बांग्ला स्त्रियांच्या बलात्कारावर पाक राष्ट्रपती म्हंटले जन्माला येणारी पोर सूंदर निपजतील

बांग्लादेश मुक्तिसंग्रामात भारताने केलेली मदत आजही प्रत्येक बांग्लादेशीच्या लक्षात आहे. भारतमुळेच बांग्लादेश नकाशावर आला. नाहीतर भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झाल्यावर त्याची गणती पूर्व पाकिस्तान म्हणूनच होत होती. पाकिस्तानने या पूर्व पाकिस्तानवर अनन्वित अत्याचार करायला सुरुवात केली होती. 

पूर्व पाकिस्तानातील परिस्थिती अत्यंत बिकट होत होती. या अत्याचाराला कंटाळून दररोज हजारो निर्वासित सीमा ओलांडून भारतात येत होते.  या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढू लागला. 

३ डिसेंबरच्या संध्याकाळी जेव्हा पाकिस्तानने भारताच्या हवाई पट्टीवर विमानांनी हल्ला केला, तेव्हा भारताने युद्ध घोषित केले. त्यानंतर १३ दिवसात भारताने ही लढाई जिंकलीच नाही तर पाकिस्तानचे बांगलादेश म्हणून दोन तुकडे केले आणि एका नवीन राष्ट्राला जन्म दिला.

ही लढाई केवळ १३ दिवस चालली. यानंतर डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केले. त्यामुळे पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि बांगलादेशचा जन्म झाला.

मात्र या लढ्याची बीज नऊ महिन्यांपूर्वीच रोवली गेली होती. जेव्हा पाकिस्तानचा हुकूमशहा याह्या खान याने पूर्व पाकिस्तानातील बंगालींवर अत्याचार सुरू केले. पूर्व पाकिस्तानातले लोकप्रिय नेते शेख मुजीबुर रहमान यांनी निवडणूक जिंकली तेव्हा ही निवडणूक नाकारली गेलीच पण त्यांना तुरुंगवासही झाला. 

यानंतर पाकिस्तानी सैन्य ज्या प्रकारे तेथे नरसंहार करत होते, त्यामुळे लाखो लोक भारतात पळू लागले. त्याचा भारतावर परिणाम झाला. यासाठी भारताने पाकिस्तानसह अमेरिकेला परिस्थिती सुधारण्याचे आवाहन केले पण याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. 

या काळात पाकिस्तानी रानटी सैन्याने ३० लाखांहून अधिक लोक मारले होते, असे तत्कालीन पूर्व पाकिस्तानी लोकांचे मत आहे. 

पण याच पाकिस्तानच्या रानटी सैन्याने तिथल्या महिलांवर बलात्कार करायला सुरुवात केली.

पाकिस्तानी सैन्याने जवळपास २५ हजार बांग्लादेशी महिलांवर बलात्कार केले होते. 

याचा परिणाम त्या अत्याचाराला बळी पडलेल्या हजारो महिला गर्भवती राहिल्या. आता या महिलांचं अबॉर्शन करावं लागणार होत. तिथं असणाऱ्या रेड क्रॉस संघटनेने अबॉर्शन कॅम्प सुरु केले. पण बांग्लादेशी महिलांवर रेप करा म्हणून पाकिस्तानी सैन्याच्या 14th डिविजन ला जनरल नियाजीने कमांड दिली होती.

हा रेप कल्चरचा डाव नियोजित असल्याचं मेजर जनरल ख़ादिम हुसैन राजा यांनी आपल्या  A Stranger in my own country  या पुस्तकात म्हंटल आहे. 

ते आपल्या पुस्तकात म्हणतात कि, नियाझीने शिवीगाळ करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तो म्हणाला

 मी या हरामजादी बंगाली समाजाची नस्लच  बदलून टाकीन. त्यांना माझ्याबद्दल काय वाटतं ?

नियाझीने तिथल्या बंगाली अधिकाऱ्यांना धमकी दिली की तो आपल्या सैनिकांना बलात्कार करण्यासाठी  बंगालच्या स्त्रियांच्या मागे सोडेल. यावर कोणीही काहीही बोलले नाही.दुसऱ्या दिवशी सकाळी कळलं की हे ऐकून एक बंगाली अधिकारी मेजर मुश्ताक कमांड हेडक्वार्टरच्या बाथरूममध्ये गेला होता. आणि त्याने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. जेव्हा राष्ट्राध्यक्ष याह्या खानला हे समजले तेव्हा त्याने उत्तर दिलं 

चला या बलात्काराच्या बहाण्याने पूर्व पाकिस्तानात जन्माला येणारी मुलं सुंदर जन्माला येतील.

जेव्हा युद्ध भारत जिंकेल अशी आशा निर्माण झाली तेव्हा मात्र या रेप कल्चरला बांग्लादेशींच्या विरोधात हत्यारासारखं वापरणारा नियाजीं घाबरला. त्याला भारतीय सैन्यापुढं सरेंडर करण्याची भीती नव्हती. तर बांग्लादेशी मुक्तिवाहिनीच्या हातात जर तो सापडला असता तर त्याला त्यांनी जिवंत सोडला नसता एवढं मात्र खरं.

Leave A Reply

Your email address will not be published.