रस्ते अपघात आणि प्रसिद्धी माध्यमांची ‘भूतं’.

आमच्या किल्लेदारी समुहातला आमचा निकट सदस्य प्रविण याला ऐन तारुण्यात आपला जीव गमवावा लागला. रस्त्यावरून भरधाव ट्रकने रस्ता सोडून चौंघांना उडवले. चौघेही कश्मिर ते कोल्हापूर या सायकल सहलीदरम्यान आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आपले रात्रीचे जेवण आटपुन पायीच जात होते.
सामान्य माणुस म्हणून कौटुंबिक जबाबदाऱ्या तसेच स्वत:चे छंदही प्रविण जोपासात आपल्या आजुबाजुच्या निकटवर्तीयांनी तुम्हीही सायकलच चालवा असा सल्ला न चुकता तो द्यायचा.
आमच्या सायकलरिपब्लिकचं डिझाईन, ग्राफिक आर्ट्स अशा काही साध्या सुटसुटीत, वेधक कलाकृतीही त्याच्याच.
तो अचानक गेला. एका माध्यमात तो आर्टीस्ट म्हणून काम पाहत असताना तो रस्ता दुर्घटनेत मृत्यूमुखी पडला. याविषयीचं नेमकं वार्तांकन कस असावं किंवा कसे? यासाठी आता बलाढ्य दैनिकांना मार्गदर्शन कुणी, कसं? करावं याबद्दल मला प्रश्न पडू लागलेत.
एका दैनिकात बातमी होती सायकल मोहिमेदरम्यान दुर्घटना.
दुस-या एका दैनिकात सायकल मोहिमेदरम्यान अपघात. दोन सुखरूप बचावले वगैरे.
तिस-या एका ऑनलाईन पोलिसनाम्यात सायकल मोहिमे दरम्यान अपघात. माणसं ८ खरे नांव ९ त्यात मी २५ तारखेला सहभागी होवून कोल्हापूर गाठणार होतो तरीही फेसबुकवरची पोस्ट पूर्ण न वाचताच माझं नांव कॉपी पेस्ट वगैरे.
मिड डे नावाच्या इंग्रजी दैनिकात तर “कार मिसहैप, सायकल रैलीत असताना किल्ड” माणस ८ नांव ९.

अशा वेगवेगळ्या आशयाच्या बातम्या झळकत होत्या.

खरंतर, माध्यमांनी त्यांच्या बातम्यांत रस्ते सुरक्षा आणि वाहन चालक तसेच मालकांची निष्काळजी. अशा आशयाच्या, शिर्षकाच्या बातम्या द्यायला हव्यात.
मद्यपी ट्रकचालकाच्या चुकीमुळे ४ लोकांचा बळी गेला असता: १ जण मृत्युमुखी.
ट्रकचा कुठलाही इन्शुरन्स नव्हता.
आरोग्य केंद्रांचा गचाळ कारभार.

अशीही धक्कादायक वस्तुस्थिती नेटकी मांडायला हवी.

राजस्थानातल्या ट्रकला विमाच नाही ? रस्ते वाहतुक नियमनाचे तीन तेरा: आजही सामान्य नागरिकांचे हकनाक बळी.
अशा शिर्षकांच्या बातम्या देता आल्या असत्या, तर ते आजही होत नाही.

भारतात माणसाच्या जीवाला किंमत नसणे याची भरपूर उदाहरणे मी आजूबाजुला पाहतो. अनुभवतो. कुठे लिहूनही काही उपयोग नसतो.

तर अशा छापुन आलेल्या बातम्यांच्या शिर्षक तसेच वस्तुस्थितीच वार्तांकन अचुक, उलट सामान्य जनतेला भयभित करून सोडणारे असेच असल्याने मुळ प्रश्न, गंभीर  अशा समस्यांना वाचा फोडायची सोडून ब्रेकींग न्यूज या मथळ्याखाली श्रंध्दांजली वाहण्याखेरीज दुसरं काहीच मांडत नाहीत किंवा नाहीत मांडणार हा ज्वलंत प्रश्न आहे. मग अशा शेकडो दुर्घटना भारतवर्षात आजही घडत असतील, घडत राहतील तर मुळ समस्यांच काय?
सामान्य जनतेचा अशा अपघातांकडे पाहायचा दृष्टीकोण कसा असतो हे यांच्या जराही ध्यान्यात येत नाही का? किंवा ते सगळं ध्यानात घेवूनच अस वार्तांकन केलं जात का? हे सत्य असेल तर विकसनशील अशा देशात ही मागासलेपणाची लक्षणं आहेत.
रस्ते सुरक्षा आणि नियमांच उल्लंघन आजकाल सर्रास कसं होतय याचा लेखाजोखा मांडायची हिम्मत कुठल्याही माध्यमात आजतागायत नाहीच हे अधोरेखित होतय.
अशा वार्तांकनामुळेच मुळ कारणे, उपाय योजना आणि  एकूण व्यवस्थेचे हाल कुणालाही समजत नाहीत.
अशा शिर्षकांनी होतय काय तर सायकलिंग आणि साहस क्षेत्रात / एडव्हेंचर परिघात एक वेगळीच भय पसरवणारी बातमी विखुरली जाते. बेभरवशाची सरकारी यंत्रणा आणि कामकाज याचं पोस्टमार्टम कुठलीच माध्यमं करत नाही ही आजची वस्तुस्थिती आहे.

