ज्या बँकेत झाडू मारायचं काम करायच्या आज त्याच प्रतीक्षा टोंडवळकर बँकेच्या जनरल मॅनेजर बनल्या

कधी काळी प्रतीक्षा टोंडवालकर या एसबीआयच्या मध्ये झाडू मारणे, साफ सफाईचे काम करत होत्या. मात्र बँकेतील कर्मचारी, अधिकारी यांच्या प्रमाणे काम करण्याची इच्छा होती. प्रतीक्षा टोंडवालकर यांनी आपले राहिलेले शिक्षण पूर्ण केले आणि असिस्टेंट जनरल मॅनेजर पर्यंत मजल मारली. 

जिद्द असेल तर काय करता येत याच उदाहरण म्हणून प्रतीक्षा टोंडवळकर पाहता येईल

प्रतीक्षा टोंडवळकर

प्रतीक्षा टोंडवळकर यांचा जन्म १९६४ मध्ये पुण्यात झाला. वयाच्या अवघ्या १७ वर्षी सदाशिव कडू यांच्यासोबत लग्न झाले झाले. त्यामुळे प्रतीक्षा यांना आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण करता आले नाही. सदाशिव कडू हे मुंबईत राहत. ते मुंबईतील एसबीआय मध्ये पास बुक बनविण्याचे काम करायचे. 

लग्नानंतर पहिल्या वर्षातच त्यांना एक मुलगा झाला. पहिला मुलगा असल्याने कडू कुटुंबीय त्याला घेऊन आपल्या मूळ गावी गेले होते. मात्र, गावातील यात्रे दरम्यान सदाशिव कडू यांचा अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रतीक्षा या वयाच्या २० वर्षी विधवा झाल्या.

१ वर्षाचं बाळ आणि जगण्याचा कुठलंही साधन नसतांना प्रतीक्षा या परत मुंबईत आल्या. सदाशिव कडू यांचे बँक खात्यात काही रक्कम होती. ती काढण्यासाठी प्रतीक्षा बँकेत गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी बँक कर्मचाऱ्यांना आपल्याला काही काम मिळेल का अशी विचारणा केली. 

शिक्षण कमी असल्यामुळे त्यांना बँकेत कुठलेही काम देता येणार नाही असे सांगण्यात आले. मात्र प्रतीक्षा यांनी शेवटचा ऑप्शन म्हणून त्यांना बँक झाडण्याचे, साफसफाईचे काम दिले. त्यानंतर प्रतीक्षा या दिवसातील २ तास बँकेत झाडू मारण्याचे, वॉशरूमची सफाई करण्याचे काम करत होत्या. त्यासाठी प्रतीक्षा यांना महिन्याला फक्त ६० ते ६५ रुपये मिळायचे.

एवढं असलं तरीही प्रतीक्षा यांची शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा होती. त्यासाठी त्या बँकेत आल्यावर तेथील कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना काय करता येईल असा प्रश्न विचारायच्या.

तेव्हा बँकेतील कर्मचारी १० वी साठी परीक्षा फॉर्म भरण्यास मदत केली आणि त्यांना अभ्यास करण्यासाठी १ महिन्याची सुट्टी दिली. त्यांच्या कुटुंबियातील इतर सदस्यांनी त्यांना पुस्तके मिळवून देण्यास मदत केली. त्यांना मिळालेल्या १ महिन्याच्या त्यांनी  चांगला अभ्यास केला आणि त्यांना परीक्षेत ६० टक्के मार्क मिळाले. 

बँकेत साफ सफाईचे काम करत असल्याने त्यांना बँकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडे बघून आपण अधिकारी व्हावं अशी इच्छा त्यांना वाटू लागली होती. जर बँकेत क्लर्क सारखे काम मिळवायचे असेल तर अगोदर १२ वी झाली पाहिजे हे बँकेतील कर्मचाऱ्यांनी प्रतीक्षा यांना सांगितले. 

यासाठी प्रतीक्षा यांनी नाईट कॉलेज मध्ये मध्ये ऍडमिशन घेतले. दिवसभरातील काम संपवून प्रतीक्षा या विक्रोळी येथील नाईट कॉलेज मध्ये जाऊ लागल्या. इथंच त्यांनी सायकोलॉजी विषयात डिग्री पूर्ण केली. दरम्यान १९९३ मध्ये प्रतीक्षा यांचे प्रमोद टोंडवळकर यांच्याशी लग्न झाले. प्रमोद यांना प्रतीक्षा यांच्या बद्दल माहिती होती. त्यामुळे प्रमोद यांनी बँकेची परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांचा मुलगा विनायक हा सुद्धा त्यांना अभ्यासात मदत करू लागला.     

 यामुळे १९९५ मध्ये परीक्षा देऊन प्रतीक्षा एसबीआय मध्ये क्लर्क झाल्या   

एकीकडे प्रतीक्षा या आपले काम, शिक्षण पूर्ण करत असतांना आपल्या मुलाचे शिक्षण कसे पूर्ण होईल याकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. त्यांना नेहमी आपला मुलगा की शिक्षण असा प्रश्न पडत असे. मात्र त्या स्वतःला सांगायच्या की, मी हे जे काही करते ते आपल्या मुलासाठीच करत आहे. 

२००४ मध्ये प्रतीक्षा टोंडवळकर यांना पदोन्नती मिळाली   

प्रतीक्षा या क्लर्क असतांना बँकेतील अंतर्गत परीक्षा देत गेल्या. त्यानंतर ट्रेनी अधिकारी म्हणून त्यांना पोस्टिंग मिळालं. पुढे त्यांनी कधीच मागे पाहिलं नाही. एक एक करत त्या परीक्षा पास होत गेल्या. ज्यानंतर जून महिन्यात त्यांना असिस्टंट जनरल मॅनेजरची म्हणून निवड झाली. २०२४ मध्ये प्रतीक्षा टोंडवळकर निवृत्त होतील. 

एवढंच नाही तर प्रतीक्षा यांची कामाबाबद्दलची आस्था, चिकाटी बघून त्यांना स्टेट बँकेने सन्मानित केले आहे. प्रतीक्षा यांची एसबीआय मध्ये ३७ वर्ष पूर्ण झाले आहेत. २०२१ मध्ये प्रतीक्षा यांनी निसर्गोपचार विषयात पदवी पूर्ण केली असून निवृत्तीनंतर या लोकांना मदत करण्याचा त्यांचे ध्येय आहे. 

हे ही वाच भिडू     

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.