नुकताच भाजप आमदार आणि प्रियांका गांधी यांच्यात विमानातल्या सीटवरून वाद झाले होते..

दुनिया गोल आहे,  इथं कोणी, कधी आणि कुठे भेटेल सांगता येत नाही, याला दुश्मनही अपवाद नाही. आता हे जरा फिल्मी आहेे भिडू. कारण आपण चित्रपटात बघतो असाचं काहीसा सीन असतो, ज्यात डायलॉगबाजी सुद्धा भरपूर असते. पण हे रिअल लाइफ मध्येही घडलंय. 

भाजप नेते युपीचे आमदार दिनेश प्रताप सिंह यांनी आपल्या फेसबुक पोस्ट माध्यमातून  एक किस्सा शेअर केलाय.

३ ऑक्टोबरला दिनेश प्रताप सिंग दिल्लीच्या टर्मिनल २ वरून इंडिगो विमानाने लखनऊला  चालले होते. ते एक्सिट रोच्या  १९ C सीटवर बसले होते, बाजूलाच १९ बी सीटवर एक वृद्ध व्यक्ती बसली होती, ज्यांच्या  पोटावर पट्टा होता. दिनेश प्रताप सिंग यांच्यामते ते बहुधा आजारी असावेत.

त्यांना वाटले कि, बोर्डिंग आता पूर्ण झालीये. आता कोणताही प्रवासी येणार नाही. त्यात त्याच  लाईन मधल्या १९ D E F तीन सीट रिकामे होते, दिनेश प्रताप सिंग त्यांनी त्या वृद्ध व्यक्तीला रिलॅक्स बसता यावं, म्हणून स्वतः १९ D सीटवर जाऊन बसले आणि फोनवर त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छापर मॅसेज वाचत बसले. 

दरम्यान, थोड्याचं वेळात तिथं काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा आल्या आणि सीटजवळ उभ्या राहिल्या. दिनेश प्रतापसिंग मोबाईल मध्ये बिझी होते. त्यामुळे प्रियंका गांधी म्हणाल्या,

 ‘ही सीट माझी आहे.’

दिनेश प्रताप सिंह यांनी प्रियंकाकडे पाहून नमस्कार केला  आणि आपल्या जागेवर जाऊन  बसायला लागले. आता प्रियांका गांधींनी दिनेश प्रताप सिंह यांच्या अभिवादनाचं उत्तर तर दिलं नाही, पण जरा रागातच म्हणाल्या,

 तुम्ही  इतक्या लवकर आमची सीट घेऊ शकणार नाही. 

यावर दिनेश प्रताप सिंह यांनी उत्तर दिलं की, तुमचं सीट आधीच धोक्यात आहे हे काय कमी आहे. एवढे बोलून ते आपल्या जाग्यावर बसले.

तेव्हा त्या ठिकाणी विमानाची एअर होस्टेस आली आणि शेजारी बसलेल्या वृद्ध व्यक्तीला आधार देऊन समोरच्या रिकाम्या रांगेत बसवले.

या प्रसंगावर दिनेश प्रताप सिंह यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये लिहिले की,

मला वाटले की मी कोणतीही चूक केली नाही. मी एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी भारतीय जनता पक्षाचा एक छोटा सैनिक आहे, तर प्रियंका गांधी देशातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत कुटुंबाची सदस्य आहे आणि एका राष्ट्रीय पक्षाची सर्वेसर्वा आहे. माधुरी विश्वास बसत नव्हता की त्यांचे आचरण इतकं घाणेरडे असेल. 

दिनेश प्रताप सिंह पुढे लिहितात की,

प्रियंका जी रायबरेलीच्या जनतने दिनेश प्रताप सिंह यांच्या मेहनतीवर खूश होऊन तुमची जागा तर हिसकावली होती, पण सोनिया जींना रायबरेलीची जागा कशी मिळाली, ते तुमच्या कुटुंबातले एक रहस्य आहे, जे मला चांगले माहित आहे. तुमची मदत करणारे आमच्या पार्टीचे ते नेते आता या जगात नाहीत, ज्यांच्या दारावर गांधी कुटुंब रायबरेलीची जागा वाचवण्यासाठी भीक मागायला गेले आणि त्यांनी तुम्हाला मदत केली.

आता आमच्या पक्षात तुम्हाला मदत करणार कोणी नाही. मला डोळे दाखवून रायबरेलीतून खासदार होऊ शकणार नाही, किंवा दिनेश सिंह आता तुम्हाला घाबरणार नाही. आज, आमच्या वाढदिवसानिमित्त, जिथे लाखो लोकांचे आशीर्वाद मिळाले, तिथे तुम्ही माझ्या वाढदिवसाला दिलेली तीच भेट नेहमी लक्षात राहील, असही दिनेश प्रतापसिंग आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले.

आता फेसबुक जनता दिनेश प्रताप सिंह हे या घटनेचा मोठा बागुलबुवा करून सहानुभूती मिळवत आहेत असल्याचे आरोप करतेय. लखीमपूर खेरी प्रकरणात निदर्शने केल्याबद्दल प्रियांका गांधींना योगी सरकारने अटक केल्यापासून तर राजकारण प्रचंड तापलंय. विमानाच्या सीट पर्यंत पोहचलेली भांडणे आता उत्तर प्रदेशच्या राजकारणात अजून काय काय दाखवेल याची नांदी ठरत आहेत.

हे ही वाच  भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.