वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रीती जिंटाने आयपीएलची टीम विकत घेतली

डिंपल गर्ल म्हणून ओळख असणारी प्रीती जिंटा मागच्या काही वर्षात चित्रपटांपासून लांब आहे. मात्र ती मागची सलग १४ वर्ष एप्रिल-मे महिन्यात प्राईम टाइमला टीव्हीवर झळकत असते. हिमाचलप्रदेश मध्ये लहानपण घालविणाऱ्या प्रीतीने मुंबईत येवून आपली विशेष ओळख तयार केलीय.

चित्रपटाची कुठलीही पार्श्वभूमी नसतांना सुद्धा ‘कल हो ना हो’, ‘कोइ मिल गया’, ‘वीर जारा’ सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची झलक दाखविली. प्रीती जिंटाने स्वताची ओळख केवळ अभिनेत्री एवढीच ठेवली नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रात उतरवत आपण कुठेच कमी नसल्याचे दाखवून दिलंय.

भारतात आयपीएलची एन्ट्री

२००८ मध्ये भारतीय क्रिकेट मध्ये क्रांती झालीये असच आपण म्हणूयात. जगभरात होणाऱ्या फुटबॉल  लीगच्या धर्तीवर बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन केले . ललित मोदी यांच्या सुपीक डोक्यातील ही संकल्पना. भारतासाठी हे सगळ नवीनच होत. एकाच टीम मध्ये देशी-परदेशी खेळाडू. मैदानात चौकार-षटकार नंतर सेलीब्रेशन करणाऱ्या चीयरगर्ल. यावरून मोठा वाद पण झाला होता.

आयपीएल मधील एखाद्या टीमची मालकी मिळावी म्हणून देशभरातील दिग्गज प्रयत्नशील होते. अशात मात्र एक गोष्ट इंटरेस्टिंग घडली. आयपीएलच्या दोन टीमची मालकी महिलांना मिळाली. त्यातील पंजाब किंग टीमची मालकीण आहे अभिनेत्री प्रीती जिंटा.

एक्टिंग सोडून हे काय करतीये म्हणून तिच्यावर टीका सुद्धा झाली होती. याचबरोबर बॉयफ्रेंडच्या पैशातून ही टीम विकत घेतल्याची कुजबुजही होती. मात्र सर्व चर्चांना फाट्यावर मारत प्रीती जिंटा सगळ्यांना पुरून उरली.

प्रीती जिंटाचा शेवटचा चित्रपट कुठला हे आठवणार पण नाही. मात्र पंजाब किंगच्या मॅच वेळी स्टॅड मध्ये उभी राहून खेळाडूंचा उत्साह वाढविताना नेहमी दिसत असते.

वडिलांच्या इच्छा पूर्ततेसाठी टीमची खरेदी

प्रीती जिंटाने क्रिकेटशी जोडून घेत आपल्या वडिलांना एक प्रकारची श्रद्धांजली दिली आहे. आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रीती जिंटाने आयपीएलची टीम विकत घेतली होती.

प्रीती जिंटा यांचे वडील जुर्गानंद जिंटा हे भारतीय लष्करात अधिकारी होते. शिमला येथे स्पोर्ट्स क्लब बनविण्याची त्यांची इच्छा होती. खेळा मधून तरुणांना दिशा मिळेल हा त्यांचा स्पोर्ट्स क्लब बनविण्यामागचा उद्देश होता. आणि पुढे जाऊन हे तरुण भारतीय संघाकडून खेळतील असे त्यांना वाटत होते. त्यासाठी ते प्रयत्नशील सुद्धा होते.

दुर्दैवाने जुर्गानंद जिंटा यांचा कार अपघातात मृत्यू झाला. त्यावेळी प्रीती जिंटाचं वय केवळ १३ वर्ष होते. या अपघातात तिची आई निलप्रभा या सुद्धा गंभीर जखमी झाली होती. दोन वर्षानंतर निलप्रभा यांचा पण मृत्यू झाला. अवघ्या १५ वर्षी प्रीती जिंटा अनाथ झाली . 

आई- वडिलांच्या निधनातून सावरायला प्रीती जिंटाला पुढेचे काही महिने जावे लागले. असेही सांगण्यात येते कि, आई-वडील गमविल्या नंतर पुढेचे सहा महिने प्रीती जिंटा कोणीशीही बोलत नव्हती. मात्र काहीही असले तरीही वडिलाचे इच्छा पूर्ण करायला ती विसरली नव्हती.

२००७ मध्ये बीसीसीआय मार्फत वेगळ्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची चर्चा होती. इंडियन प्रीमियर लीग असे स्पर्धेला नाव देण्यात आले होते. लिलावच्या माध्यामातून टीम खरेदी करता येणार होत्या.

प्रीती जिंटा जवळ एकटीने टीम विकत घ्यावी एवढे पैसे नव्हते. त्याकाळी तिला डेट करत असलेल्या नेस वाडियांना सोबत घेत प्रीती जिंटाने पंजाब किंग ही टीम विकत घेतली. अशा प्रकारे टीमची सहमालकीन होऊन प्रीती जिंटाने आपल्या वडिलांची इच्छा काही अंशी पूर्ण केली.

प्रितीने आयपीएलची टीम विकत  घेतल्यावर अनेकांनी टीका केली होती. कित्येकांच होतं की प्रीती फक्त नामधारी मालकीण आहे. नेस वाडियांनी पैसे लावलेत आणि तिला फक्त चिअर गर्ल प्रमाणे सोबत घेतलंय. पण प्रितीने संघाच्या प्रत्येक निर्णयात स्किर्य सहभाग घेऊन हे खोत असल्याचं दाखवून दिल. पुढे नेस वाडिया व ती दोघे वेगळे झाले पण तरीही किंग्ज इलेव्हन पंजाबच्या मालकीमध्ये कोणताही फरक पडला नाही.

२०१४ सालचा आयपीएल वगळता पंजाब किंग्सला चांगले प्रदर्शन करता आले नाही.  मध्यंतरी  प्रीती जिंटा पंजाब किंग्स मधील आपला हिस्सा विकणार अशी चर्चा होती. मात्र त्यावेळी सांगितले की,

मी पंजाब किंग्स टीम ही केवळ नफा मिळावा या हेतून विकत घेतली नाही. वडिलांचे स्वप्न होते स्पोर्ट्स क्लब बनविण्याचे. मात्र दुर्दैवाने त्यांना ते पूर्ण करता आले नाही. वडिलांची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी मी टीम खरेदी केल्याचे तिने एका कार्यक्रमात सांगीतले होते.

प्रीती जिंटा कडे पंजाब किंगची २३ टक्के मालकी आहे. 

आयपीएल बरोबर २०१७ मध्ये प्रीती जिंटाने दक्षिण आफ्रिकेतीच्या टी-ट्वेंटी लीग मधील एक टीम विकत घेतली आहे.

दानशूर प्रीती

२००९ मध्ये प्रीती जिंटाने उत्तराखंड राज्यातील ऋषीकेश मधील ३४ अनाथ मुली दत्तक घेतल्या आहेत. या मुलीचा शिक्षणापासून ते सर्व खर्च प्रीती जिंटा उचलते. एवढेच नाही तर वर्षातून दोनदा त्या मुलींना भेटायला जाते. मानवी तस्करी, एड्स, महिला सशक्तीकरण यासारख्या गंभीर मुद्द्यावर ती नेहमी काम करत असते.

प्रीती जिंटाला २०१० मध्ये युनिवर्सिटी ऑफ इस्ट लंडन ने डॉक्टरेट ऑफ आर्टने सन्मानित केले आहे.    

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.