प्रशांत किशोर यांनी काँग्रेसवर टीका करून पुन्हा कार्यकर्त्यांचं कन्फ्युजन वाढवलंय..

काही महिन्यांपूर्वी झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकांमुळे रणनितीकार प्रशांत किशोर चांगलेच चर्चेत राहीले. निवडणुकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यासारख्या बड्या नेत्यांनी अनेकदा  किशोर यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती.

प्रशांत किशोर आणि गांधी कुटुंबियांमध्ये झालेली बैठक आगामी पंजाब किंवा उत्तर प्रदेश विधानसभेच्या मुद्द्यावरुन नसून त्याहूनही मोठी चर्चा या बैठकीत झाल्याचं सांगण्यात येत होतं . २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांना काँग्रेसकडून मोठी भूमिका दिली जाण्याची शक्यता असल्याची चिन्हं होती  .

काही दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या एका बैठकीनंतर प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. २२ जुलै रोजी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. प्रशांत किशोर यांनी  पक्षात सामावून घेता येईल का यासंदर्भात त्या बैठकीत चर्चा झाली होती.

एवढी सगळी चर्चा सुरु असताना आज प्रशांत किशोर यांनी ट्विट करत काँग्रेस चा प्रत्यक्ष उल्लेख न करता काँग्रेस वर निशाणा साधला आहे.

ट्विट मध्ये त्यांनी काँग्रेस चा उल्लेख करण्यासाठी GOP  (ग्रँड ओल्ड पार्टी) अशा शब्दांचा वापर केला आहे. सर्वात जुना पक्ष असा त्यांनी काँग्रेस चा उल्लेख केला. ते ट्विट मध्ये म्हणाल कि,

“लखीमपूर खेरी घटनेनंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष सक्षम होऊन लवकर परतण्याची अपेक्षा जे लोक करत आहेत, ते मोठ्या गैरसमजात आहेत.देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या खोलवर रुजलेल्या समस्या आणि संरचनात्मक कमकुवतपणावर त्वरित उपाय नाही.”

या ट्विट नंतर प्रशांत किशोर हे काँग्रेस मध्ये जाणार आहेत कि नाही यावर पुन्हा चर्चा रंगू लागल्या आहेत.

प्रशांत किशोर यांची काही मोजक्या वर्षातील राजकीय हालचाली बघितल्या तर ते कायमच लोकांना , राजकीय पक्षांना दुविधा स्थितीत ठेवताना दिसतात. आतापर्यंत त्यांनी केलेले अनेक विधान हे त्यांनी केलेल्या कृतीतून खोटे ठरलेले आहेत. बोललेल्या गोष्टींवर प्रशांत किशोर  कायम न राहिल्याचं  अनेकदा बघितल्या गेलं

तर आपण बघूया कि अशा कोणत्या गोष्टी होत्या ज्यामध्ये प्रशांत किशोर यांनी पलटी मारलेली आहे.

२०१४ च्या निवडणुकीनंतर चर्चेत आल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्याला राष्ट्रीय राजकारणात अजिबात उत्सुकता नसून बिहार च्या राजकारणात काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. परंतु आतापर्यंत प्रशांत किशोर यांनी आपल्या कामाचा आणि राजकारणाचा केंद्र बिंदू हा राष्ट्रीय राजकारण असल्याचं दाखवून दिलंय. त्यांनी कायमच केंद्र सरकारवर आपल्या टीकेचा ओघ ठेवलेला आहे.

२०१८ मध्ये प्रशांत किशोर यांनी  अधिकृत जनता दल  युनाइटेड (JDU ) पक्षामध्ये प्रवेश केला. पक्षामध्ये त्यांच्यावर पक्षाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी नितीश कुमार यांनी दिली. २०२० मध्ये त्यांनी पक्षाचे अध्यक्ष आणि बिहार चे मुख्यमंत्री यांच्यावर नागरिकता संशोधन अधिनियमवरून टीका केली होती. पक्षाने त्याची गंभीर दाखल घेत त्यांना निलंबित केलं.

अनेक राजकीय विश्लेकांना अपेक्षित होतं कि प्रशांत किशोर बिहार मध्येच प्रादेशिक राजकीय आयुष्याला सुरवात करतील पण त्यांनी परत एकदा अनपेक्षित खेळी खेळत सगळ्यांना धक्का दिला.

प्रशांत किशोर एवढ्यावरच थांबले नाहीत तर जेडीयू मधून हकालपट्टी नंतर २०२० च्या बिहारच्या विधानसभा नजरेसमोर ठेऊन त्यांनी ‘बात बिहार कि’ हे पोलिटिकल कॅम्पेन सुरु केले होते. प्रशांत किशोर निवडणुकीत उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहेत असा अंदाज सर्व राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला होता.

परंतु त्यांनी एकही उमेदवाराला निवडणुकीच्या  रिंगणात न  उभं करता सर्व राजकीय पक्षांचे आराखडे फोल ठरवले.

आता ज्या पक्ष सोबत प्रशांत किशोर जायच्या चर्चा रंग होत्या त्याच पक्षावर टीका करणं हे त्यांची कारकीर्द बघता नवीन नाही, ज्यांच्यावर टीका केली त्यांच्या सोबत काम करताना प्रशासन किशोर दिसून आले आहेत. आजच्या ट्विट वरून येणाऱ्या  काळात काँग्रेस आणि प्रशांत किशोर यांचे संबंध कसे असतील  हे बघणं महत्वाचं असेल.

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.