नेमकी वस्तुस्थिती व माहिती तिथेच असणारे संतोष डुकरे यांनी याविषयी अधिक माहिती दिलीये ती अशी,

प्रविणचे अपघाती निधन झाले. त्याच्या जवळचे नातेवाईक आणि तो काम करत असलेल्या सकाळ माध्यम समूहाला घटनेची तातडीने माहिती दिली. या सर्वांना घटनेची व प्रविणच्या मृत्यूची बातमी लगेच जगजाहीर न करण्याची विनंती केली, कारण…
प्रविणचा मृतदेह सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडून पुण्यात घरी पोच होण्यास किती वेळ लागेल, हे सांगता येत नव्हते, अडचणी अनेक होत्या आणि प्रवास 1300-1400 किलोमीटरचा होता. त्याच्या आई व पत्नीला मानसिक धक्का बसू नये व धोक्याबाहेर असलेल्या इतर जखमी सायकलपट्टूंच्या कुटुंबियांनी घाबरून जावू नये म्हणून महाराष्ट्रात पोचल्याशिवाय याबाबतची बातमी प्रसिद्ध न होण्याची खबरदारी घेणे आवश्यक होते.
सकाळ माध्यम समुहाने ही खबरदारी घेवून बातमी प्रसिद्ध केली नाही, अनेक न्युज चँनलनेही ही विनंती मान्य करून ब्रेकिंग न्युज, फूटपट्टी, फ्लँशन्युज वगैरे काय असते ते चालवले नाही, त्याबद्दल त्यांचे आभार.
पण गुडघ्याला बाशिंग बांधलेली काही प्रसारमाध्यमे आणि सोशल मिडियावरील पंडितांनी, मित्रांनी प्रचंड मनस्ताप दिला. एकवेळ तर असं वाटलं की साला अपघातातून वाचलो नसतो तर बरं झालं असतं, एवढं हे वैतागास्पद होतं.
एका माध्यमाच्या रिपोर्टरने एका मैत्रिणीमार्फत फोन केला, तिला सर्व बाबी स्पष्ट सांगितल्या. अँम्ब्युलनेसमध्ये मृतदेह घेवून येतोय, घरच्यांना धक्का बसेल, बातमी देवू नका अशीही विनंती केली, सर्व माहिती समजून घेतल्यावर ही पत्रकार मुलगी म्हणे. तुमच्यावर हा प्रसंग ओढावलाय, तर कसं वाटतंय तुम्हाला. जया क्षणी प्रविणच्या कोणत्या आठवणी तुमच्या मनात दाटल्या आहेत ?  आई शप्पथ, ती कारटी माझ्यासमोर असती तर मी तिचं नरडं धरलं असतं.
दुसर्या दिवशी बातमी प्रसिद्ध झाली. त्यात आठ जणांची मोहिम असे म्हणत ९ जणांची नावं छापली. अभिजित कुपटे टूर मध्ये नसताना त्याचंही नाव किल्लेदारीच्या फेसबुक पेजवरील पोस्ट अर्धवट वाचून किंवा नुसता कटाक्ष टाकून घुसडण्यात आले. शिवाय बातमीसोबत फोटो छापला तो किल्लेदारीच्या दोन वर्षापूर्वीच्या पुणे कन्याकुमारी सायकल मोहिमेचा व वेगळ्याच लोकांचा..
दुसर्‍या एका इंग्रजी दैनिकानं माझ्याशी न बोलताच माझ्या नावानिशी. संतोष डुकरे म्हणाले,….  असं पुढचं माझ्या तोंडी माहिती टाकत बातमी प्रसिद्ध केली. बरं माहिती खरी असती तर गोष्ट सुसह्य ही ठरली असती, पण बातमीत ऐकिव,  खोटा मजकूर घुसडलेला. कार अपघात झाला, त्यात कार ने काही फुट फरफटत नेले वगैरे वगैरे मनाचे किंवा कानाचे श्लोक. काहीच्या काही माहिती.
घटनेची खातरजमा न करता, किल्लेदारीच्या फेसबुक पेजवरील माहिती सांगूनही न वाचता, उपलब्ध असलेले डे टू डे अँक्टिव्हिटीचे फोटो न पाहता. फक्त काहीतरी बातमी द्यायची म्हणून ऐकिव किंवा स्वतःच्या मनाची काय च्या काय माहिती बातम्यात घुसडण्यात आली.
या बातम्या आपण नक्की कशासाठी देतोय, त्याचा अपघातातील जखमींवर, त्यांना सुखरूप घरी आणण्याचा प्रयत्न करणारांवर, त्यांच्या कुटुंबियांवर, याबाबतच्या पोलिस केसवर आपल्या चुकीच्या व घिसाडघाईच्या सबसे तेज बातम्यांचा कोणता परिणाम होईल, याचे भान या माध्यमांना नव्हते.

