अंबानी, तेंडुलकर पासून बच्चन सर्वजण महाराष्ट्रातल्या याच डेअरीचं दूध पितात. 

आम्ही फक्त चितळेंच दूध पितो. ओके नो प्रोब्लेम. प्रत्येकांचा आवडीचा ब्रॅण्ड असतो. काही जणांना चितळेंच दूध आवडत तर काहींना गोकूळ. काहीजण कृष्णा भारी म्हणतं असतील तर काहीजण पतंजली. महाराष्ट्रात दूधाच उत्पादन पण मुबलक असल्याने दूधाच्या ब्रॅण्डमध्ये इतकी विविधता असण्याबद्दल काही विशेष वाटत नाही. 

पण मुद्दा हा आहे की आपण जे दूध पितो तेच दूध अंबानी पित असतील का. अमिताभ बच्चन पण गोकुळचा चाहता असेल का? सचिन तेंडुलकर पतंजलीचं दूध पित असेल का? 

तुम्हाला माहिती आहे आम्हाला प्रश्न पडला की आम्ही तळापर्यन्त पोहचतो. इतके मोठ्ठे सेलिब्रिटी आणि पैशाने गडगंज असणारे लोक कोणतं दूध पितात असा प्रश्न एका भिडूला पडला.

उत्तर शोधताना आम्हाला एकाच ब्रॅण्डचं

नाव समजला. भारी एका गोष्टीच वाटलं की हा ब्रॅण्ड  अस्सल मराठी मातील जन्माला आला आहे. पुण्याजवळच्या मंचरमधून हा उद्योग चालतो. 

ब्रॅण्डचे मालक जरी अस्सल मराठी माणूस नसेल तरी ते मनाने पुर्णपणे मराठी आहेत. शिवाय इथे दुधाचा इतका मोठ्ठा ब्रॅण्ड उभा राहिल्यामुळे स्थानिकांच्या रोजगारासोबत, आपल्या तालुक्याचं, जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राच नाव मोठ्ठ होतय हा अभिमान पण आहेच की. 

पुणे शहारापासून साठ किलोमीटरवर हायटेक डेअरी आहे.

या डेअरीचं नाव आहे भाग्यलक्ष्मी दूध डेअरी. पराग मिल्क फूड्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकिय संचालक देवेंद्र शहा हे या उद्योगाचे सर्वेसर्वा आहेत. (त्यांच्या नावात देवेंद्र देखील आहे आणि शहा देखील)

देवेंद्र शहा यांचा जन्म १९६४ चा. पदवी घेतल्यानंतर त्यांनी वेगवेगळे व्यवसाय करण्यास सुरवात केली. कापड व्यवसायानंतर ते शेअर ट्रेडिंगच्या व्यवसायात उतरले. तेव्हा १९९०-९१ हे साल होतं. १९९१ सालीच तत्कालीन पंतप्रधान नरसिंगराव आणि मनमोहन सिंग यांनी भारताची अर्थव्यवस्था खुली केली. मनमोहनसिंग यांच्या योजनेनुसार दुग्धउत्पादन वाढवण्यासाठी नवे धोरण अंमलात आणले गेले. त्यानुसार खाजगी क्षेत्रातील दुग्धउत्पादकांना प्रोत्साहन देण्यात आले. १९९२ साली देवेंद्र शहा प्रत्यक्ष कामाला लागले पराग मिल्क फूड्स ची स्थापना करण्यात आली. दहा कोटी रुपयांचे भागभांडवल त्यासाठी उभारण्यात आले. 

पराग मिल्क फूडस प्रा. लि हा देशातील खाजगी दूध क्षेत्रातला महत्वाचा प्रकल्प ठरला. महाराष्ट्रातल्या मंचर आणि आंध्रपर्देशातील पालमनेर येथे हायटेक डेअरी विकसीत करण्यात आला. गो आणि गोवर्धन या ब्रॅण्डने दूध विकण्यास सुरवात करण्यात आली. त्याच सोबत दही, पनीर, तूप, लस्सी असे दुग्धजन्य पदार्थ देखील तयार होवू लागले. 

पराग मिल्कचाच एक ब्रॅण्ड म्हणजे प्राईड ऑफ काउ… 

हेच दूध देशभरातले मोठमोठ्ठे सेलिब्रेटी पितात. प्राईड ऑफ काउ या दुधाचे सुरवातीला १७५ ग्राहक होते. आज त्यांची संख्या १२ हजार इतकी आहे. या दूधाची किंमत प्रतिलिटर १०० रुपयांहून अधिक असल्याच सांगण्यात येत. 

आत्ता अस काय आहे या दूधात. 

तर हा फोटो. 

मंचर इथल्या कंपनीच्या प्लॅन्टमध्ये कोणत्याही पद्धतीने ह्यूमन टच दिला जात नाही. गाईंच दूध काढून ते तुमच्यापर्यन्त पोहचण्याच्या प्रोसेसमध्ये माणसांचा हस्तक्षेप शून्य इतका ठेवण्यात येतो. गाईच्या पायांमध्ये जे रबरमॅट टाकण्यात येते ते देखील दिवसातून तीन वेळा बदलण्यात येते. अत्यंत स्वच्छ वातावरणात इथे सुमारे साडेतीन हजार गायी पाळण्यात आलेल्या आहे. 

सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे गायींसाठी इथे म्युझिक सिस्टीम लावण्यात आली आहे.

मस्तपैकी, निवांतपैकी लता मंगेशकरांची गाणी नाहीतर बिस्मिलॉं खॉ यांची बासरी ऐकत या गाई दूध देतात. २४ तास हे म्युझिक सुरूच असते. गायींच्या खाद्याचं म्हणालात तर सोयाबीन,अल्फा घास, हंगामी भाज्या गायींना चारा म्हणून दिल्या जातात. एखाद्या गायीच पोट बिघडलच तर तिला हिमालय ब्रॅण्डचे आयुर्वेदिक औषधे दिली जातात. 

कॅनडाचे न्युट्रीशन एक्सपर्ट डॉ. फ्रॅंक इथे दर तीन महिन्यांनी येवून गायींच खाद्य ठरवतात. त्यांच्यातील प्रोटीनची संख्या ठरवतात. आणि हो इथल्या गायी फक्त RO शुद्ध पाणी पितात. 

इतकी प्रचंड काळजी दुधाचं उत्पादन करताना घेण्यात येते. दुध काढण्यासाठी यंत्राचा वापर केला जातो. तिथून उत्तम प्रतिच्या टेम्पर्ड बाटल्यांमध्ये दूध बंद केले जाते. ग्राहकाच्या घरी दूध पोहचवेपर्यन्त त्याचे तापमान चार डिग्रीच राहिल याची काळजी घेतली जाते. डेअरी टू ग्राहक अशी थेट सेवा असल्याने दुधाचे योग्य संरक्षण देखील होते. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.