किंगमेकर आत्ता स्वत: किंग व्हायचं म्हणतोय.

निवडणूक रणनीतीकर प्रशांत किशोर ज्यांनी 2014 च्या निवडणुकीत मोदीना विजयी करण्यात अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावली होती त्यांनी आता प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश केला आहे. नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड मध्ये त्यांनी अधिकृत प्रवेश केला आहे. जदयुच्या राज्य अधिवेशनात हा पक्ष प्रवेश झाला. प्रशांत किशोर यांनी ट्विट करून तशी माहिती दिली.

कोण आहेत प्रशांत किशोर?

प्रशांत किशोर यांचा जन्म 1977 साली बिहारच्या बक्सर जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील श्रीकांत पांडे पेशाने डॉक्टर होते. तर आई हाऊसवाईफ होती. प्रशांत किशोर यांचं सुरवातीचं शिक्षण बिहारमध्ये झालं. नंतर त्यांनी हैद्राबाद मध्ये इंजिनियरिंग केली.  पुढे त्यांना युनिसेफमध्ये ब्रँडिंग इंचार्जची नोकरी मिळाली. तेथे त्यांना मार्केटिंग तसेच मीडिया मॅनेजमेंट बद्दलचं प्रशिक्षण तर भेटलंच सोबतच ते त्यात पारंगत झाले.

हे ही वाच भिडू –  

भाजपासाठी निवडणूक रणनिती

2011 साली युनिसेफची नोकरी सोडून प्रशांत किशोर भारतात परतले. त्यांनी गुजरातमध्ये झालेल्या ‘व्हायब्रॅंट गुजरात’ या प्रसिद्ध बिझनेस फोरमला भेट दिली. तिथे त्यांची भेट नरेंद्र मोदींशी झाली. या भेटीनंतर त्यांनी मोदींसाठी काम करायला सुरुवात केली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या निवडणूक प्रचाराची धुरा प्रशांत किशोरांच्या खांद्यावर होती. त्यांनी मोदींच्या सभेपासून प्रत्येक इलेक्शन कॅम्पेनला सांभाळलं. इतकंच नाही तर त्यांनी ” चाय पे चर्चा” आणि “थ्रीडी सभा” ह्या युनिक योजना पण राबवल्या. त्यांचा यशस्वी प्लॅनिंगमुळे भाजपची विजय निश्चिती झालं असं म्हटलं जात होतं. “अबकी बार मोदी सरकार” ची घोषणा घरोघरी पोहचवण्याचे कार्य त्यानी यशस्वीरीत्या केलं होतं.

narendra b 260218
नरेंद्र मोदी यांच्या समवेत प्रशांत किशोर

भाजपाला सोडचिट्ठी

पुढे 2014 नंतर भाजपासोबत काही वाद झाल्याने त्यांनी भाजपाला सोडचिट्ठी दिली. त्यानंतर ते जदयु कडे वळले .त्यांनी नितीश कुमारांसाठी  प्रचार आरंभ केला . प्रशांत किशोर यांच्या विशिष्ट प्रचार तंत्रामुळे बिहारच्या निवडणुकीत जदयु – काँग्रेस- राजद युतीला विजयश्री प्राप्त झाली. भाजपाचा धोबी पछाड झाला. पुढे त्यांनी पंजाब इलेक्शनला काँग्रेसला विजयी करून किंगमेकर ही पदवी मिळवली होती.

प्रशांत किशोर २०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस च्या प्रचाराचे नियोजन करताना.

परंतु त्यानंतर झालेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीत मात्र प्रशांत किशोर यांची रणनीती सपशेल फेल गेली. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले. त्यामुळे प्रशांत किशोर यांची किंगमेकर ही प्रतिमा धुळीस मिळाली. काँग्रेसने त्यानंतर प्रशांत किशोर यांना डच्चू दिला. त्यानंतर मात्र प्रशांत किशोर यांनी नितीश कुमारांशी संबंध मजबूत केले. याच्यावर बऱ्याचदा भाजपा जो जदयुचा मित्र पक्ष होता त्याने आक्षेप घेतला होता. परंतु नितीश कुमार यांनी त्यांना जुमानल नाही.

जदयु प्रवेश.

आज जेव्हा प्रशांत किशोर यांनी जदयु मध्ये प्रवेश केला तेव्हा सर्वाना धक्का बसला. आता हे बघणं रंजक

ठरेल की नेहमी पडद्यामागून सूत्र चालवणारा कलाकार, आता प्रत्यक्ष पडद्यावर काय जादू करून दाखवतो ते!

हे ही वाच भिडू –  

Leave A Reply

Your email address will not be published.