तीच गोष्ट फेसबुकवर सबसे पहले हम.

च्या नादात श्रद्धांजलीच्या पोस्ट टाकण्याची चढाओढ लागलेल्या अनेकांची. निदान आम्ही महाराष्ट्रात येईपर्यंत तरी शांत रहा. फेसबुकवरून पँनिक परिस्थिती करू नका, उपकार करा. तेवढी फेसबुक पोस्ट डिलीट करा, घरच्यांपर्यंत धक्का पोचू देवू नका लगेच. असं म्हणत अनेकांचे पाय धरावे लागले तेव्हा काहींनी पोस्ट डिलीट केल्या. तर काहींनी तशाही अवस्थेत सहकार्य करण्याऐवजी आँनलाईन बातमी आलीये वगैरे शहाणपणा शिकवत वाद घालण्याचा प्रयत्न केला…  सबसे तेच चं हे माध्यमी व फेसबुकी भुत जीवघेणा मनस्ताप देवून गेलं..
 आपण बातमी नक्की कशासाठी द्यायची, ती प्रसिद्ध झाल्यावर तिचे काय साधक बाधक परिणाम होतील याचा विचार करून बातमीदाराने ती द्यायची की नाही,  द्यायची तर कधी व कशी द्यायची याचे भान सदसदविवेकबुद्धीने राखायचे असते. मिळालेली माहिती अचुक असावी, सर्व संदर्भ योग्य असतील, छायाचित्र संबंधितच असेल याची कटाक्षाने काळजी घ्यायची असते. एकाच वेळी प्रोफेशनल व सोशल इथिक्स पाळायचे असतात. या घटनेत सकाळ माध्यम समुह, विनंतीवरून बातमी प्रसिद्ध न केलेले काही चॅनल व वृत्तपत्र वगळता उर्वरीतांच्या वागण्याची किळस वाटली.
बरं यांना एवढी काळजी होती तर यातल्या एकाही माध्यमाने फाँलोअप न्युज दिल्या नाहीत. परराज्यात अशी घटना घडल्यावर येणाऱ्या अडचणी सोडविण्याची, मदतीची सिस्टिम डेव्हलप व्हावी असंही कुणाला वाटत नाही. यात घटनेच्या अनेक संलग्न बाबी…. पोलिसांचा असहकार, शासकीय रुग्णालयांच्या शवागृहात कोल्ड रूम नसणं, राज्या राज्यातील पोलिस यंत्रणांतील बिनसलेपण आणि याचा होणारा वाईट परिणाम, स्थानिक नागरिकांची वागणूक अशा अनेक बाबींत यांना रस नाही. मग यांची जीवघेणी पत्रकारिता नक्की कशासाठी?
परराज्यात. परदेशात. परशहरात घडलेल्या अपघातांच्या बातम्या प्रसिद्ध करताना प्रसार माध्यमांनी व सोशल मिडियावर पडिक असलेल्या बहाद्दरांनी संयम पाळण्याची, जबाबदारीने वागण्याची, काही कोड आँफ कंडक्ट पाळण्याची नितांत गरज आहे.
नेमकी वस्तुस्थिती, नेमकी माहिती तसेच योग्य शिर्षके खर तर माध्यमात काम करणा-या आणि बदल घडवण्याची इच्छाशक्ती असणा-या साहसी प्रविणला आदरांजली ठरली असती.
– अभिजीत कुपाटे.
1 Comment
  1. अक्षय आबिटकर says

    भावपूर्ण श्रध्दांजली…

Leave A Reply

Your email address will not be published.