एक्झिट पोल्सद्वारे भविष्यवाणी होते पण कित्येकदा ते गंडल्याची उदाहरणे आहेत
निवडणूक झाली की, उमेदवारचे काम संपले असे होत नाही. त्यानंतर आपले दिलेले… टिम्ब का लिहिलेत हे तुम्हाला कळलंच असेल आणि मिळणारे मतदान याचं खरं गणित जुळवायला सुरुवात होते. हे झालं निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवाराचं. पण अजून एक वर्ग आहे जो की, मतदान संपल्यानंतर अंदाज लावण्यात गुंग असतो. तो म्हणजे मीडिया.
आज संध्याकाळी उत्तरप्रदेश मधील सातव्या टप्य्यातील मतदान पूर्ण झाले. उत्तरप्रदेश बरोबरच पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा या राज्यातल्या निवडणुकांचे चित्र १० मार्च रोजी निकाल स्पष्ट होतील.
आता तुम्ही टीव्ही पाहत असाल तर प्रत्येक न्यूज चॅनेलवर एक्झिट पोल दाखवण्यात येतोय हे तुमच्या लक्षात आलंच असेल. त्यामुळे एक्झिट पोलचे किती महत्त्व आहे लक्षात येईल. निवडणूक कुठलीही असुद्या मतदाननंतर चर्चा होती ती एक्झिट पोलची. बडाया मारून एक्झिट पोल देणारे अनेकवेळा तोंडावर पडल्याचे उदाहरणे देखील आहेत. कधी पासून एक्झिट पोल दाखविण्यात येत आहे. कशाप्रकारे ते काम करतात, या सगळ्यात निवडणूक आयोगाचा काय रोल असतो ते पाहुयात.
आज रात्री पासून एक्झिट पोल नावाचा खेळ सुरु होईल. तो मतमोजणीच्या सकाळ पर्यंत सुरु असतो.
तर सगळ्यात आधी एक्झिट पोल कसा घेतला जातो तो पाहुयात
एक्झिट पोलचा सर्व्हे मतदानाच्या दिवशी घेण्यात येतो. आपण मतदान केल्यानंतर शेजारचा विचारात नाही का? अगदी तसाच हा प्रकार असतो. त्या दिवशी मतदारांनी कोणाला मतदान केलं याची चौकशी करण्यात येते. आता उत्तरप्रदेशच उदाहरण घ्या ना. तिथे ७ टप्य्यात निवडणूक झाली. या प्रत्येक टप्प्यातील मतदानानंतर हा सर्व्हे होत असतो.
पोलिंग बूथ बाहेर काही जण थांबून मतदान करून बाहेर येणाऱ्या प्रश्न विचारण्यात येते.
एक्झिट पोल संदर्भात १९९८ मध्ये पहिल्यांदा गाईड लाईन काढण्यात आल्या होत्या. त्यानंतर वेळोवेळी निवडणूक आयोगाने एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल संदर्भात नियम बदलले. जो पर्यंत सर्व टप्प्यातील मतदान संपत नाही तो पर्यंत एक्झिट पोल दाखवता येत नाही. शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर एक्झिट पोल दाखवला जातात.
यावेळी सुद्धा ५ राज्याचा निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाने गाईड लाईन जारी केल्या होत्या. १० फेब्रुवारीच्या सकाळी १० वाजल्यापासून ७ मार्चच्या साडे सहा पर्यंत एक्झिट पोल दाखवू शकले नाही.
जर निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नियमाचा भंग केल्यास म्हणजे ठरवून दिलेल्या वेळेच्या आधी एक्झिट पोल दाखवला तर कारवाई होऊ शकते. यात २ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
तर फुल जोश मध्ये येऊन एक्झिट पोल मध्ये एखादा पक्ष यावेळी बाजी मारणार असं सांगण्यात येत मात्र निकाल वेगळेच पाहायला मिळाले आहेत. हे एकदा नाही अनेकवेळा पाहायला मिळाल आहे. २००४ मध्ये तर सगळेच एक्झिट पोल वाले तोंडावर पडले होते.
तर काही वेळा एक्झिट पोल बरोबर सुद्धा आले आहेत.
२००४ च्या निवडणुकी नंतर सगळे एक्झिट पोल वाले पैज लावून सांगत होते की, भाजपाचे सार्वधिक खासदार निवडून येतील आणि NDA चे सरकार स्थापन होईल. पुन्हा पंतप्रधानपदी अटल बिहारी वाजपेयी विराजमान होणार. मात्र NDA चे पक्ष २०० चा आकडा सुद्धा गाठू शकले नाही. केवळ १८९ खासदार निवडून आले होते. काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला आणि UPA च सरकार स्थापन झालं.
त्यानंतर झालेल्या निवडणुकीत म्हणजेच २००९ च्या लोकसभा निवडणुकीत UPA आणि NDA मध्ये अटीतटीची लढाई होईल असा अंदाज सर्वच एक्झिट पोल वाल्यांनी वर्तवला होता. मात्र, जेव्हा निकाल हाती आले तेव्हा सगळे पुढं एकदा हैराण झाल्याचे पाहायला मिळाले. UPA चे २६२ खासदार निवडून आले होते तर NDA ची मजल १५९ सीट पर्यंतच मारली.
मात्र २०१४ आणि २०१९ मध्ये एक्झिट पोल बरोबर ठरले. दोन्ही वेळा एक्झिट पोल हे भाजप निवडून येणार असा अंदाज व्यक्त केला होता. २०१४ ला भाजपच्या २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ खासदार निवडून आले होते.
२०१५ मध्ये अशाच प्रकारे बिहार मध्ये सुद्धा एक्झिट पोलचा अंदाज चुकले होते. आरजेडी आणि जेडीयु पेक्षा भाजप वरचढ ठरेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, या निवडणुकीत भाजपाला केवळ ५८ जागा मिळल्या आणि आरजेडी आणि जेडीयु सरकार आलं होत.
तर पार १९८० पासून एक्झिट पोल आणि निवडणूक सर्वे दाखविण्यात येतो. याचे श्रेय जाते ते NDTV च्या प्रणव रॉय यांना. त्यावेळी प्रणव रॉय यांनी मतदारांच्या मूड जाऊन घेण्यासाठी सर्व्हे घेतले होते. पहिले काही वर्ष एक्झिट पोल मॅगजीन मध्ये छापण्यात येत.
तर १९९६ ची लोकसभा निवडणूक एक्झिट पोलच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा होता. हा एक्झिट पोल दूरदर्शनवर दाखविण्यात आला होता. तेव्हा पहिल्यांदाच एक्झिट पोल टिव्हीवर दाखविण्यात आला होता. हा सर्वे सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटी मार्फत करण्यात आला होता.
आता ५ राज्यातील एक्झिट पोल आले असून तुम्हाला काय कुठल्या राज्यात कोणच सरकार येईल.
हे ही वाच भिडू
- भारताच्या पहिल्या निवडणूकीत मतपेट्या पोहोचवण्यासाठी रोप वेचा वापर करण्यात आलेला
- पहिली निवडणूक पर्रीकरांनी साबुदाणा वड्यामुळे लढवली होती.
- जिकंण्यासाठी निवडणूक लढवणारे लाख असतात, पण हरण्यासाठी लढणारा हा गडी अतरंगी आहे