यापूर्वीच प्रियांका गांधी राजकारणात येणार होत्या. निवडणूक लढवण्याची सुद्धा तयारी केलेली

उत्तर प्रदेशात  येत्या काही महिन्यांत विधानसभा  निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याचं राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.  राज्यात  काँग्रेस पक्ष प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वात  प्रचार करत आहेत.

काँग्रेस पक्षाने यावेळी वेगळी रणनीती आखत  या निवडणुकीत ४० टक्के महिलांना तिकीट देणार असल्याचं स्पष्ट केले आहे.  यंदाच्या निवडणुकीतून काँग्रेस आपली गमावलेली जागा परत मिळवण्याच्या तयारीत काम करतयं. 

याच पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबरला प्रियांका गांधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला असलेल्या गोरखपूरमधून शपथ रॅली करणार आहे.

प्रियंका गांधी ह्या काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्या मानल्या जातात. जरी त्यांनी राजकारणात बाकींच्यांपेक्षा उशीरा  एन्ट्री मारली असली, तरी त्या राजकीय भूमिकेचं नेहमीचं कौतूक केलं जातं.

  पण तुम्हाला माहितीये या आधीच्या काही वर्षांपूर्वी  प्रियंका गांधींना स्वता: ला राजकारणापासून दूर ठेवायचं होतं. हे खुद्द प्रियांका गांधी यांनी एका मुलाखतीत सांगितले. त्यांच्या त्या जून्या मुलाखतीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

या मुलाखतीत एक पत्रकार प्रियंका गांधी यांना विचारत आहे की, ‘तुम्हाला राजकारणात यायचे नाही असे आम्ही अनेकदा ऐकले आहे, पण तुम्हाला राजकारणात का  यायचे नाही?

या जुन्या मुलाखतीत प्रियंका गांधी हसत हसत उत्तर देतात,

‘मला राजकारणात का यायचे नाही, याचा हिशेब मी  अजून तरी केलेला नाही.  मला राजकारणात यायचे नाही हे मी अगदी स्पष्टपणे सांगते आणि मी खूप आनंदी आहे.’

प्रियंका पुढे म्हणाल्या, तसं पाहिलं तर वयाच्या १६ व्या वर्षी मला राजकारण करायचे होते, पण नंतर हा निर्णय बदलला.

पुढे मला १९९९ मध्ये कळले की, मी राजकारणासाठी बनलेले नाही.  त्यावेळी माझ्यासमोर प्रश्न होता की मी निवडणूक लढवायची की नाही?  पक्षातल्या बऱ्याच ज्येष्ठ नेत्यांनी मी निवडणूक लढवावी असं म्हंटलं. म्हणजे अगदी दबाव टाकला असं म्हणतात तरी चालेल.

त्यावेळी मी विपश्यनेला गेले होते.  मी 10 दिवस बेपत्ता होतो.  कारण यावेळी तुमचा आवाज ऐकणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. १९९९ साला दरम्यान लोक माझी तुलना इंदिरा गांधींशी करत होते.  मी माझ्या आजीला पाहिले होते आणि ती खूप मजबूत स्त्री होती.  लहानपणी तिचा माझ्यावर खूप प्रभाव होता, पण जेव्हा मला कळले की प्रियंका गांधी प्रत्यक्षात अशी आहे, तेव्हा मी राजकारणापासून स्वतः ला दूर ठेवायचे ठरवले.

आता या मधल्या काळात काही गोष्टी घडल्या यांच्यामुळे प्रियंका गांधी यांनी राजकारणात सक्रिय झाल्या. सध्याच्या घडीचं चित्र पाहिलं तर प्रियंका राजकारण चांगल्याप्रकारे हाताळत आहे.

म्हणजे यूपीच्या पाहायचं झालं तर, राज्याच्या विधानसभा निवडणुकीची कमान प्रियंका गांधी यांच्या हातात आहे.  यावरूनचं दुसऱ्या एका मुलाखतीत प्रियंका गांधींना विचारण्यात आले की, ‘तुम्ही यूपीमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकता का?

त्याला उत्तर देताना प्रियंका म्हणाल्या की, ‘आमच्या पक्षातील मुख्यमंत्रिपद इतर नेत्यांशी चर्चा करून ठरवले जाईल.  यावर आत्ताच काही बोलणे थोडे घाईचे ठरेल.  पक्षात असा निर्णय झाला, तर त्याची माहिती सर्वप्रथम तुम्हाला दिली जाईल.  ‘

हे ही वाचा भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.