक रणनीतीकर प्रशांत किशोर यांच्या प्रवेशाबाबत आणि त्यांना पक्षाचा महासचिव कारण्याबाबत. 

या निर्णयावर बरेचसे नेते प्रशांत किशोरांच्या समर्थनात  होते, पण  यातली मोठी संख्या हि पिकेच्या  पक्ष प्रवेशाच्या विरुद्ध होती.

इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे प्रशांत किशोरांच्या पश्चिम बंगालच्या सक्सेसफुल प्लॅननंतर या जी-२३ गटातले नेते त्यांना पक्षात घेण्याचा फुलं सपोर्टमध्ये होते

या नेत्यांच्या म्हणण्यानुसार, कॉग्रेस पक्ष हा फार जुना पक्ष आहे. तो काय आता जन्माला आलेला पक्ष नाही, ज्यात कोणीही आपले फॅन्सी विचार घेऊन पक्षात सहभागी होईल. २०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस-सपा आघाडीसाठी काम केले, त्याचा रिझल्ट तर आपण पहिलाचं आहे. त्यामुळे प्रशांत किशोरांना पक्षात घेण्याच्या कोणत्याही प्रस्तावावर  काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत चर्चा झाली पाहिजे.

दरम्यान, प्रशांत किशोरानीं निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी  भारतात पहिल्यांदा राहुल गांधींसोबत काम केले होते. राहुल यांचा माजी संसदीय मतदारसंघ अमेठीमध्ये सामाजिक आणि आर्थिक विकास कार्यक्रमांचे निरीक्षण आणि संचालन करण्याची जबाबदारी प्रशांत किशोरांना देण्यात आली होती.

मात्र, यांनतर किशोर यांची काम करण्याची पद्धत पक्षातील काही नेत्यांना पटली नाही. त्यामुळे पिके यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपसाठी काम केले होते. त्यावेळी त्यांनी  गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी निवडणूक अजेंडा सेट केला होता.  मात्र, नंतर चित्र पुन्हा पालटलं.

एवढं नाहीत तर प्रशांत किशोरांनी बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्यासाठी इलेक्शन प्लॅन बनवला आणि त्यांना राज्याची सूत्र दिली होती. ज्यानंतर  पिके जनता दलात सामील झाले होते. नितीशकुमारांनी त्याना पक्षाचे उपाध्यक्ष देखील बनवलं होत.

लोकसभा निवडणुकीत एनडीएमध्ये भाजपसोबत जागावाटपात जनता दलाला (यू) मोठा वाटा मिळवून देण्यात प्रशांत किशोरांचाचं हात होता. सोबतच प्रशांत किशोरांनी आंध्र प्रदेशातील जगन मोहन रेड्डी यांचा निवडणूक प्रचार देखील सांभाळला होता आणि त्यांना जबरदस्त विजय मिळवून दिला होता. 

एवढचं नाही तर पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचं ताजं उदाहरण सगळ्यांसमोरच आहेचं.

दरम्यान सध्या तरी पक्षाने वेट अँड वॉचची भूमिका घेतलीये. काँग्रेसचे वरिष्ठ नेते एके अँटनी आणि अंबिका सोनी यांना प्रशांत किशोर यांच्याबाबत पक्ष नेत्यांच्या मत याबाबत अहवाल तयार करायला संगितलं गेलेय. जेणेकरून कार्यसमितीच्या बैठकीत प्रशांत किशोरांच्या प्रवेशाबाबत फायनल डिसिजन होईल.

हे ही वाचं भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.